लोकल...
लोकल...
लोकल.....जशी एक स्वतंत्र स्वभावाची बाई. ठुमकत चालणारी, कधी वेळेवर तर कधी उशीराने, मात्र नक्की येणारी.
हातातल्या घड्याळाकडे बघत पाठीवर जबाबदाऱ्याचं ओझं घेऊन स्टेशनवर धावणाऱ्या हजारोंना ती रोज सामावून घेते कोणाशी काहीही न बोलता.
लहान असताना शाळेत सोडायला आणि आणायला जशी आई यायची तशी ती येते सोडायला आणि आणायला...
कुणाच्या चेहऱ्यावरचा थकवा ओळखत नाही, पण तरी थकल्यानंतर तिच्याच सीटवर थोडा वेळ डोळे मिटले जातात,कुणी काहीतरी आठवून रडतं, कुणी हसतं, कुणी दमून झोपून जातं, ती सगळ्यांना सामावून घेते तरी रोज शिव्या खाते उशीर झाल्याबद्दल, गर्दीबद्दल, घाणेरड्या डब्यांबद्दल तरीही ती दुसऱ्या दिवशी पुन्हा तयार असते जणू काहीच झालं नाही.
ती रागावते, नखरे करते, पण अखेरच्या स्टेशनपर्यंत पोहोचवते.
ती कोणाची कोणच नाही पण सगळ्यांसाठी ती कोणतरी खास आहे....
ती लोकल आहे!!!!!!!
