शब्दसखी सुनिता

Inspirational Others

3  

शब्दसखी सुनिता

Inspirational Others

माणुसकीचा झरा

माणुसकीचा झरा

2 mins
430


       कोरोनाच्या काळात अनेक गोष्टींचा आपण बघितल्या. काही ठिकाणी माणुसकी बघायला मिळाली तर काही घटनांनी माणुसकी लोप पावलीय का ? अस वाटल. पण बर्‍याच घटनांनी समाजातील माणुसकी जिवंत असल्याच 

दिसल. जिथे दान देण्याची सवय असते, तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. अशीच एक लाॅकडाउन मधील कथा.  आजच्या काळातही अनेक दानशुर माणसे आहेत. एका हाताने केलेले दान दुसर्‍या हाताला ही कळता कामा नये. अशी मान्यता  समाजात रूजलेली आहे. 


    जगातील सर्वश्रेष्ठ दान, महादान हे भुकेलेल्यांना अन्नदान करण संकटकाळात अडकलेल्या  आपत्तीत सापडलेल्यांना शक्य होईल ती मदत करण हि मदत करण्यासाठी फक्त इच्छा असावी लागते. लाॅकडाऊन मध्ये दहा तरूण एकत्र येऊन त्यांनी माणुसकीच्या नात्याने त्यांनी रूग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्याचे तसेच अडलेल्या रूग्णांना बेड मिळत नसला कींवा रूग्णांना ॲडमीट करण्यासाठी रूग्णवाहीका मिळत नसली तर त्यांना उपलब्ध करून देणे आणि रूग्णाला वेळेवर उपचार मिळावा यासाठी या तरूणांनी त्यांना शक्य होईल तेवढी मदत यांनी केली. कोरोना काळातील स्मशानशांतता रूग्णांच्या जीवन मरणाचा प्रश्न आणि रूग्ण नातेवाईकांची होत असलेली हेळसांड या संबंध स्थितीचे वर्णन आपण रोजच टिव्ही आणि सोशल मिडीयात होत असते. पण दातृत्व करणारे बोटावर मोजण्याएवढीच असतात. दहा तरूणांनी सुरू केलेल्या कामाला आता

चळवळीचे स्वरूप येत आहे. रूग्णांना आणि रूग्णांच्या नातेवाईकांना थेट मदतीचा हात मिळत असल्याने वेळेत उपचार होत आहेत. तरूणांनी मिळून घेतलेला हा निर्णय आज अनेकांसाठी नवसंजीवनी ठरत आहे. या तरूणांनी कामाची वाटणी केली आणि त्याप्रमाणे ते रोजच आपापली जबाबदारी पार पाडतात. रोज ते सकाळी आपल्या कामाला सुरूवात करतात. त्यांच टिमवर्क खुपच छान आहे. रोज तिनशेपेक्षा जास्त फुड पॅकेट तयार करतात. हे तरूण हे फुड पॅकेट खाजगी  हाॅस्पिटल, सरकारी दवाखान्यांसमोर उभे असणारे रूग्णांचे नातेवाईक यांना या फुड पॅकैटचे वाटप केले जातात. खुप दिवसांपासुन ते हे असा उपक्रम राबवत होते लाॅकडाउन मध्ये त्यामुळे अनेक गरजू लोकांपर्यंत याच वाटप केल जात होत. एवढच नाही तर रूग्णांसाठी बेड्स, आर्थिक मदत आणि जमेल तेवढी मदत हे तरूण करतात. एवढ सामाजिक कार्य करून यापैकी एकाही तरूणाने आपला फोटो सोशल मिडीया कींवा फेसबुक वर टाकला नाही. त्यांच्या कामाची दखल अनेक चॅनेलने घेतली पण या दानशुरांनी आपल नाव न लिहण्याची आणि जाहीर करण्याची विनंती केली. 


  हे सगळे तरूण कुणी मोठी व्यक्ती कींवा फार पैसेवाले नाहीत. स्वतःची आर्थिक  परिस्थिती ही ईतकी भक्कम नाही.यातील

प्रत्येकजण काही ना काही छोट मोठ काम करुन आपला चरितार्थ चालवतात. या तरूणांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही कींवा कुणा मोठ्या व्यक्तीच पाठबळ नाही केवळ मनातील इच्छा आणि आपण ही समाजाचे काही देणे लागतो. या विचाराने च हे सर्व तरूण एकत्र आले आणि त्यांनी गरजुंना मदत केली. घराची जबाबदारीही ते उत्तमपणे सांभाळतात. सामाजिक कार्य करणारे हे तरूण खर्‍या अर्थाने ' सुपरहिरो ' आहेत. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational