Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

Alka Jatkar

Tragedy

3.1  

Alka Jatkar

Tragedy

लग्न

लग्न

2 mins
10.2K


परवा एका मैत्रिणीच्या मुलीच्या गेले होते. 'वर्किंग डे' होता. सव्वादहाचा मुहूर्त होता. एकीकडे ऑफिसला जाण्याची घाई असलेल्या लोकांसाठी बुफे तयारच होता.

वधूवरांवर शेवटची अक्षता पडताक्षणीच सर्वांची पावले बुफेकडे वळली. क्षणार्धात लांबच लांब रांग तयार झाली. रांग कमी होण्याची वाट पाहत मी डिश गोळा करणाऱ्या मावशींच्या जवळच उभी होते.

पुन्हापुन्हा रांगेत यावे लागू नये म्हणून अनेकजण एकदाच भरपूर वाढून घेत होते डिशमध्ये. पण ऑफिसला जाण्याची घाई आणि जेवणाची खरं तर नसलेली वेळ यामुळे बऱयाच जणांना आपल्या डिशमधील सर्व पदार्थ संपवता येत नव्हते. कसेबसे चार घास चिवडून त्यांनी डिश गोळा करणाऱ्या मावशीच्या हातात डिश दिली की मावशीचा चेहरा एकदम पडे. अशी भरलेली डिश हातात आली की मावशींना ती पटकन कचऱ्याच्या डब्यात रिकामी करवत नसे. डिशमधील अन्नाकडे निराशेने एक नजर टाकून अगदी नाईलाजाने त्या डिश केराच्या डब्यात रिकामी करत.

माझे जेवण होईपर्यंत मी मावशीचे निरीक्षण करत होते. माझे जेवण सावकाश आटोपून मी मावशींच्या हातात डिश दिली. पूर्णपणे संपलेली डिश पाहून मावशींच्या चेहऱ्यावर समाधान दिसले.

मी मावशींना विचारले, " मगासपासून पाहतेय, डिशमधील अन्न कचऱ्याच्या डब्यात टाकताना तुम्हाला खूप त्रास होतोय. तुम्हाला पोटभर जेवण देतात ना कार्यालयवाले ?"

मावशी खिन्नपणे म्हणाल्या " मला मिळते ओ ताई, पन गावाकडे माझी लेकरं उपाशी हैत. खरतर आमी शेतकरी, पन शेतीत पोट भरना म्हनून शहरात आलो कामधंदा बघायला. चांगली जागा कुठं भेटेना राहायला म्हनून मुलास्नी गावालाच ठेवलं बघा. म्हातारा म्हातारी बघतात त्यांच्याकडे. ती समदी उपाशी हैत वो तिकडं, आन हिकडं ह्ये येवढ सार अन्न वाया जातंय बघा. लै तरास होतो ओ " एक आवंढा गिळत त्या पुढे बोलू लागल्या. जणू सारे त्यांचे दुःख त्या माझ्यापुढे मांडू इच्छित होत्या. "आमी हाडाचे शेतकरी हाय वो, ह्ये गहू,भात, भाजीपाला पिकवायला काय तरास पडतो ते आमालाच ठाव. आन तुमी शहरी मानस कसं खुशाल टाकून द्येता ? लै जीवाला लागत बगा "

मी सुन्न ! मावशींना काय उत्तर द्यावे मला समजेना. कसनुसं हसत मी तेथून काढता पाय घेतला.


Rate this content
Log in

More marathi story from Alka Jatkar

Similar marathi story from Tragedy