Sagar Durgule

Others

3.5  

Sagar Durgule

Others

लॉकडाऊन दिवस - ३

लॉकडाऊन दिवस - ३

1 min
276


आज जाग आली ८ लाच. पण अंथरुणातून बाहेर यायला १० वाजले. तसंही लवकर उठून पूर्ण दिवस कसा व्यतीत करायचा हा त्या मागचा मतितार्थ. उठलो, मोबाईल घेतला आणि नेहमीसारखं चार्जिंग ला लावला पण काही केल्या चार्जिंग च होईना. बराच खटाटोप करून झाल्यावर समजलं की चार्जिंग पोर्ट खराब झालंय. वाह! यालाच तर नाही म्हणत का 'दुष्काळात तेरावा महिना'? मानवाची चौथी प्राथमिक गरज होऊन बसलेल्या आणि वेळ घालवण्याचं उत्तम संसाधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्तूला पण आता मुकावं लागणार होतं. कारण दुरुस्त करायचा म्हटलं तरी दुकाने बंद सगळी १४ तारखेपर्यंत. आता जगायचं कसं माझ्यासाठी जागतिक प्रश्न भासतो आहे. जाऊदे. झोप ही पण एक गरज च आहे तर तूर्तास झोपायचा प्रयत्न करून बघूयात.


Rate this content
Log in