लॉकडाऊन दिवस - ५
लॉकडाऊन दिवस - ५

1 min

218
आज दिवसभर नुसता कॅरम आणि लुडो खेळण्यात च गेला अथवा घालवला. कालचा प्रसंग विसरण्यासाठी किंवा मन दुसरीकडे विचलित करण्यासाठी. फक्त दुपारी जेवायचा काय तो ब्रेक घेतला असेल. परत आणि खेळायला चालूच. एकदा खेळायला बसलं की वेळ कधी जातो समजतच नाही. आज अचानक पाऊस आला.तो ही वादळी वाऱ्यासोबत गारा घेऊन. भिजू वाटत होते पण परत मनाला आवरलं. बऱ्याच दिवसांनी आजचा दिवस कसा गेला हे कळलंच नाही.