komal Dagade.

Tragedy Action Inspirational

4.0  

komal Dagade.

Tragedy Action Inspirational

लग्नगाठ

लग्नगाठ

6 mins
480


गिरीजा उच्चशिक्षित, दिसायला सुंदर पण तिच्या लठ्ठपणामुळे किती तरी स्थळानी तिला नकार दिला होता. आधी खूप स्थळ येत होती,पण गिरीजाला शिक्षण घेऊन जॉब करायचा होता. स्वतःच्या पायावर उभं राहून मग लग्नाच्या बेडीत अडकायचं होतं.


आता स्वतःच्या पायावर उभी होती, पण त्याबरोबर वय आणि वजन या दोन्हीनी तिचा घात केला होता. त्यामुळे पस्तीस स्थळ पाहूनही लग्नाचा बंध जुळून येत नव्हता.


थोरल्या भावाचं म्हणजे अमरच लग्न झालं होतं. तिचे बाबा स्टेशनरीच दुकान सांभाळत होतें. शिवा लहानपणापासून त्या दुकानात काम करत.त्याबरोबर शिक्षण घेत होता.त्याचीही परिस्थिती बेताचीच होती. गिरीजा आणि शिवा एकमेकांचे मित्रच होते. पुढे गिरीजा शिक्षणासाठी बाहेर पडली.


गिरीजाही परिस्थितीने मध्यम वर्गीय होती . उच्च शिक्षणामुळे तिला जॉब पण चांगल्या पगाराचा लागला, पण गिरीजाच लग्न काही केल्या जुळून येत नसल्याने सगळेच घरातील टेन्शनमध्ये होतें.


गिरीजासाठी तिच्या काकांनी एक नात्यातील स्थळ सुचवलं . घरातील सगळे बातमी ऐकून खुश झाले. तिच्या आईने देवासमोर साखर ठेवली. हा योग तरी लग्नाचा जुळून येऊदे अस देवाला सांगत होती.गिरीजा मात्र शांत होती. कारण आतापर्यंत पस्तीस स्थळं पाहून झाली होती.तिचं या सगळ्यातून मन उडल्यासारखं झालं होतं.


दुसऱ्या दिवशी कांदे -पोह्याचा कार्यक्रम उरकला. समीर उच्च शिक्षित होता. सुरुवातीला पाहून गेले. ती पसंद असल्याचेही कळवले. दोघं एकमेकांशी बोलू लागले. रोज फोन मेसेज दोघांचे सुरु होतें. गिरीजा खुश होती.


गिरीजा एके दिवशी समीरला म्हणाली, समीर मला वाटत लग्नाचा खर्च दोन्ही घरांनी अर्धा अर्धा करायला हवा. कारण आमची परिस्थिती एवढी नाही रे . आधीच बाबांच्या डोक्यावर कर्ज आहे,आणि दादाला त्याचा संसार एक मुलगा आहे. त्यामुळे आम्ही सगळं एकट्यानेच करण्यापेक्षा तुम्हीही हातभार लावावा अस मला वाटत. तू मला समजून घेशील ना समीर ...!


"तिच्या बोलण्याने तो काही बोलला नाही, तिलाही त्याच वागणं काही समजलं नाही. ती त्याच्या विचारातच घरी आली, घरी आल्यावर समिरचाच कॉल तिला आला.


गिरीजा आमच्याकडे पद्धत आहे.मुलीच्या घरच्यांनीच लग्नाचा खर्च करायचा असतो, तुज्याशी मी लग्न करायला तयार झालो हेच तुझं नशीब समज. मला कितीतरी चांगल्या मुली मिळतील. मी तुझं शिक्षण आणि नौकरी बघून तयार झालो. त्याच बोलणं ऐकून गिरीजाच्या डोळ्यासमोर अंधार येत होता. हा फक्त तिच्या नौकरीच्या पैशावर लग्नासाठी तयार झाला होता.


तिच्यावर त्याच प्रेम नव्हतच, तिच्या पैशावर होतं. तिच्या डोक्यात रागाची सनक गेली. त्याला बोलून मोकळं व्हावं अस तिला वाटत होतं. तिने संयम ठेवून फोन कट केला. एवढ्या दिवस ती खुश होती. आज एका क्षणात दुःखाच डोंगर तिच्या आयुष्यात पुन्हा पसरलं. तिच्या समोर समिरचा खरा चेहरा आला.


तिने त्याला नकार देयचं ठरवलं. आधी बाबांना कल्पना देयचं ठरवलं. डोळे पुसून ती उठली.


"आईने काय झालं विचारलं, तर तिने सरळ सांगितलं.आई मला नाही लग्न करायचं समिरशी. तो माझ्यावर प्रेम करत नाही तर माझ्या पगारावर, पैशावर प्रेम करतो. मी त्याला लग्नाचा अर्धा अर्धा खर्च करू म्हणाले,तर मला सरळ म्हणाला," तुझ्याबरोबर लग्न करतोय तुझं शिक्षण, नौकरी बघून त्याला माझं काही देणं घेणं नाहीच आहे. माझ्यावर लग्न करून उपकार करतोय अस दाखवतोय.


"मी काय करायला हवं होतं....?तू सांग..?ती आईला म्हणाली.


गिरीजा कशाला तू खर्चाच समीरला काही म्हणालीस, आम्ही केली असती ना काहीतरी तजवीज....!


आई तजवीज कशाला..? कर्ज काढून तुम्हाला कर्जात ठेवून मला नाही लग्न करायचं.


"अग बाळा तुझं लग्न होणं गरजेच आहे. आता जास्त बघून उपयोग नाही. त्यामुळे आपल्यालाही कुठेतरी जुळूवून घेतलं पाहिजे. त्यात यांनी तुला पसंद केलंत.हेच आपल्यासाठी मोठ्ठ आहे. आईचं बोलणं पाहून गिरीजाला रडूच आलं.


आई त्यांनी मला नव्हतं केलं पसंद.माझ्या पैशाकडे बघून केलं होतं.

आता मी ठरवलंय मला लग्नच नाही करायचं. गिरीजा अस बोलून तिच्या रूममध्ये निघून गेली.


तिच्या आईला तिची जास्त काळजी सतावत होती.


"देवा कसं होईच माझ्या पोरीचं.....?तूच यातून वाट दाखव रे अस म्हणून तिची आई कामाला लागली.


संध्याकाळी बाबा घरी आले,तिच्या आईने बाबांच्या कानावर सगळ्या गोष्टी घातल्या. बाबा गिरीजाला म्हणाले, गिरीजा आईने मला सगळं सांगितलं.तुला जे योग्य वाटल तो निर्णय घे. आम्ही तुझ्या पाठीशी असू. तिच्या दादाने पण तिला तिच्या निर्णयाला प्रोत्साहन केले. तिला मनावरील ताण हलका झाल्यासारखा वाटला.


संध्याकाळी तिच्या वहिनीची दादासमोर चिडचिड चालली होती. तुम्ही तिला कशाला अस बोललात. कुठे तरी नमतापणा घेयला हवा ना. "किती दिवस आपण पोसणार. माझी आहे का कसली हौस. किती दिवस अजून असेच काढायचे.


अमर अग शांत राहा जरा...!तुझीच बहीण असती तर...? अशीच बोलली असतीस का...? अस बोलून अमर चिडून तिथून निघून गेला.


सकाळी सकाळी समिरचा कॉल तिच्या बाबांना आला. त्यांनी सरळ नकार देऊन कॉल कट केला . गिरीजा आज आनंदात कामावर गेली.मनावरील ताण तिच्या कितीतरी पटीने कमी झालेला होता.


आज तिचं पेमेन्ट ही झालं होतं.संध्याकाळी कामावरून घरी जाताना सर्वांसाठी गुलाबजाम, आई आणि वाहिनीसाठी साडी घेऊन ती घरी गेली . दारातून पाऊल ती घरात टाकणार तर आई आणि वहिणीचं बोलणं ऐकू येत होतं. ते ती ऐकते.


"आई किती दिवस ताईना आपण बिनलग्नाचं ठेवायचं. विधुर,मुलबाळ असणारा घटस्फोटीक स्थळपण पाहायला सुरुवात करू.


गिरीजाला ऐकूनच किती ओझं आहे या घरासाठी तिला समजल.तिला ते शब्द ऐकून रडूच येत होत.


तिथेच गाडीची चावी देण्यासाठी आलेला शिवा हे सगळं ऐकतो,त्याला खूप वाईट वाटतं गिरीजाच. लहानपणापासून तो तिला पाहत आलेला असतो. तिचा स्वभाव, समजदारपणा हेही त्याच्या चांगलंच ओळखीचं असतो .


शिवा न राहवून बोलतोच," काय बोलताय तुम्ही एवढ्या चांगल्या मुलींसाठी ,अशी स्थळं शोधणार का...??


आता कोण राजकुमार येणार का लग्न करायला, तिची वहिनी बोलते.


हो राजकुमार येईल,


तुम्ही या घेऊन त्याला..., वहिनी बोलते.


मीच आहे तो, तो रागातच वहिनीला बोलतो.मी करेन लग्न त्यांच्याशी...!त्यांना मान्य असेल तर...!


