STORYMIRROR

शब्दसखी सुनिता

Inspirational Others

2  

शब्दसखी सुनिता

Inspirational Others

माझी सुपर माॅम

माझी सुपर माॅम

6 mins
118

    आत्मचरित्र लिहण्याइतकी मी मोठी नाही...पण माझ्या आयुष्यात पदोपदी मला सपोर्ट करणारीआणि माझ प्रेरणास्थान म्हणजे माझी आई होय.तिचा प्रवास मला लिहायला आवडेल.    आईला लहान असताना सगळे कामावर जायचेतिला घरी ठेवायचे. लिहता वाचता येईपर्यंत शिक्षणझाल. आजी गावाला गेली की आईही तिच्यापाठीलागायची हट्ट करायची मलाही यायच म्हणुन मगआपल्या लाडक्या आणि घरात सर्व भावंडांमध्येतिच लहान होती म्हणून आजी तिला सोबत घेऊनजायची. मग थोडी मोठी झाल्यावर तिला घरचीकाम कराव लागत. सगळे कामावर जायचे. आजी,बाबा, मामा, मावशी त्यावेळेस ते मोठे होते. सर्वचकाम करायचे, रोजंदारीची काम पावसाळ्यात बंदअसत. मग शेतीची काम असली की आईही जायची.घरीही जनावरे आणि कोंबड्या पाळलेल्या असल्यामुळेलक्ष द्याव लागे, मग तिने चौथीच्या पुढे शिक्षण नाहीघेतल. आजीने तिला पुढे शिक म्हटल होत. परंतुपरिस्थीतीमुळे पुढे ती शिकू शकली नाही. मग रोजच कामाला जाऊ लागली. तिच लग्न लवकरझाल. पुढे लग्न होऊन सासरी आल्यावर तिलाफारस कळत नव्हत. पण घरी सर्वच काम केल्यामुळेतिला कामाची सवय होती.


आई काम करायची तरी तिला आजी बोलायची. माझ्या जन्मानंतरमुलगी झाली म्हणुन माझ्या वडीलांची आई म्हणजेमाझी आजी थोडी नाराज झाली. सतत काम करूनही त्रास देणे, बोलणे यामुळे आई वैतागली.तरीही आई आजीला काही बोलत नव्हती. पण माझ्या पप्पांना समजल्यावर आजी आमच्यापासुनवेगळी राहायला लागली. माझे आजोबा एअसफोर्समध्ये सर्व्हीसला असल्यामुळे आम्ही क्वाटर्समध्येराहत होतो. मी लहान होते, तेव्हा खुप आजारीपडायचे. वडील त्यावेळेस नव्वदच्या दशकापासुनरंगकाम करायचे. ते एकही दिवस घरी राहत नव्हते.मी आजारी असायचे, त्यामुळे नेहमी पैसे लागायचे.पण वडील माझ्यासाठी कधीही मागेपुढे पाहत नव्हते. कधीकधी तर ते ओव्हरटाइम काम करत.मी झोपल्यावर रात्री येत. मी लहान होते. माझबालपण छान होत. आई, पप्पा , आजी - आजोबाआत्या सर्वच लाड करायचे. वडील रविवारी घरीराहत. इतर सर्वकाही कामे आईच करायची.मला नंतर दोन भावंडे झाली. आम्हा तिघांनाहीआई छान सांभाळायची. सगळ छान चालल होत.आई आम्हांला लहान असताना मामाच्या गावालान्यायची. आम्ही सगळे शाळेत जायला लागलो.मी मोठी दोन नंबर भाऊ आणि लहान बहीण.शाळा लांब असल्यामुळे आई आम्हांला शाळेत सोडवायला आणि घ्यायला यायची. कारण त्यारस्त्याने वाहनांची खुप वर्दळ असत.


वडीलांनी सांगितल्यामुळे आई रोजच यायची. आमचातिघांच्या शाळेची तयारी आणि अभ्यास यांकडे तिच लक्ष असायच. ती रोजच अभ्यास करायलालावायची. रात्री कथा सांगायची. एवढ कामकरूनही ती कधीच थकली आहे अस दाखवत नसे.सगळ छान चालू होत. अचानक पप्पांचा अपघातझाला. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांनी एकवर्षभर काम नाही केल. तेव्हा खुप कठीण काळहोता आमच्यासाठी. आम्ही लहान होतो, तरीहीआईने हिंम्मत हारली नाही. तेव्हाची परिस्थितीतिने सांभाळली. वडीलांना धीर दिला. होईल सगळठीक , हेही दिवस जातील अस ती नेहमी म्हणायची.आई कमी शिकली होती तरी तिचे विचार खुपसकारात्मक आणि प्रेरणादायी होते. तिला तीशिकली नाही याच कळायला लागल्यावर वाईट वाटायच. पण तिला शिक्षणाच महत्व समजल होत.आयुष्यात खुप चढ - उतार येतात. तसही तिच्याहीआयुष्यात येत होते, पण परिस्थितीला खंबीरपणेती सामोरे जायची. आईला बचतीची खुप सवयहोती. ती नेहमी काटकसर करायची.


आम्ही तिघेहीशाळेत जायचो. त्यामुळे पप्पांनी आईला कधीकामाला जाऊ दिल नाही. वडील एक दिवसहीघरी राहत नव्हते. दिवाळीलाही आई आम्हा भावडांना आधी कपडे घ्यायची. वडील एकटे कामकरायचे, पण आम्हा भावंडांना कधी कमी पडूदिल नाही.     आई मुलगी आणि मुलगा यांमध्ये कधीचभेदभाव करीत नव्हती. सर्वांना सारखाच बघायची.आई रोज आम्हांला चांगल्या गोष्टी सांगायची. खुप अभ्यास करा आणि नाव कमवा अस ती नेहमी आम्हांला सांगायची. सगळ बालपण चांगलचालल होत. आजोबांनी रिटायर्ड झाल्यावर क्वार्ट्ससोडल्यावर आमच स्वतःच घर बांधल. तिथे खुपछान वाटायच. शाळेत छान मैत्रीणी मिळाल्या.नवनीतुन दहावीत गेले. तेव्हा आजोबांनी माझ्यापप्पांना न विचारता घर विकल. वडील दिरू पिऊलागले. तेव्हा दहावीच वर्ष होत. आमच शिक्षण पूर्ण व्हाव यासाठी आईने आम्हा तिघा भावंडांनाघेऊन नगरला मामाकडे आली. तिथे मामांनीआम्हांला आधार दिला. तेव्हा अचानक परीस्थितीसगळी बदलली. वडील इकडेच नाशिकला होते.आई एकटीच काम करायला लागली. पुढच शिक्षणआणि घरच कस भागणार, तिला एकटीला कामकरताना पाहून मीही काम करायला लागले. मगआम्हां तिघांचा शाळेचा खर्च आणि घरच भागतहोत. पण तरीही आई हरली नाही.


त्यावेळेस तिला माझे काकांनी पुरे झाल एवढी नववी शिक्षण मुलीचअस म्हटल. ती तुझ्याबरोबर काम करेल. आईनेऐकून घेतल. तसेच ती कामाला जायची बायकाहीतिला असच म्हणायच्या. " मुलीला एवढ कश्यालाशिकवतेस, पुरे झाल एवढ शिक्षण. लग्नाच बघ.असे बोलायचे. तुम्हांला खेडेगावातील बायकांचेविचार माहीत असतील. कितीही केल तर ते अडाणीलोक... आता परीस्थिती बदलत आहे. ही चांगलीआणि अभिमानाची बाब आहे. पण आईच मतहोत की पुढे काय होईल हे आपल्याला थोडीच माहीत आहे. जर मुलींनी शिकल पाहीजे आणिस्वतःच्या पायावर उभ राहील पाहीजे. मुलींनीखंबीर असल पाहीजे. सर्व काम जमल पाहीजेत.अस ती आम्हा दोघी बहीणींना सांगायची. तिलानातेवाईक आणि बायका बोलायच्या पण ती दुर्लक्षकरू लागली. मला खुप वाईट वाटायच. पण आईम्हणायची लोकांच बोलण फार मनावर घ्यायचनाही. काम करुन शिकायच पण शिक्षण सोडायचनाही. माझ्या भावालाही आई खुप समजावयाची.चांगल माणुस होण महत्वाच आहे. आईला कमीशिकली तरी तिचे विचार शिकलेल्या मागे टाकतीलअसे होते. तिला आम्हा भावंडांवर खुप विश्वासहोता.... की ही गरीबीची परिस्थिती नक्की बदलेल.तुम्ही चांगला अभ्यास करा आणि सावलीतल काममिळवा अस सांगायची.   


