माझा जीवनाचा प्रवास
माझा जीवनाचा प्रवास
एका दिवशी आम्ही सर्व मित्र मैत्रिणी शाळेत बसलो होतो. तेव्हाच आमच्या लक्षात आला की चला काहीतरी नवीन गोष्टींबद्दल विचार करूया. त्या दिवशी आमचे शाळेची दहावीची परीक्षा संपलेली. शिक्षकांशी भेटायला गेलो होतो पण तेव्हा नववीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा चालू होती तर शिक्षकांनी आम्हाला सांगितलं काही वेळ तुम्ही बसा. मग आम्ही सर्व मित्र बसलो आमचे शाळेची मुख्याध्यापिका नारखेडे मॅडम होती. त्या आम्हाला खूप लाड करत होत्या. त्यांचा मान्य होतं मुलांना एकच विचारत पडलं नाही पाहिजे. खूप सारे गोष्टींचा विचार आणि त्याबद्दल माहिती काढली पाहिजे. त्यावेळी आम्ही आमच्या एका प्रवासा बदल विचार करत होतो. तेव्हाच आमच्या लक्षात आलं की आम्ही पहिली ते दहावीपर्यंत जीवनामध्ये खूप सारे कष्टांना बघून जे आज इथपर्यंत पोचलोय तो तर एक जीवनाचा प्रवासच आहे. आमची सवय होती की काहीही झालं त्याबद्दल शिक्षकांशी विचार विमर्श करायला पाहिजे. त्यानंतर सर्व मुलींनी आपआपलए प्रवासाची विचार करून सांगत होते. आमच्या जीवनाचा प्रवास खूप मोठा होता कारण की त्यात शाळेचे शिक्षकांसोबत आम्ही बसलेलो ज्यांनी आम्हाला घडवण्यात इतकं मेहनत केली. आमचे छोटे मोठे प्रश्नांचे उत्तर सांगायचे ते आम्हाला समजावून सांगणे आणि जर आमच्यापेक्षा चुका झाली तर आम्हाला दंड देण्याच्या ऐवजी याची पासून होणारे नफे आम्हाला सांगायचे. मानवत मुलांना जोपर्यंत आपण समजवत नाही किंवा त्यापासून होणारे वाईट गोष्ट सांगत नाही तोपर्यंत त्यांना समजणार नाही. त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितलेली, की मानव जीवनात चुका करूनंच नवीन गोष्टी शिकतो. शिवाय तो शिकणार नाही कारण की जोपर्यंत आपल्यावर ती गोष्टी होत नाही जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव होत नाही तोपर्यंत आपण समजणार नाही. आमचे शिक्षकाने आम्हाला सांगितलं होतं की पूर्ण पृथ्वी एक रंगमंचा आहे आणि या पृथ्वीवर आम्ही असलेले मानव एक कलाकार आहोत. काही वेळांसाठी जो जीवन आपल्याला भेटलेला आहे त्या जीवनाचा लाभ घेऊन काही मोठं काम करून जायचा आहे. जर आपण काहीही केलं नाही तर हा जीवन आपला व्यर्थ आहे. आणि या व्यर्थ जीवनाचा आपल्या काय काम असेल जर आपण या पृथ्वीवर येऊन या जन्मात येऊन काहीही केलं नाही तर जन्म घेऊन आपला काय फायदा. गरजेचा आहे जर तुम्ही या पृथ्वीवर आला आहात ज्या आई-बाबांनी तुम्हाला या पृथ्वीवर आणून पूर्ण संसार तुमच्यावर सोडला आहे त्या आई-बाबांसाठी तुम्ही काहीतरी करायलाच पाहिजे. आमचे शिक्षकांसोबत आम्ही दहा वर्ष राहिलो त्यांच्याशी खूप सारे गोष्टी शिकायला आम्हाला भेटले. माझे वर्गशिक्षक राठोड सर होते. ते आम्हाला खूप सारी गोष्ट सांगत होते त्यांनी या सृष्टीवर किंवा या पृथ्वीवर होणारे खूप सारे गोष्टींची माहिती आम्हाला दिली. आमची इतिहासची शिक्षिका वंदना मॅडम त्यांनी आम्हाला इतिहासाबद्दल इतिहासात झालेले खूप सारे गोष्टींची माहिती दिली. अभ्यास कसा बनलात इतिहास कसं बनवू शकतो आपणही आपला इतिहास लिहू शकतो हे सर्व त्यांनी आम्हाला सांगितलं. या सृष्टी वर नवीन नवीन गोष्टी कसे येतात ज्याचा नाव विज्ञान आहे त्याची शिक्षिका सुमन आणि योगिता मॅडम होती त्यांनीही आम्हाला खूप सारे गोष्टींबद्दल माहिती सांगितलं. पूर्ण विश्व कसं जगायचं ते आम्ही त्यांच्यापासूनच शिकलो आणि मी त्यांची खूप आभारी आहे कारण की त्यांच्यामुळे मी माझ्या जीवनात काय करायचं आहे माझं लक्ष काय आहे ते समजलं मला.
हे सर्व गोष्टी सांगताना मला माझे शाळेची आठवण आली मी माझ्या शाळेपासून जेव्हा लांब आली जेव्हा आपल्या जीवनाची नवीन पायरी चढायला आली तेव्हा त्या शिक्षकांनी आम्हाला जे शुभेच्छा दिलं त्यामुळे मी या जीवनात अजून एक लक्ष समजून आपलं एक जीवन जगत आहे. ज्यामध्ये मला एकच गोष्टीची आवश्यकता आहे ते माझ्या आई-बाबांचा माझ्यावर विश्वास. कारण की जर त्यांनी माझ्या इतकं साथ दिला नव्हता तर मी इथपर्यंत पोचली नव्हती. पर्यंत पोहोचणारे माझे शिक्षक आणि माझे आई-वडील त्यांच्याच मुळे मी आज माझ्या जीवनाचे सर्व लक्ष समजून एकच मार्ग वर चालत आहे. मी माझ्या जीवनात कधीही चुकीचा मार्गावर गेली नाही. कारण की त्या शिक्षक माझ्यासोबत होते त्या आई वडिलांचा विश्वास होता. हा पूर्ण गोष्ट मी माझ्या मनात विचार करत होती. तेवढ्यात आमचे शिक्षक आले आणि बोलले कसा आहात बाळांनो तुमच्या गेल्यानंतर तुमची खूप आठवण येते. मी पण बोल म्हणालो, या शाळेतून लांब जाणं आमच्यासाठी पण खूप कठीण आहे. तुमच्याकडे परत आलोय आमच्या जीवनाचा खूप सारे शंका आहेत ज्याचा तुम्ही निवारण करा. शिक्षक बोलल्या आले आमचे शंका चे विद्यार्थी आयुष्यात नवीन नवीन गोष्टी शिकणे यांची सवय आहे आणि कुठल्याही गोष्टींवर सल्ला ची गरज असेल तर ते आमच्याकडे येतात आणि आज पण ते इथेच आहेत. आम्ही बोललो मॅडम आता या शाळेतून निघालोय तर काय आम्ही परत या शाळेत कधी येऊ शकणार की नाही ते बोलले ही शाळा तुमची पहिली मंदिर असते ज्या मंदिरात तुम्ही कधीही येऊ शकता कोणीही तुम्हाला काहीही बोलणार नाही. कारण की या शाळेचे तुम्ही विद्यार्थी आहात आणि या मंदिराचे पुजारी. आमच्या शाळेत माता शारदेचा एक मोठा चित्र होता. तुमची शाळा कधीही अस्वच्छ राहायची नाही आमचे शाळेचे मामा काकी लोक त्या शाळेला स्वच्छ ठेवायचे आणि आमचाही कार्य हेच होता की कधी आमची शाळा स्वच्छ असायला पाहिजे. कारण की मंदिर कधीही अस्वच्छ नसतो देव तिथे वास करतो. आणि या शाळेचे देव त्या शाळेचे शिक्षक होते जसं घरचे देव आई वडील आणि मंदिराचे देव तसेच त्या शाळेचेही स्वच्छ असणे गरजेचे असतो. त्यानंतर आम्ही शिक्षकांनाही सांगितलं मॅडम आमच्या जीवनाचा प्रवास तरी आहेच काय आम्ही जीवनात आतापर्यंत प्रवास नाही केलं. सांगितलं जीवनात इतका मोठा प्रवास करूनही तुम्ही आता जर असं बोलणार की प्रवास केलं नाही तर काय सांगायचं. पहिली ते दहावीपर्यंतचा प्रवास काय तुम्ही विसरला हे पण तुमच्या जीवनाचे सर्वात मोठा प्रवास आहे कारण की इथूनच तुमची जीवनाची पुढची पायरी ची सुरुवात होते. आपल्या जीवनाचे खूप सारे गोष्टी कधीही विसरू नका आपल्या शाळेची आठवणी आपल्याकडे ठेवा कारण की हीच तुमच्याकडे मोठी गोष्ट आहे. आपल्या जीवनात जर माणूस सर्वात मोठा प्रवास करतो ते आहे आपल्या शाळेचा प्रवास. कारण की तीच शाळा तुम्हाला घडवते. त्यात शाळेने तुम्हाला एक नवीन लक्ष दिला आहे. आणि त्याच शाळेतून तुम्ही खूप सारे गोष्टी शिकलात त्याच शाळेने तुम्हाला शिक्षकांशी भेट दिला आहे. ही तीच शाळा आहे जिथे तुम्ही येऊन नवीन नवीन गोष्टी शिकत होत्या कितीच शाळा आहे जिनी तुम्हाला आत्मविश्वास कसं ठेवायचं ते शिकवला शाळेतूनच तुमची मैत्रीण झाली जेवणाच्या वेळी सोबत बसून सर्व मित्र मैत्रिणी जेवायचे कधीकधी शिक्षकांनाही द्यायचे. मोठे मोठे कष्ट आले पण तुम्ही हे शिकले आहे मोठी गोष्ट आहे सर्वात कारण की जीवनात सर्वात मोठी गोष्ट हीच असते. आपण जोपर्यंत शिक्षण घेत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होत