चारानेवाला
चारानेवाला


शनिवारची दुपार म्हणजे आमच्यासाठी पर्वणी असायची..शनिवारच्या दुपारी लहान मुलांसाठी एक उत्सव राहायचा..त्यातच तो चारानेवाला यायचा..होय चारानेवाला. कोण होता हा चारानेवाला ?
चारानेवाला, वय वर्षे 75. exact नाही सांगता येणार. पण दाढी मिशिवाला धोतर नेसून एक मोठी पिवळी पेटी घेऊन यायचा. आम्हा पोरांना त्याची आतुरता असायची.. आठवडावर कसाबसा साठवलेला एक रुपया शनिवार-रविवारसाठी राखीव ठेवायचो नव्हे उडवायचो... weekend wibes होत्या त्या आमच्यासाठी. असो...चारानेवाला घंटा वाजवत यायचा अन आम्ही सगळे त्याच्या मागे .
10-15 मुलं झाली की एकामागून एक पोराला त्या पेटीतले फोटो पाहायला मिळायचे, भारी वाटायचं ..
काय होतं त्या पेटीत. त्या काळात गाजलेल्या नट-नट्यांचे फोटो होते फक्त. पण आनंद विलक्षण होता.
मला त्या पेटीची उत्सुकता असायची.ती पेटी गोलाकार होती.सर्व बाजूनी खिडक्या. एका पोराला एक खिडकी. चित्रामागून चित्र फिरत राहायची. अशी 10-12 चित्र झाली की संपला आमचा picture... अन चारानेवाला आमचा निरोप घ्यायचे..ते पुढच्या शनिवारी यायचे..परत तो कल्ला...
दिवसामागून दिवस गेले..गेले ते बालपण राहिल्या फक्त आठवणी.नंतर चारानेवाला परत आला न बालपण...
पण आजही मनाच्या एका कोपऱ्यात,निवांत क्षणात, आठवणीत चारानेवाला अन त्याचा तो घंटानाद ऐकू येतो. अन बालपणीची साद देतो. काय विलक्षण होते ते दिवस. धन्यवाद काका आमचे दिवस रम्य बनवल्याबद्दल...
तुम्ही अनुभवलाय का हा चारानेवाला??????