Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

krishnakant khare

Tragedy Others

4.5  

krishnakant khare

Tragedy Others

माझा बाप शेतकरी

माझा बाप शेतकरी

4 mins
6.0K


मी शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला अभिमान आहे कारण माझा बाप शेतकरी आहे माझा बाप एक गरीब शेतकरी आहे.

 आम्हाला पोटापाण्यापुरतं शेत जमीन आहे, आम्हाला या शेतातून पिक येण्यासाठी दिवस-रात्र झटतोय, भूमिपुत्र काय असतय ते मला माझ्या शेतकरी बापाबरोबर शेतात काम करताना उमगलंय.

या शेतातून पीक काढण्यासाठी महिनोन् महिने राब राब राबतोय, हे धरती आमचे माय आहे हेच कळतंय.धान्य पिकवून  मोती माणकं पिकवल्याचा आम्हाला आनंद होत असतो. आम्हा शेतकरी मुलां मधूनच देशसेवेसाठी जवान म्हणून या धरती मातेच्या संरक्षणासाठी मिलीट्रित जात असतो, म्हणून तर लालबहादूरांचे घोषवाक्य म्हटललं आठवतं“जय जवान, जय किसान” लाल बहादुर शास्त्रीजींची किती मोठी दूरदृष्टी होती, याची कल्पना येते. आपला भारतदेश हा शेतीप्रधान देश आहे. म्हणून भारतात बहुतेक जण शेती करत असताना दिसतो. पण प्रत्येक शेतकऱ्याला सरकारकडून सवलतीच मिळतात असं नाही कुणाकुणाची तर परिस्थिती फारच बिकट होऊन जाते कारण आम्हा गरीब शेतकर्यांना पिकवलेल्या मालाला योग्य हमीभाव मिळत नसतं मग आम्ही शेतीसाठी घेतलेला कर्ज कसं फेडू शकतो, आम्ही हप्ता देऊ का ना देऊ याची आम्हाला चिंतेची नेहमी टांगती तलवार असते, असेच आम्ही कर्ज बळी ठरलेले शेतकरी असतो मग आम्हाला कर्ज फेडण्यासाठी मोठ टेन्शन असतं मग काहीच पर्याय नसला मग आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नसतो. म्हणजेच सरकारने वेळीच लक्ष द्यायला हवंना. पुर्वी तर शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट असायची, कारण सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी वर्षानुवर्ष जायची, घरात सण वगैरे काही करायलाच मिळायचं नाही, अहो सणासुद सोडा साधं आमचं उदरनिर्वाह व्हायला मुश्किल व्हायची.त्यातल्या त्यात वर्षानुवर्ष शेतात राबून ते शेत आपलं नाही हीच गोष्ट शेतकऱ्यांसाठी मोठी दयनीय होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने शेतकऱ्याला सुद्धा न्याय मिळू लागला “कसेल त्याची जमीन” असा कायदा झाला यात उद्देश हा एकच होता की शेतकरी शेताचा मालक रहावा व त्याला त्या शेतातून व्यवस्थित पीक पाणी घेता यावे, कर्जाने हैरान झालेले शेतकऱ्यांना सुद्धा कर्जातून मुक्ती देण्यात आली होती त्यामुळे कर्ज घेणाऱ्याकडून होणारी आर्थिक छळवणूक थांबली. पण मग शेतकऱ्यांना शेतीसाठी,शेतीच्या खतासाठी ,शेतीच्या पिकासाठी व शेतीच्याविकासासाठी कर्ज कोण देणार मग नेत्या पुढाऱ्याने पुढाकर घेऊन व सरकार मार्फत बँकांकडून मदत म्हणून कर्ज योजना आली. सरकार कडून शेतकऱ्यांसाठी योजनांचा राबता झाला, पण खरंच गव्हर्मेंट कडून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या योजनांचा लाभ होतो का याची खात्री करून घ्यायला हवी पण कोण खात्री करून घेतो हा प्रश्न फार बिकट आहे. सरकारच्या अशा काही तुटपुंजी मदतीने शेतकऱ्याला खरंच मदत होते का?, रक्षण मिळते का ? हा प्रश्नच मोठा गहन आहे. जरी माझा बाप शेतकरी असला आणि आम्ही शेतकरी असतो तरी आमचा प्रश्न दिवसेनदिवस बिकट होत चाललेला आहे, मी वयात आल्यावर माझ्या शेतकरी बापानी माझं लग्न करायचं ठरवलं पण काही अशा मुलीच्या बापाने ,मुलीने साफच नकार दिला कारण शेतकरी मुलगा शेतीभाती करून उदरनिर्वाह करू शकतो परंतु काही कारणाने पीक पाणी नाही आलं मग , आणि मुलीच्या नवऱ्याने शेतीच्या टेन्शनमुळे आत्महत्या केली तर आमची मुलगी विधवा होण्यापेक्षा,त्यापेक्षा आमची मुलगी कुमारिका राहिलेलीच बरी म्हणून आता शेतकऱ्याच्या लग्नाच्या मुलाला मुलगी पण नवरी म्हणून द्यायला तयार नसतो हीच काय फार मोठी शोकांतिका झालेली आहे, पण मी शेतकी विषयात पदवीधर झालो आहे, आता मी माझी शेत जमीन आधुनिक रित्या उपजाऊ बनवून माझ्या आधुनिक शेतकी ज्ञानाने शेतात भरगोस धान्य पिक विन व जनतेला माझ्या शेतातल्या धान्य कसदार देईन व मी माझ्या शेताची जोपासना आधुनिक रित्या करेन माझा बाप शेतकरी असताना त्याला आधुनिक शेती जमले नाही ते मी जमवून दाखवीन, मुलगी हुशार असेल तर ती माझ्याशी लगेच लग्न करायला देखील तयार होईल, मी शेतीच्या न्यायासाठी लढ लढेन पण आत्महत्या करणार नाही. मी शेतकरी माझा बाप शेतकरी त्याचा मला कायमच स्वाभिमान राहील,

ज्यांची शेतीभाती, जमीन जुमला फार मोठं असे धनदांडगे शेतकरी गरीब शेतकऱ्यांच्या सोयीसुविधा सुद्धा खायलाच टपलेले असतात, त्यामुळे धनिक शेतकरी अधिक धनवान झाला तर गरीब शेतकरी अधिकच गरीब झाला आणि त्यात दुसरं शेतकरी शेतात राब राब राहतो व पिकं झाल्यावर जर का त्याच्या पिकाला योग्य भाव मिळाला नाही तर तर कर्ज कसे फेडणार मग त्याला आत्महत्येशिवाय पर्यायच नाही असं वाटणार आणि मग शेतकरी आत्महत्या करायला मोकळं होतो. 


पूर्वी माझा बाप शेतकरी दुसऱ्यांच्या शेतात शेत पिकवायला जायचा मी माझ्या डोळ्याने बाप शेतकऱ्याचं हाल पाहिलेले आहेत, आम्हाला मजुरी देखील बरोबर मिळत नव्हती पण स्वातंत्र्य सेनानी श्री.रा.वी.भुस्कुटे साहेबांच्या अथक प्रयत्नाने माझा बाप शेतकरी यांना न्याय मिळवून दिला, वेठबिगारासारखा राबवून घेणे थांबलं होतं.

आम्हा शेतकऱ्यांची पाणीपावसात फारच दयनीय अवस्था असते.  आम्हाला वेळेवर जेवायचं सुद्धा भान नसतं तरी आम्ही देहभान विसरून धान्य पिकवतो, ते धान्य देशवासीयांना मिळतो आणि ते जग त्या धान्यावर जगतं. शेतकरी त्याच्या प्रामाणिक शेतकी कामांमध्ये तो काय जेवला? त्यांनी काय मेहनत घेतली? याची पुसटशी कल्पनासुद्धा आपल्या देशवासीयांना नसेल पण शेतकऱ्याला यातच धन्यता वाटते की आपल्या शेतातल्या काबाडकष्टामुळे देशवासीयांना वेळेवर अन्न मिळते, त्यांच्या उदरनिर्वाहाचा गरजा भागतात. आपल्या भारतातील माझ्या बाप शेतकऱ्या सारखे शेतकरी आणि शेतात अहोरात्र मजुरी करणारे शेतमजूर ह्यांना पण ताठमानाने जगू द्या त्यासाठी सरकारचं आणि आता नागरिकांचं पण लक्ष असलं पाहिजे. तसं पाहिलं तर शेतकरी हा देशवासीयांचा एक अन्नदाता नम्र सेवकच आहे .  

म्हणून तर मला माझ्या बापाचं सार्थ अभिमान आहे, स्वाभिमान आहे कारण 

“माझा बाप शेतकरी ! ह्यातच खूप काही आलं!”


शेतकऱ्याच्या मुलाला आपल्या बापाबद्दल काय वाटत असेल आणि स्वतःला आपल्या पारंपारांगत शेतकी विषयाला बद्दल काय म्हणायचं ? पण आपण शेतकरी असल्याचा स्वाभिमान सोडता कामा नये कारण शेतकरी आहेत म्हणून तर जगातल्या देशवासीयांना अन्न मिळते हे विसरून चालणार नाही हीच कल्पना सादर केली आहे.

   


Rate this content
Log in

More marathi story from krishnakant khare

Similar marathi story from Tragedy