आई वडील पैसे देत नव्हते, तरी काम करुनआम्हांला काही कमी पडू देत नव्हती. माझी दहावीझाली तर नातेवाईक लग्न करुन टाक मुलीच म्हणुनमागे लागले. पण तिने कुणाच काही ऐकल नाही.आईबरोबर काम करून मी बारावी केली. काॅलेजलाजाण जमत नव्हत. पण नेहमी चांगले गुण असायचे.आई पेपर असला की अभ्यास कर म्हणुन सांगायचीआणि सगळ काम स्वतः करायची. आमचा रीझल्टअसला की ती खुप खुश असायची. तिला असामाझा कींवा भावंडांचा प्रथम क्रमांक आला कीखुप अभिमान वाटायचा. काही ना काही बक्षिसद्यायची. आज मी आणि भाऊ पदवीधर आहोत.जाॅब करतो.... आणि अजुन पुढे जाण्याची स्वप्नेबघतो.... लहान बहीण तिच टीचर होण्याच स्पप्नपूर्ण करत आहे. पण एका खेड्यागावात राहूनसर्वांच्या विरोधात जाऊन तिने आम्हांला शिकवल.आमच्या पाठी उभी राहीली. आम्हांला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देते आणि तिच्यामुळेच कुठलीही गोष्ट पूर्ण करण्याच बळ मिळत अशी ही माझी आई.... मला तिचा खुप अभिमान आहे.


तिची इच्छा होती की मुलींनी शिकाव हे तिने पूर्णकरुन दाखवल. त्या कठीण काळात कुणीच आम्हांलामदत केली नाही उलट टोमणे द्यायचे. ज्या गावातील बायका आणि नातेवाईक आईला तेव्हा बोलत होते,आज तेच म्हणतात... परिस्थिती नव्हती तरी तु तिन्ही मुलांना शिकवल आणि चांगले संस्कार केले.आमचही कौतुक करतात. पण हे सगळ आईमुळेचशक्य झाल. आम्ही जे काही आहोत ते आईमुळेच.आईने आम्हांला शिकवल. त्यामुळे शेजारीपाजारीमुली आमच अनुकरण करू लागल्या. दहावी - बारावीच्याही पुढे शिकू लागल्या. गावात आता मुली कोर्सकरून , शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरउभ राहत आहेत. आम्हांला जाॅबसाठी आईनेपुण्याला पाठवल... सूरूवातीला ती सोबत नव्हती.पण तिचा आमच्यावर खुप विश्वास आहे. आतातिही सोबत आहे. आता कुणीही आम्हांला काहीबोलत नाही, उलट कौतुक करतात. आई म्हणते" लोकांचा विचार कधीच नाही करायचा.


आपण आपल्या मनाला जे योग्य वाटत तेच करायच " माझी आईने आम्हांला कधी मारलेल आठवत नाही. पण ती खुप समजुन सांगायची. आजही आई कधीच काम करताना थकत नाही. आईच्या मुळे आम्ही शिक्षण घेऊ शकलो, तिच्या आर्शिवादामुळे अजुनही आम्हांला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. तिच आमच प्रेरणास्थान आहे. तिने आमच्यासाठी खुप काही केल आता आम्ही तिला कायम आनंदात ठेवायची जबाबदारी आमची आहे. आयुष्यात आईचा आशिर्वाद नेहमीच पाहीजे.आईशिवाय जगात काहीच शक्य नाही. आईआपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. आईप्रसंगी वडीलांचीही भुमिका निभावते, म्हणुन आई नेहमी सोबत पाहीजेच. आईने खुप काहीशिकवल. तिने दिलेली शिकवण, संस्कार आणिचांगल्या विचारांची शिदोरी हे हेच आमच्यासाठीखुप मौल्यवान भेट आहे.   आयुष्यात अडचणी तर येणारच त्यांचा सामनाकरायला शिकल पाहीजे. कुठल्याही संकटात कधीच डगमगुन नाही जायच. आयुष्यात संघर्ष करायला लागला तरी हिम्मत हारायची नाही. काळ व वेळ तीच राहत नाही परिस्थिती बदलता येते. तेही आपल्याच हातात आहे. आपल्या सोबतचांगले विचार असतील तर आपल्याला सतत पुढेजाण्याची प्रेरणा देतील. आयुष्यात आपण कितीहीमोठे झालो तरी पाय जमिनीवर पाहीजे. जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही ना तोपर्यंत कुणीही आपल्याला हारवू शकत नाही. असे आई नेहमी सांगायची, ते माझ्या नेहमीच लक्ष्यात राहील.   


आईसाठी एवढच म्हणेल.... हे ज्याने म्हटलंय खूप छान म्हटलंय...     

ठेच लागता माझ्या पायी    

वेदना होती तिच्या हृदयी    

तेहतीस कोटी देवांमध्ये    

श्रेष्ठ मला माझी आई...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational