STORYMIRROR

Sanjay Ronghe

Classics Others

3  

Sanjay Ronghe

Classics Others

लग्न - राणी भाग 3

लग्न - राणी भाग 3

3 mins
227

   नाईकांच्या मनात उद्या काय काय करायचे याचे प्लॅनिंग सुरू होते. त्यांना उद्या बरेच काम करायचे होते. त्यासाठी त्यांनी सुट्टी घेण्याचे पक्के केले . तसा त्यांनी मेसेज त्यांच्या वरष्ठांना दीला आणि ते सुट्टी साठी निश्चिन्त झाले. आता उद्याला ते ठरवलेले काम आरामात करू शकणार होते. आज राणीला पण नितु मीतू च्या स्कुल मध्ये जायचे होते. सगळेच सकाळपासून आपापल्या कामात व्यस्त होते. सगळयांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी झळकत होती.

    सकाळी 9 ला राणी नितु आणि मीतू सोबत त्यांच्या शाळेत गेली. तिनेच टीचर्स ना आपली ओळख नितु आणि मीतू आईच्या रूपाने करून दिली. मुले पण राणीला आपल्या शाळेतील सगळं आईचे बघ आई ते बघा करून दाखवत होते. आई आणि मुलांचे बंधन जुळले होते. तिघेही खूप खुश होते. टीचर्स नि दोन्ही मुले अभ्यासात खूप हुशार असल्याचे राणीला सांगितले. आणि घरीही त्यांच्या अभ्यासाकडे थोडे लक्ष देण्याची राणीला सांगितले. टीचर्स शी संवाद करून ती घरी परत आली.

    राणीच्याअगोमाग नाईकही बाहे निघाले. बाहेर निघताच नाईक पाहिले आपल्या बहिणी कडे गेले. आणि बहीण आणि बहीण जवायांना सोबत घेऊन ते पंडितांच्या घरी पोचले. पंडितांशी त्यांचा वडिलांच्या काळापासूनचा घरोबा होता. ते वेळी अवेळी नाईकांना खूप मदत करायचे. पंडित नावाप्रमाणेच पूजा अर्चा , लग्न, मंगल कार्याचे विधिवत कार्य पण करून द्यायचे. कुंडली राशी भविष्य, पण बघायचे. नाईकांनी त्यांना राणी आणि त्यांच्या होणाऱ्या सबंधा बद्दल सांगितले त्यावर त्यांना पण खूप आनंद झाला . त्यांनी विवाहाचा शुभ दिवस काढून दिला आणि सम्पूर्ण कार्य विधी नुसार करण्याचे नाईकांना दिले. येणारा गुरुवार त्यासाठी निश्चित करण्यात आला

कार्यक्रम अगदी साधा आणि कमीत कमीत लोकांच्या उपस्थितीत पार पडायचे निश्चित झाले. पंडितांनी कार्यक्रमास लागणाऱ्या साहित्याची सर्व जवाबदारी स्वतः कडेच घेतली. तिथे जवळच असलेल्या मंदिराच्या सभागृहात कार्यक्रमाची जागा निश्चित करण्यात आली. कॅटरर कडे जेवणाच्या व्यवस्थेची जवाबदारी देण्यात आली. बिछायत वगैरे पंडितच मंडळाकडून करून घेणार होते. आता फक्त प्रश्न कपड्यांचा उरला होता. सगळी मंडळी पंडितांना घेऊन तिथूनच रेडिमेड सेन्टर ला पोचले. तिथेच त्यांनी राणीलाही बोलवून घेतले. सगळे कपडे रेडिमेडच घेऊन नाईक मोकळे झाले. आता लग्नाची संपूर्ण व्यवस्था झाली होती. फक्त गुरुवारी आता मंगल कार्य तेवढे बाकी होते.

     होता होता गुरुवार उजाडला. सगळे आज पहाटेच जागे झाले होते. सगळ्यांनी आपापली तयारीही आटोपली. आणि सगळे मंदिरात पोचले. मुहूर्त सकाळी नऊ तीस चा ठरला होता. पंडित ही अगोदरच तिथे पोचले होते. सगळी व्यवस्था आटोपली होती. पंडितांनी नऊ लाच आपली पूजा सुरू केली. आणि बरोबर नऊ तीस च्या शुभ मुहूर्तावर राणी आणि नाईकांचे शुभ मंगल पार पडले. मोजकेच लोक तिथे हजर होते. लग्न आटोपताच . जेवण ही तयार होते. सगळेच खूप आनंदात होते. रितू मीतु च्या खुशीला तर पारावरच नव्हता राहिला. लग्न कसे आनंदात पार पडले. राणी आता नाईकांची अर्धनगिनी झाली होती. तीही खूप आनंदात होती. आता तिचीही जवाबदारी वाढली होती. मुलांना पण त्यांची आई मिळाली होती.

या लग्नाने सगळेच खूप खुश होते. सगळ्यात जास्त खुशी मुलांना झाली होती. कारण त्यांची आई गेल्यापासून ते अबोल आणि शांत झाले होते. आई गेल्याचे दुःख त्यांना जास्त बोचत होते. मधल्या काळात त्यांच्याकडे लक्ष द्यायला नाईकांकडे फारसा वेळ नसायचा आणि जो काही वेळ मिळायचा त्यात तेच स्वतः आपल्या दुःखाच्या विचारात असायचे. राणी आल्यापासून मात्र मुलांच्या आईची संपूर्ण जवाबदारी तिनेच उचललेली होती. त्यामुळे मुलेही थोडे आनंदात असायचे. त्यांच्या खाणे पिणे, कपडे, हवे नको सगळ्याच गोष्टी राणीने खूप चांगल्या रीतीने सांभाळल्या होत्या. आणि आता तर ती त्यांची आईच झाली होती. घरात आता आनंद फुलायला लागला होता . नाईकांच्या अर्धा नव्हे तर पूर्णच घरातला भार राणीने उचलला होता. आता ती घरात लागणाऱ्या भाजी पाला, धान्य, किराणा मुलांना के हवे नको त्याकडे सम्पूर्ण लक्ष द्यायची. स्वतः बाजारात जाऊन खरेदी करणे ही तिने आपल्या हातात घेतले होते. त्यामुळे नाईकांना खूप आराम मिळायला लागला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics