लांबसडक काळेभोर
लांबसडक काळेभोर
सगळे जण जाहिराती पाहुन कोणते केसांचे तेल कोणते लावायचे हे ठरवले जातय, केसांना कोणता शांपू लावायचा म्हणजे केस मुलायम व गळायचे थांबतील हे जाहिराती पाहुनच खरेदी केले जात आहे! मी पण आंधळेपणाणे तेच करत आहे जे सर्व सामान्य करताय!
मोठ मोठे परदेशी प्रॉडक्ट, किंती कोणते ते ठरवुन मी केसांचे तेल, शॉंपू लावत होते! उगाच दुसर्यांन समोर मोठे पणाचा आव!
लांब सडक काळे भोर केस अशी माझी ओळख होती शाळेत असतांना, किती जण मला ती,तीच न लांबसडक काळे भोर वाली.. असे म्हणायचे! माझे ही माया केसांवर खूप प्रेम होते! कोणाला ह2त लावु देत नसे, काप म्हटले तरी कापत नव्हती! कारण ती माझी एक खास ओळख होती!
बरेच मुल, मागे पुढे करायचे!
कॉलेजला गेल्यावर मुलींना शिंग फुटतात.. तसे माझे ही झाले मी पण या जाहिराती पाहुन वेगवेगळ्या कंपनीचे तेल लावायची, मग काय तर तेलकट केस झाले म्हणून शांम्पूने धुवायचे! कॉलेजला जायला घाई होते म्हणून हेयर ड्रायरने सुखवायचे! आजी वरचे वर रागवायची! कारण तीने माझे केस लांबसडक काळेभोर होयासाठी मेहनत घेतली होती.
आई नोकरी करायची मग आजीच माझ्याकडे लक्ष द्यायची, रोज छान तेलाने मालीश करायची झोपायया आधी! झोप पण छान लागायची, तेल लावता लावता आमच्या छान गप्पाही व्हायच्या! आमच्या गप्पांमध्ये आई मधे बोललेले चालायचे नाही!
तेल आजी खास तयार करायची, खोबरेल तेल व काही औषधी वनस्पती व कापूर टाकून ते काही महिने एकत्र करून ऊन्हात ठेवायची मग ते वस्त्रगाळ करायची
मग केसाला लावतांना यातील थोडे एका काश्च्याया वाटीत घेऊन गरम करायची गॅसवर मंद आचेवर! थोड गरम झाले की ते थंड करणार, मग हळुहळु बोटाने माझ्या केसांना लावणार, मग दुसर्या दिवशी शिकेकाईने केस धुवायचे, छान कोवळ्या उन्हात केस वाळवायचे, एक सोहळा असायचा माझ्या केसांना प्रेमाने वाढवायचा, त्यांना लांबसडक काळेभोर करयाचा! ह्या सगळ्या सोहळ्यात केस छान लांबसडक व कोळेभोर झाले! आजी व नातीतल प्रेमपण दृढ होत गेल!
कॉलेजला गेल्यावर शिंग फुटले आम्हाला मैत्रिणींच ऐकूण व जाहिराती बघुन ते महागडे तेल शॅम्पू वापरले व बघता बघता केसांची पार वाट लावली, केस खूप गळायला लागले!
आरामात आजी सोबत घालवलेला वेळ ही आता घालवला नाही, आजी म्हणायची ये बस थोडी माझ्या जवळ तर माझ्याकडे आता वेळ नाही, मी नंतर नंतर करत राहिली! मोठे झाले न आता आजीकडे लक्षयाला वेळ नव्हता अजिबात!
बघता बघता दिवस, वर्ष गेले मधे.. आजीपण थकली होती, अंथरूणाला खिळली होती! तरी पण मी मायाच कामात गुरफुटले होते.. नविन नविन स्वप्न पाहत होते, एक राजकुमार माझ्या लांबसडक काळ्याभोर केसांवर भाळला होता, माझ्या प्रेमात पडला होता! मलापण त्याच्याकडे बघतांना एक नविन नात फुलतय हे लक्षात येत होत!
कोणाला तरी ते मला सांगायच होत... हो कोणालातरी सांगायचे होते! कोणाला सांगु ? कोण मला समजवून घेईल? आजीचाच चेहरा समोर आला!
मग मी आजीकडे गेली तीला याया बद्दल सांगत होती, आजीने तीया थरथरया हाताने हळुवार माझ्या केसांवरन हात फिरवला! ते जाड केस आता जाड नव्हते, यातील एक चमक निघुन गेली होती..
तीने हलक्या आवाजात केसांची निट काळजी घे, ते आहे यामुळे तुयावर भाळला, जप दोघांनाही, अशेच लांबसडक काळेभोर केस चाळीशी ओलांडेपर्यंत राख ! मी निघते आता करत आजीने तीचे डोके माया मांडीवर ठेवले.. काही कळायया आतच तीचा प्राण गेला..
काहीच कळत नव्हत मला काय करायचे, डोळ्यातुन धारा लागल्या!
भानावर आले, डॉक्टरांना, आईला फोन केला काय घडले ते सांगितले,
आजीचे शेवटचे कार्य निट पार पाडले...
मनात 'लांबसडक काळेभोर', 'जप दोघांना' हेच घोळत राहिले!
मग पहिले या जाहिराती बघणे व तसे तेल शाम्पू लावणे बंद केले!
