Sagar Durgule

Others

2  

Sagar Durgule

Others

गुढी

गुढी

1 min
279


25/03/2020

प्रिय डायरी,


आज मराठी नववर्षाचा पहिला दिवस आणि लॉकडाऊनचाही पहिलाच दिवस. कालच माननीय पंतप्रधानांनी २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. त्या विनंतीवजा आदेशांची अंमलबजावणी आजच्या सामसूम गल्ली, रस्ते यांनी दाखवून दिली. आता पुढील २१ दिवस घरी राहून काय करायचं असा प्रश्न एका भटकंती करणाऱ्या दुर्गवेड्याला नाही पडला तरच नवल. आतापासूनच गुदमरल्यासारखे होत आहे. पण कोरोनाच्या महामारीपासून वाचायचं असेल तर घरी राहणे हा एकमात्र उपाय आहे. म्हणून आज गुढी उभारली ती या कोरोनाला पिटाळून लावण्याचा संकल्प करूनच!


Rate this content
Log in