नाही शिक्षण जर सुरू झाली म्हणजे जीवनाचा प्रवास सुरू झाला. आमच्या दहावीच्या वेळी कोरोना नामाची एक महामारी होती. ज्यातून झिजून आम्ही दहावी शिकून पुढचे प्रवासात आलो. दहावीतील आमच्या सर्व मित्रांचा आणि माझा नंबर खूप चांगला होता शिक्षकांनी आम्हाला बधाई दिली आणि सांगितलं की पुढेही असाही शिक्षण करा कधीही वाईट मार्गाकडे जाऊ नका. एक वेळा वाईट मार्गात गेल्या तर तुम्ही परत तुमचा लक्ष शोधू शकणार नाही. तेव्हापासून आम्ही आमच्या विचार घेऊन आमचे सर्व मित्र आपापल्या शिक्षणात गेलो. नंतर आमच्या जीवनाचा एकच लक्ष होता की आता आपला करिअर बनवायचा आहे ज्या शिक्षकांनी आमचा इतका साथ दिला आहे त्यांचा नाव मोठा करायचा आहे आपल्या आई वडिलांनी ज्यांनी आपल्याला शिकण्याची संधी दिली त्यांचा नाव करून या जीवनाचा अंत होऊन जायचा आहे. या जीवनाला व्यर्थ करायचा नाही काहीतरी करूनच जायचा आणि मी आणि माझे सर्व मित्र या लक्षात लागलो तेच आमचा जीवनाचा प्रवास आमच्या जीवनाचा प्रवासात आमचे शिक्षक आणि आई वडिलांचा खूप साथ आहे आणि आमचे मित्रांचा आहे कारण की आमची मैत्रीण शाळेपासून जी सुरू झालेली ती आताही तसेच कायम राहिली आहे.
मी माझ्या जीवनाचा प्रवास खूप मोठा केला आहे त्यामुळे मला खूप सारे कष्ट आले आणि त्या कशातून कसं लढायचा ते माझे आई वडील आणि शिक्षक यांनी मला समजलं आहे. त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोचली आहे. आणि या प्रवासात माझे शिक्षकांसोबत आई-वडिलांसोबत माझ्या मित्रांचाही खूप साथ आहे. त्यांच्या सोबत असणे हे माझ्यासाठी खूप गरजेचा होता कारण की जर ते नसले असते तर मी इथपर्यंत इतका कॉन्फिडन्स ने आली नसत. माझ्या आत इतका आत्मविश्वास आणणारे ते लोकांचा मी खूप आभार मानते त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोचली त्यांचा मनापासून मी त्यांचा खूप सन्मान करते आपल्या जीवनात काहीही झालं मी त्यांना कधीही विसरणार नाही. कारण की माझ्या जीवनाच्या प्रवासात ते सर्व माझ्यासोबत उभे होते आणि आजही आहे जर मला काहीही कष्ट आलं तर ते माझ्यासोबत आजही उभे राहणार आहेत. खूप खूप आभार माझ्या जीवनाचा प्रवासात तुमचा साथ दिल्याबद्दल जर तुम्ही नसला असता तर मी इथपर्यंत पचली नव्हती. तुमच्यामुळेच मी पर्यंत पोचली तुमच्यामुळेच मी जीवनाचा प्रवास काय असतो ते मला कळलं धन्यवाद माझे आई-वडिलांचा आणि शिक्षकांचा आणि माझे ते मित्र ज्यांनी माझा साथ आज पर्यंत आणि माझे जीवनाचे प्रवासात देतात त्यांचा तुमच्यामुळे मी इथपर्यंत आज आहे आणि तुमच्यामुळेच मी कोणासमोर ही काहीही बोलू शकते मला कोणत्याही घाबर नसते तुम्ही माझे असा मित्र आहात ज्यांच्यामुळे मी माझ्या जीवनात काहीही करू शकते. जसा माझ्या आई-वडिलांनी आणि शिक्षकांनी माझा साथ दिला आहे तसेच तुम्ही आहात ज्यांनी मला कधीही वाईट मार्ग जाऊ दिलं नाही. यांच्या पेक्षा कोणीही मोठा नसतो कारण की हेच असतात ज्यांनी जीवनात काय होऊ शकता आणि काय नाही आपल्या जीवनाचा प्रवास किंवा आपल्या जीवनात चुकीची गोष्ट काय आहे ते समजावणारे असतात यांचा सन्मान खूप गरजेचा असतो. जीवनात यांच्यापेक्षा मोठा स्थान कोणालाही नाही. मनापासून आभार तुमचा.
लाड तुम्ही दिला प्रेम तुम्ही दिलं,
साथ तुमचा जेव्हा हवं तेव्हा भेटलं.
मला कशाची गरज नाही फक्त तुमची गरज आहे जेव्हा तुमची गरज पडेल तेव्हा तुम्ही माझा साथ द्या.
सर्वात मोठा स्थान तुमचा तुम्हीच माझे सर्व काही.
