लॉक डाऊन दिवस-5
लॉक डाऊन दिवस-5


बघता बघता लॉकडाऊनचे चार दिवस कसे गेले ते समजलं नाही. पण आता मात्र आपल्या कसोटीची, जिद्दीची, संयमाची वेळ जवळ येत चालली होती. कारण आता दिवस जसे जात होते तसं तो न दिसणारा अतिशय भयानक असा जिवाणू त्याचा विश्व तयार करण्यामध्ये 1-1 पायरीने यशस्वी पद्धतीने वाटचाल करत होता.
परवा दिवशी मी माझ्या मित्राला कॉल केला होता, त्यावेळी मला ना काहीतरी विचित्र झाले असेल असे वाटत होते. मात्र तो माझा अंदाज काही अंशी खरा ठरत होता अचानक मला त्याचा फोन आला. आणि तो सांगू लागलं किती अशी भयंकर स्थिती त्यांच्या परिसरामध्ये होत चालली होती. तो सर्व वर्णन करत असताना, खरंच अक्षरशः डोळ्यांमध्ये अश्रू अनावर होते, कारण ही परिस्थिती अतिशय गंभीर होत चालले होती. तरीसुद्धा लोक त्या या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नव्हते. कधी जाणो त्यांना समजेल असे वाटत होते. गव्हर्नमेंट त्यांच्या परीने संपूर्ण प्रयत्न करत होते. जीवनावश्यक गोष्टींचे नाव सांगून असे अनेक लोक गरज नसताना फिरत होते. असे करून ते स्वतः त्या विषाणूला आपल्याकडे आमंत्रण देत होते. असेच सर्व घडत असताना सहज दूरदर्शन चालू केलं, संपूर्ण जगाची स्थिती फार नेस्तनाबूत झाली होती. आपल्या देशावर ती परिस्थिती येऊ नये म्हणून प्रत्येक जण आपल्या परीने अखंड असे परिश्रम घेत होते. स्वतःचे कुटुंब, आई-वडील, मुलं-बाळं ,नातेवाईक सर्वांना बाजूला सारून ते जणू देशासाठी उद्भवलेल्या परिस्थितीत खंबीरपणे साथ देत होते. खरंतर आता आपले कर्तव्य होते...