वहिनी आणि आई एकमेकींकडे बघतात,


बाबाना दादांना खूप आनंद होतो, कारण लहानपणापासून तो त्यांच्या सहवासात वाढलेला असतो. तिच्या बाबांना तर वाटत असा शिकलेला, निर्व्यसनी, हुशार मुलगा माझ्या मुलींसाठी योग्यच आहे. असा मुलगा शोधूनही सापडणार नाही.


गिरीजाला शिवाच बोलणं ऐकून दुसरा धक्का बसतो. तीही लहानपणापासून त्याला मित्र म्हणून बघत आलेली असते. पण त्याच्याशी लग्न तिने स्वप्नातही विचार केलेला नसतो.


गिरीजा घरामध्ये जाते, सगळे तिच्याकडे पाहत असतात. नजर चोरत ती तिच्या रूममध्ये जाते.


गिरीजा जरा बाहेर येतीस का....?बाबा तिला बोलवून सगळं सविस्तर सांगतात." बाबा मला वेळ हवाय विचार करायला, अस म्हणून ती तिच्या रूममध्ये निघून जाते.


दुसऱ्या दिवशी ती शिवाला भेटायला जाते, शिवाला तर तिच्याशी काय बोलाव सुचत नसते.


शिवा मी तुला चांगला मित्र मानते, कधी असा विचार तुझ्या बाबतीत होईल मला वाटलंही नव्हतं.


शिवा, "जे मला त्यादिवशी वाटल ते मी बोललो, तुला मी लहानपणापासून बघत आलोय.तुझ्याविषयी वाईट नाही सहन करू शकत.


"म्हणजे माझी कीव आली तुला...?


तसं नाही ग गिरीजा ..! तू मला आवडतेस..! पण सांगण्याची कधी हिम्मत झाली नाही तुला...? त्यात तू मला पसंद करशील की नाही या विचाराने तुला मी बोललो नाही. तुला जो काही निर्णय घेयचा आहे तो घे. मला मान्य असेल.


गिरीजाला आनंद झालेला असतो, तशी परिस्थिती त्याची बेताचीच पण कष्टाळू वृत्ती असते. तसं पाहिलं तर बाकीच्या मुलांसारखं कोणतही व्यसन नसतं.

साधा गरीब मुलगा असला तरी चालेल पण तिची किंमत करणारा, आदर करणारा पाहिजे होता.कारण आतापर्यंत पाहिलेली मुलं लग्न करून तिच्यावर उपकार करताहेत अशी दाखवत होती.


गिरीजा,"मग देशील ना आयुष्यभरासाठी साथ., तो तिच्याकडे चमकून पाहतो.


ती हसत म्हणते, माझा अपमान तुला सहन झाला नाही. हेच माझ्यासाठी खूप आहे. अशी साथ आयुष्यभर देणार असशील तर मी लग्नाला तयार आहे.


शिवाला खूप आनंद होतो. गिरीजा हसत असते. चल एक कॉफ़ी घेऊयात त्यानिमित्ताने गिरीजा म्हणते. जवळच्याच हॉटेलमध्ये दोघे कॉफ़ी घेण्यासाठी जातात. गिरीजाचा आनंद तर सातवे असमानो पे असाच काहीसा होता. शिवाचीही तिच परिस्थिती होती.


गिरीजा बाबांना लग्नाला तयार असल्याचे सांगते. घरात क्षणात आनंद पसरतो. वहिनी तर नाक डोळे मोडत बरं झालं बाई ठरलं एकदाच अस मनात म्हणत असते.


आज तो दिवस उगवलेला होता . ज्या दिवसाची ती आतुरतेने वाट पाहत होती . गिरीजा वधू वेशात अगदी शोभून दिसतं असते. आई तिच्या डोळ्यातील काजळाची तीत तिला लावते." किती सुंदर दिसतीये माझी पोरं....! अगदी दृष्ट लागण्यासारखी. आईच मन तिला वधू वेशात पाहून भारावून गेलेल असत.लग्न अगदी साध्या पद्धतीने, मोजक्या लोकांच्यात पार पडत.


आज तिची पाठवणी करताना सगळ्यांना भरून आलेलं होतं. सर्वांच्या पाया पडून नवं विवाहित जोडपं आशीर्वाद घेत होतं .या दिवसाची वाट घरात सगळे पाहत होतें . वहिनीच्या डोळ्यातही अश्रू होतें.


आई रडत रडत घट्ट मिठी मारते, गिरीजालाही अश्रू अनावर होतात. वहिनी म्हणते, "ताई रडू नका सासरी जाताना हसत जावा. संसार सुखाचा होईल तुमचा.आम्हाला विसरू नका. वहिनी पुन्हा तिच्या गळ्यात पडून रडू लागते. काळजी घ्या. येथील काळजी करू नका. नवविवाहित जोडपं गाडीत बसत. गिरीजा हसत सर्वांचा निरोप घेते.



*********समाप्त **********


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy