माईक.. कॅमेरा अॉन!
माईक.. कॅमेरा अॉन!
हॅलो..हॅलो...
आवाज येत नाही...दिसत नाही.... मोठ्याने बोला.. नेट नाही..
हे आज काल रोजच प्रत्येकाच्या घरातुन कानावर पडणारे परवलीचे शब्द! लहान-मोठे, गरीब-श्रीमंत सर्व सारखेच!
काळ कसा पटकन बदलला नाही का?
बचत केलेला पैसा महागडा स्मार्ट फोन, स्वस्तातल भरपूर जीबीच फ्रि डेटा कनेक्शन घेण्यात खर्च केला! हो करावाच लागला! एक वेळ खायला पैसे नसेल तरी चालेल पण लेकीचे शिक्षण नीट झाले पाहिजे.. असे लीलाबाई बडबडत होत्या.
एकुलती एक मुलगी दहावीला होती यंदा, करोनामुळे शाळा बंद, अॉनलाईन अभ्यास करायचा!
दोन वेळचे जेवायला मिळण्याचे वांदे, चार दोन घरची धुणी भांडी, छोटे मोठे काम करत लीलाबाईंनी लक्ष्मीचा एकटीने सांभाळ केला. कोणी जवळचे नातेवाईक असे कोणी नाही, तीला स्वतःलाच तीची ओळख नक्की कोणाची हे सांगता येत नाही, पोरीला चांगल शिकवून मार्गी लावावे हे एवढे एकच स्वप्न पाहात ती आज पर्यंत जगत आली.
लक्ष्मीलापण ह्याची जाणीव होती, आहे म्हणून एवढ्याश्या खोलीत गोंगाटात ती अभ्यास करत उत्तम मार्कांनी आत्तापर्यंत शिकत आली, वर्गात नेहमी पहिल्या पाचात असते.
मैत्रिणी आहे म्हटले तर भरपूर, व तसे कोणीच नाही.
वर्गशिक्षिका पाटील बाई तीला जीव लावत व जमेल तसे तीला मदत करत.
दोघीच माय लेकी राहत म्हणून लोकांच्या वाईट नजरापण खूप असत. त्यामळे त्यांचा स्वभावपण फटकळ होता!
करोनामुळे कुठे काम पण करता येत नव्हत राजरोझपणे, तरी लीलाबाई जवळच्या सोसायटीत काम करत व परत येत, तो पर्यंत लक्ष्मी आपला अभ्यास करे घर आवरून सावरूण ठेवत!
एकदा तीची अॉनलाईन शाळा सुरू होती, लीलाबाई घरात पाऊलच टाकत होत्या तर त्यांना मोठ्याने कोणी 'माईक.. कॅमेरा अॉन करा' असा बोलण्याचा आवाज आला. असे एक दोन वेळा एकल्यावर त्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली.. त्या रागा रागात घरात गेल्या व लक्ष्मीला ओरडायला लागल्या, तीला काहीच कळले नाही असे आई का वागते. काय झाले तीला, इकडे मोबाईल वर तीचा माईक, कॅमेरा अॉन होता, बाई व इतर मुली पण गोंधळून गेल्या, लक्ष्मीलापण मोबाईलवर चालणारा अॉनलाईन वर्गातुन बाहेर पडता आले नाही.
पाटीलबाईंना थोडी कल्पना आली, आई चिडलीचा, त्यांनी आॉनलाईन वर्ग बंद केला!
थोड्यावेळाने लक्ष्मीला फोन केला, लिलाबाईंनी तो हिसकावत बाईंवरच ओरडायला लागल्या. बाईंनी शांतपणे सगळे ऐकले. लीलाबाईंचा राग ओसरला तश्या त्या बाईंना विचारू लागल्या तुम्ही मुलींना 'माईक.. कॅमेरा अॉन' करा असे का सांगता? त्या काय सिनिमात काम करणार का? मला माझ्या मुलीला सिनिमात नाही पाठवायच, दहावी पास झाल्यावर डॉक्टर बनवायच, मी काम करेल हवे तेवढे व पैसा जमा करेल तीच्या शिक्षणासाठी.
बाईंना आधी काही कळत नव्हत लीलाबाईच बोलण, मग लक्षात आले, माईक.. कॅमेरा हे सिनिमामध्ये रेकॉर्डींग, शुटिंगच्या वेळी कानावर पडणारे शब्द आहेत जे आई म्हणून लीलाबाईंना मुलीची काळजी करायला लावत होते.
दुसर्या दिवशीच्या वर्गात बाईंनी हे शब्द न वापरताच शिकवल!
लक्ष्मीला पण छान वाटले, गैर समज दूर झाला आईचा!
कॅमेरा अॉन मुळे उगाच वर्गात अवघडून बसावे लागायचे, घरातले सामान बघून मुली हसायच्या, पण ती ते तेवढे मनावर घेत नसे. अभ्यासात लक्ष जास्त घालायच, चांगले मार्कस् मिळवून आईची मान उंचवायची, आपले स्वप्न पुर्ण करायचे!
करोनामुळे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्या नाही पण आधीच्या वर्गाचे, शाळेतल्या स्वाध्यायाचे गुण एकत्रित करून निकाल लागणार होता! ठरल्या प्रमाणे तो लागला!
लक्ष्मी वर्गात, शाळेत, गावात पहिली आली १००% मिळवून.
अभिनंदनाचा वर्षाव तीच्यावर सुरू झाला!
त्यांचे कौतुक करण्यासाठी शाळेन एक अॉनलाईन वर्ग घेतला, लक्ष्मीला व तीच्या आईला खास आमंत्रण दिले होते.
पाटील बाईंनी लक्ष्मीला 'माईक.. कॅमेरा अॉन' कर सांगितले तसे लीला बाईंना हसू आले व त्यांना ते आवरता आले नाही, स्वतःला आपल्या लेकीला अॉनलाईन मोबाईलवरच्या पडद्यावर बघतांना खूप आनंद झाला व डोळ्यातून अश्रू ओघळू लागले!
हा वर्ग रेकॉर्ड होत होता, सर्व पालक, मुली, शाळेतल्या बाईंनी लीलाबाईंच व लक्ष्मीच खूप कौतुक केल. घरी येण्या आमंत्रण दिले, पैश्याची मदत व पुढच्या शिक्षणाचा खर्च आम्ही उचलुचे आश्वासन दिले!
लीलाबाई 'माईक.. कॅमेरा अॉन' चाच मनात विचार करत होत्या!!
