लॉकडाऊन दिवस - २
लॉकडाऊन दिवस - २
1 min
239
२६/०२/२०२०
Dear Diary,
सकाळी लवकरच उठलो. आवरले आणि म्हटलं नियोजन करायचं या लॉकडाऊन् मधील २१ दिवसांचं. नवीन काहीतरी शिकायचं, ऑनलाईन कोर्सेस करायचे, वेब सीरिज संपायच्या, नियमित व्यायाम करायचा वगैरे वगैरे आणि इतक्यात फोन वाजला. ऑफिसमधून होता. आणि काय ते असतं ना वर्क फ्रॉम होम वगैरे करण्याचं फर्मान आलं. फोन ठेवला आणि पुढील २१ दिवसांचा विषय सोडून दिला. आजचं नियोजन करूया म्हटलं. आणि सालाबादप्रमाणे आताही नियोजनबद्ध एक छोटीशी गोष्ट देखील झाली नाही आज.
तात्पर्य- परत कधीही फाजिल आत्मविश्वास बाळगून नियोजन न करणे.
