Jyoti gosavi

Inspirational

3  

Jyoti gosavi

Inspirational

माझे चंदनी खोड

माझे चंदनी खोड

3 mins
1.1K


माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिजणे झिजणे उणे लिंपायला माझे घाली सुगंधाचे लेणे

झिज केशरी तयाची तप्त्त जीवा लावी ऊटी

आत उमले भावना शांत शीतल गोरटी

माझे सुख माझे तृप्ती हीच देवपूजा त्याची

आणि झिजणे झिजणे इच्छा एक झिजायची

वृद्ध चंदन ते माझे नित्य जपले जपेन

त्याच्यासाठी आणि त्याची जीव ठेवीन गहाण

आम्हाला शाळेमध्ये इयत्ता सातवी आठवी मध्ये ही कविता होती. त्यावेळी त्या कवितेचा अर्थ कळत नव्हता. आणि जेव्हा तो अर्थ कळू लागला तेव्हा खूप उशीर झाला होता

माझे वृध्द चंदन माझ्यापासून लांब गेले होते पुन्हा कधीच न येण्यासाठी

जशी आपल्या लेकरासाठी जीव टाकणारी, टाकी टुकीने संसार करणारी, कोंड्याचा मांडा करणारी सर्वांची आई असते तशीच माझी आई होती. त्या काळामध्ये सातवी फर्स्टक्लास झालेली. खरेतर ती एखाद्या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून रिटायर व्हायची. पण नशिबा पुढे कोणाचे काय चालत नाही पुढे एक वर्षाचा कोर्स, वडील म्हणाले मी देतो. पण नंतर लग्न झाल्यावर काही जमले नाही. त्यांच्या गरिबी च्या संसारात ती आयुष्यभर कष्ट उपसत राहिली. मी तीन वर्षाची असताना मला वडीलांकडे ठेवून एक वर्षाचा शिवणक्लास डिप्लोमा तिने माहेरी राहून मोठ्या जिद्दीने पूर्ण केला. घर संसार याला मदत करण्यासाठी तिने शिवणक्लास चालवले, तिने बालवाडी चालवली, पण अत्यंत मागास खेडेगाव असल्यामुळे तिच्या कष्टाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. गावाकडील जत्रा दिवाळी इत्यादी कमाईचा काळ वडिलांच्या बरोबरीने रात्र-रात्र ती शिलाई मशीन वर पण बसायची. काजे बटन पण करायची जेव्हा दोघे दिवस-रात्र मेहनत करत तेव्हा 80% उधारी आणि 20% रोखीने असा काळ असल्याने कुठे हातातोंडाची गाठ पडायची.

पण विचाराने मात्र अत्यंत पुढारलेली होती आम्ही तिघी बहिणी, आम्हाला भाऊ नाही आणि पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात त्यांनी तीन मुली नंतर थांबण्याचा निर्णय घेतला.

पण आम्हा तिघींना आपल्या पायावर उभे केले चांगले शिक्षण दिले त्यांच्या कृपेने सरकारी नोकऱ्या देखील लागल्या.

जेव्हा तिला नातेवाईक म्हणत " पद्मा" कशाला मुलींना शिक्षण देतेस शेवटी त्या लोकांची धन आहेत तेव्हा माझी आई अभिमानाने सांगायची मुली जरी असल्या तरी त्या मुलाप्रमाणे आहे त्यांची नोकरी हा त्यांचा भाऊ.

माझी आई सर्व गोष्टीत निपूण होती

ती शिलाई मशीन चालवायची, बालवाडी चालवायची, शेतातील कामे देखील बाहेरच्या कामवाल्या बायकांच्या बरोबरीने करायची . वृत्तीने धार्मिक होती दर श्रावणामध्ये आमच्याकडे रामायण ,  हरिविजय, गणेश पुराण, शिवलीलामृत इत्यादी गोष्टींचे ग्रंथवाचन माझी आई करायची ऐकण्यासाठी आसपास मधील दहा-एक स्त्रिया जमायच्या. आमचे घर खुल्या विचाराचे होते. वडील घरकामात आईला मदत करत त्यासाठी लोकांची टिंगल टवाळी देखील त्यांनी सहन केली. अध्यात्म, राजकारण, चालू विषय, इतिहास या गोष्टीचा दोघांकडे खजिनाच होता त्यामुळे त्यांनी आम्हाला समृद्ध आणि सुसंस्कृत केले. गावात लायब्ररीही नव्हती पण शाळेतील लायब्ररीतून ओळख काढून आम्ही स्वामी ,राजा शिवछत्रपती,राऊ, झुंज झेप अशा कितीतरी कादंबऱ्यांचे सामायिक वाचन करत असू वडील शिलाई मशीन वर, आई स्वयंपाक घरात आणि मधल्या उंबर्‍यावर बसून आम्ही मोठ्याने वाचन करून ती कादंबरी संपवत असू. त्यांनी आम्हाला वाचनाची गोडी लावली जगाकडे बघण्याची दृष्टी दिली दोघेही कायम पॉझिटिव विचाराचे होते.

पण परमेश्वराने जेव्हा आम्ही तिघी कमावत्या झालो आणि सुखाचे दिवस आले ते त्यांना बघून दिले नाहीत

दोघांचाही शेवट मात्र आजारपणामध्ये झाला आणि बिछान्यावर खिळून झाला

आज जेव्हा मी पन्नाशीमध्ये आहे तेव्हा असं मनाला खूप वाटतं की त्यांच्यासाठी आपणाला काही करता आलं नाही याची खंत वाटत राहते


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational