आशा
आशा


मरणासन्न ...अगदी गिधाडसुद्धा घिरट्या घालतं होत तिच्या भोवती. मला मृत्यू येऊ दे अशी आर्त विनवणी करत होती ती. हात आपटून जोरजोरात रडत होती .केविलवाण्या स्वरात स्वतःचाच श्वास दाबत होती ती . प्रत्येक क्षण फक्त मृत्यची वाट पहायची ."असा का निष्ठूर वागतोय माझ्यासोबत मला देऊन दे ना मलाही मरण एकदाचं, आई ,बाबा लहानपणीच गेले .सुधीरला आयुष्यात आणलस अन आता त्याला पण घेऊन गेलास ."का? कशासाठी ?अशा नानाविध प्रश्न देवाला विचारत होती .सुधीरच्या बाबासमोर रडायचं नाही असं मनाशी खूणगाठ बांधून हे सारं दुःख सहन करत होती मंजिरी ..अन बाबांनीही हेच ठरवलं असावं .
दिवस कसाबसा निघून जायचा. मात्र रात्र खायला उठायची. भयानक त्रास आणि न संपणारं विचारांचं सत्र .नकोय हे जगणं .सपंवते सारंच ...असा राक्षसी विचार न ते fan कडे पाहणं सुरूच होत .तेवढ्यात ठक ठक .अन मंजिरी भानावर आली .काय झालं असेल बाबांना .मनात पुटपुटत मंजिरी बाहेर आली आणि बाबांना विचारलं," काय झालं बाबा, काही हवंय का तुम्हाला".बाबा उत्तरले ,"पोरी तू ठीक आहेस ना ,अचानक तूझी काळजी वाटली". बाबांच्या डोळ्यात पाणी होतं ."नाही बाबा ,मी ठीक आहे ",अगदी शांतपणे आणि नजर चुकवत मंजिरी बोलली."मला थोडंस पाणी घेऊन येशील का", बाबांनी विचारलं ."हो आणते ना बाबा", मंजिरी घाईने गेली आणि पाणी आणलं.
खूप दिवसांनी बाबा मंजिरीशी बोलतं होते. एक महिन्यांनी. सुधीर गेल्यापासून संवाद तुटला होता . घराचं छप्पर उडल्यास बाहेरच्या वादळाची जाणीव होतें. बाबा पुढे बोलू लागले,"पोरी मला तुझ्याशी बोलायचंय ,अगदी महत्वाचे."
मंजिरी आदराने म्हणाली,"हो बोला ना बाबा". इतके दिवस दाटलेला हुंदका आवरत बाबांनी मग अश्रूंना वाट मोकळी केली."हे बघ पोरी ,मी पिकलेल पान आज आहे, उद्या नाही. मला माहिती तुमच्या दोघांचं प्रेम होतं अन ते अमर आहे ,पण हे आयुष्य आहे. तूला काढायचं आहे. रथाचा एक चाक तुटलाय बाळा ,नवीन जोडावा लागेल ",बाबांनी जड मनानी बोलून सारं काही बोलून टाकलं.
"काय? बाबा... हे तुम्ही बोलताय .सुधीरशिवाय इतर कुणाचा विचार ? नाही बाबा ,नाही.ते शक्य नाही . आम्ही फक्त सप्तफेरे नाही घेतले बाबा.वचन दिलं होतं एकमेकांना. काहीही झालं तरी एकमेकांना सोडायचं नाही .एकमेकांची स्वप्न जगायची",स्वप्न ..मंजिरी अचानक बोलायची थांबली .तसे बाबा म्हणाले,"स्वप्न ,कसली स्वप्न मंजिरी बोल ना पुढे.."
१ महिन्यापासून न हसलेली मंजिरी अचानक हसू लागली डोळ्यात आसू आणि चेहऱ्यावरती हसू .."येस बाबा येस .मला जगायचंय .सुधीरच्या स्वप्नासाठी."
"स्वप्न कसली स्वप्न,मला सुधीर कधी बोलला नाही ,मला सांगशील का बाळा ,"बाबा प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.
"सांगते बाबा , सर्व सांगते ."मंजिरीने पटकन सुधीरचा laptop open केला .अन draft मध्ये save असलेला mail फॉरवर्ड केला.
बाबा हे सर्व पाहत होते .नक्कीच त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते .मंजिरीने गूढ उकलायला सुरुवात केली,"बाबा आमच्या लग्नाचा दिवस आठवतो .मी अनाथ .माझं माहेर काहीच नाही. म्हणून नाराज झालेली मी अन मनधरणी करणारा सुधीर. बाबा सुधीरच स्वप्न होतं की माझ्यासारख्या सर्व नाही पण काही मोजक्या म्हणजे निदान 12 मुलींच तरी adoption करावं .अन त्यांचं कन्यादान करावं .खूप छान स्वप्न होत त्याचं ..मी त्याचं हेच स्वप्न पूर्ण करणार आहे .एक छोटंसं माहेर तयार करणार आहे. मुलींचं हक्काचं ..अन त्यासाठी मला तुमची इच्छा साथ हवीय,आहात ना सोबत ?" ...बाबांनी लगेच डोळ्यावरचा चष्मा काढून अश्रू पोसत मोठ्ठा हा दिला अन सुस्कारा सोडत room मध्ये निघून गेले.
"अन सुधीर तुझीही,"मंजिरी खिडकीच्या बाहेर मोठ्ठा श्वास घेत पाहत राहिली .
कुठून तरी सुधीर हे सर्व पाहत होता आणि समाधानी होत होता
"आओ जिंदगी गम को छोड दु ,,, टूटी हुये कडी को फिरसे जोड दू "