वांझोटी
वांझोटी
"मुक्ता मावशी,तूझे सगळे फोटोज छान आहेत .पण लग्नानंतर तू किती बारीक झाली होतिस. अगदी मनी होईपर्यंत तूझ्यात हाडच राहिलेली .काही खात बीत होतीस की नाहीस.आणि हे काय पाहतेय मी तूझ्या मांडीवर आहे अन तूझा चेहरा अगदी रडवेला, का ग असं?,"चित्रा लडिवाळ स्वरात मुक्ता ला विचारत होती
मुक्ताचा चेहरा गंभीर झाला ."हो खात होते ना ,लोकांचे टोमणे ,स्वतःचे मन अन घास गिळताना अश्रूं. नऊ वर्ष काळाच्या ठेचाही खाल्ल्या .तेव्हा कुठे कूस भरली बघ ,"मनीच्या डोक्यावरुन हात फिरवून मुक्ता मावशी आतमध्ये निघून गेली.
चित्रा मात्र निरुत्तर झाली.