लोकशाही × दंडेलशाही
लोकशाही × दंडेलशाही
पुन्हा पुन्हा का ?घडतं इथ कोणा अधिकारयाने प्रामाणिक राहून ठामपणे, निष्ठेने, व न भिता आपले कर्तव्य केले.की गुन्हेगार किंवा, असे काम बेकायदेशीर, समाजविघतक कृत्य करणारया, त्या घटकाला मग तो सर्वसामान्य असो अथवा कोणी बडी आसामी चा पोरगा,नातेवाईक असो ही प्रकरण पुर्ण पणे कायद्याच्या अंतर्गत असतात .पुढील प्रक्रीया निर्णय घ्यायला न्यायालय आहेत की !पंरतु नाहीं एकवेळ सर्वसामान्य व गरीब मनुष्यचा अवधानाने जरी काही गुन्हा झाला तरी तो जन्म भर जेल मध्ये सडेल पंरतु तीच गोष्ट किंवा त्याहुन, भयंकर गुन्हे जर मोठ्या प्रसिद्ध उद्योगपती, राजकारणी किंवा फिल्म स्टार च्या पोरांकडून झाली तर? पैशाच्या धुंदीत मस्त, बेताल झालेल्या नशेबाज,अथवा रस्त्यात मानसांना चिरडून खून करणारया, ड्रग गांजा च्या पार्टीत बेधुंद होणारयांना रंगेहात पकडणारया प्रामाणिक व जबाबदार अधिकारयाविरूद्ध ,बरळ ओकायला पिसाळलेलया कुत्र्यांच्या झुंडी मातलया आहेतच ईथ.का इतका पुळका येतो त्यांना .जे सर्वसामान्यांसाठी कधी इतका कांगावा नाही करत तोच नेता या बड्या लोकां साठी घसा फाडून नको ती चिथावणीखोर गरळ का ओकतो जी खरंतर हास्यास्पद व पोरकट असते.मंता च्या पेट्या वाढविण्यासाठी नको तितक्या खालच्या स्तराला का जातात हे लोक. आरोप,प्रत्यारोप, पुरावे,फोटो,सीडी,कागद, सारयांची चिरफाड आता हे नेतेच करणार मग न्यायालय कशासाठी?कायदा,वकीली पुरावे ,व न्याय सारंच ईथले नेते करतात मग लोकशाही आहे का दंडेलशाही?हा साधा प्रश्न निर्माण होतो.जर एक व्यकती आपले कर्तव्य पार पाडतोय तर करूदे ना त्याला त्याच कामं निष्ठेने आपण तर बरबटले आहात सत्तेच्या धुंदीत मस्त आहात मग तीथली जबाबदार?पार पाडा की!कांही मोजका प्रामाणिक लोकं आहेतच की अजूनही जे सौदा नाहीं करतं आपल्या ईमानाचा नाहीतरी इथे माता महणविणारया देशाला विकायला काढुन भाडवलदांराचे पाय घट्ट रूजवण्याची सुरुवात झालेलीच आहे. निदान कोणाच्या इमानदारीवर आगपाखड करुन डगमगायला भाग नका पाडू सत्तेच्या गैरवापर करुन. तुम्ही तुमच्या क्षेत्रात काय गोंधळ घालतात ते लोकच ध्यानात ठेवतिल.त्या वेळी जो हक्क बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवुन दिलाय.मतदानातून!!ज्या लोकशाहीला तुमच्या सारख्या हुजरयांनी मरणाच्या दारात आणुन ठेवलेय.
