लॉकडाऊन दिवस - ४
लॉकडाऊन दिवस - ४
२८/०३/२०२०
Dear Diary,
आजचा दिवस आयुष्यभर लॉकडाऊनची आठवण देत राहणार. संध्याकाळी ATM मधून पैसे काढायला गेलो होतो. सोबत भाऊ पण होता. नेमकं पैसे काढून येताना पोलिसांनी अडवलं. झालं! आता २-४ फटके खाण्याची मनाची तयारी केली. पण त्यांनी नवा उपक्रम राबविला. सर्वांना एका बाजूला घेतले. आरतीचे ताम्हण आणायला लावले आणि चक्क नाम ओढून आमची ओवाळणी केली. आणि सोबत पुष्पांचा वर्षावही केला.
हे कमी म्हणून की काय या सर्वाची चित्रफीत पण काढली. खूपच लाज वाटली तेव्हा. मनाशी ठरवलं पुन्हा घरचा उंबरा ओलांडायचा नाही. हा सर्व कार्यक्रम आटोपून घरी पोहोचेपर्यंत आमचा तो व्हिडिओ गावभर व्हायरल झाला आणि थोड्याच वेळात लोकांच्या व्हॉटसअप स्टेटसला झळकू लागला. सुदैवानं माझा मोबाईल बंद असल्याने मला कुणाचे स्टेटस वगैरे दिसण्याचा प्रश्न नाही. तेवढेच काय ते मनाला समाधान. पण हा प्रसंग कायमचा मनात घर करुन राहणार हे मात्र नक्की.