Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Poonam Kulkarni

Classics Others

3  

Poonam Kulkarni

Classics Others

लालपरी

लालपरी

1 min
51


     माहित नाही का,पण आज परत एसटी बसेस धावणार म्हणल्यास एक विशेष आंनद झाला.बस तुम्हा आम्हा सर्वांचाच एक जीव्हाळ्याचा विषय. कुणाला आवडो न आवडो मला तर लालपरी खूप आवडते.

       जवळपास लहानपणापासूनच आपण बसच्या संपर्कात येतो(लहानपणी आपला उपयोग जागा पकडण्यासाठी केला जायचा)मग त्या जागेवर आपले आई बाबा बसायचे अन आपल्याला नाईलाजाने का होईना त्यांच्या मांडीवर बसावे लागायचे.कधी दूर गावी जाताना मग सेपरेट सीट मिळाली की मी तर मागे बसलेल्या सगळ्या व्यक्तींचं निरीक्षण करायचे.

       काही लोकांना बस चा प्रवास आणि बसस्टँड कंटाळवाणं वाटतो पण मला? छे कधीच नाही. बसस्टँड वर वेळ घालवायची एक वेगळी मज्जा असते .ते खाकीतले लोक ,त्यांच्या गप्पा ,विनोद आणि बरंच काही. प्रत्येक बसस्टँड वर उसाचा रस मिळतोच त्याचा तो आवाज आणि गर्दीचा आवाज यांची सरमिसळ भन्नाट असते.

        बस आली की लोक जे बॅग घेऊन पळ काढतात .त्यात उतरण्याऱ्या लोकांना चढणाऱ्या लोकांचा एक ठरलेला diologue ,"ए उतरा पट पट ,चढताना कसे भरभर चढतात ".बसचा भोंगा ,खायची पाकीट विकणाऱ्या लोकांचा आवाज आणि गर्दी .काय दृश्य असते!

          आणि मग येते आपली बस .मला फक्त खिडकीची सीट हवी .आणि मग माझं विश्व सुरू होत.माझं ते स्वप्ननाच विश्व!

"कांनात असते हेडफोनची दोरी

बाहेर हिरव्या हिरव्या रंगाची झाडी

माझ्या लालपरीची गोडी

नाही काही तोडीस तोडी"

            आज जवळपास 12 वर्ष झाले मी updown करत आहे ,सार सुरळीत व्हावं अन आपली ही मैत्री अशीच टिकून राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना


Rate this content
Log in

More marathi story from Poonam Kulkarni

Similar marathi story from Classics