Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Shital Thombare

Romance

4  

Shital Thombare

Romance

कथा तुझी अन माझी...भाग4

कथा तुझी अन माझी...भाग4

5 mins
396


'हाय ! मी प्रशांत तुझ्या जिजूंचा रमेशचा मावस भाऊ'...त्याने स्माईल देत म्हटलं... त्याला पाहून शामल जागीच थबकली...प्रशांत असा अचानक तिच्या समोर दत्त बनून उभा राहिल ...याची कल्पनाच तिने केली नव्हती...काय बोलावं तिला काहीच सुचेना....तिच्या हृदयाचे ठोके आता शंभर च्या स्पीड ने धावत होते... तिच्या तोंडून पटकन शब्द फुटले... 'बाबा ' त्याबरोबर प्रशांत ने मागे वळून पाहिलं...पण कोणीच नव्हतं...वळून शामलशी बोलणार तोच शामल तिथून पसार झालेली...शामलची मैत्रीण तिथेच जेवत होती...प्रशांत ने तिला विचारलं ...'अरे! ही कुठे गायब झाली??' तीची मैत्रीण म्हणाली ...'ती... ती तर केव्हाच पळाली...' 'अरे पण का?? मी काय खाणार होतो की काय??'....असं म्हणत प्रशांत हसू लागला.. लग्नात कित्येकदा शामल आणि प्रशांत समोरासमोर आले...पण शामल प्रशांत ला टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती...प्रशांत ने ही पुन्हा शामलशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही... रेश्मा बरोबर सासरी पाठराखण म्हणून तीची मामेबहीण सोबत जाणार होती..पण अचानक तीची तब्ब्येत बिघडली...अन तिच्याऐवजी शामलला रेश्मा बरोबर जावं लागलं...

पुन्हा प्रशांतचा सामना...दोन दिवस ते एकत्र होते... ताईच्या सासरी प्रशांत सगळ्यांचाच जरा जास्तच लाडका दिसत होता...जो तो सतत प्रशांत ला हाक मारी...प्रशांतही अगदी आवडीने सगळ्यांची कामे करत होता...त्यात लग्न घर म्हटलं की सतराशे साठ कामे...सतत आपला इकडे तिकडे धावताना दिसायचा... पण लग्नात शामलशी बोलायचा प्रयत्न करणारा प्रशांत घरी मात्र तिच्याशी अगदीच अनोळखी असल्यासारखा वागत होता.. त्यामुळे ते दोन दिवस ताईच्या घरी रेश्मा ला मुळीच अवघडल्या सारखं वाटलं नाही... रेश्मा, तिचे मिस्टर (रमेश),प्रशांत आणि शामल चौघे ही गाडी करून देवदर्शनाला गेले ...तिथेही प्रशांत अन शामल एकमेकांशी काहिच बोलले नाहीत... पण प्रशांतच्या स्वभावाची एक एक बाजू शामल अनुभवत होती...त्याचं निरिक्षण करत होती...अगदी तिच्या नकळत.. दोन दिवस ताईकडे राहून जेव्हा पुन्हा शामल आणि रेश्मा घरी यायला निघाल्या तेव्हा गाडीत प्रशांत आधीच जाऊन बसलेला... रमेशने आपल्या सासरी गेल्यावर एकट्याला बोअर होईल म्हणून जबरदस्तीने प्रशांत ला आपल्या सोबत यायला तयार केलं होतं... नाईलाजाने प्रशांत ला ही हो म्हणावं लागलं... शामल च्या घरी आल्यावर घरच्यांनी जावई आणि त्यांचा भाऊ म्हणून प्रशांतची ही चांगलीच सरबराई केली.... संध्याकाळी चौघे ही जवळच्याच पार्कात गेले....तेव्हा रमेशने मुद्दामहून विषय काढला... 'शामल आम्हांला माहित आहे बुवा तुझी एक गंमत ' शामल ला काही समजेना जिजू नक्की कश्याबद्दल बोलत आहेत... पण रेश्मा ,रमेश अन प्रशांत तिघेही एकमेकांकडे पाहत मिश्किलपणे हसत होते... 'काय झालं ?? तुम्ही तिघे असे का हसता आहात?? 'माझ्याबद्दल काही आहे आणि तुम्ही मलाच नाही सांगत आहात ...काय गं ताई... तू तर माझी बहिण ना मग लग्न झालं की लगेचच बदललीस ...तू तर पार्टीच चेंज केलीस की'....असं म्हणत शामल ने नाक फुगवलं 'अरे ! बापरे आमच्या मेहुणीबाईंना राग पण येतो का??? हे नव्हतं काही तुझ्या ताईने आम्हांला सांगितलं..' म्हणजे....ताई ने माझ्याबद्दल तुम्हांला नक्कीच काहितरी सांगितलयं हो ना?? ही ताई पण अश्शी आहे ना....जाऊ दे मी बोलतच नाही तिच्याशी... मग मात्र रेश्मा म्हणाली..'अगं गंमत करत आहेत ते तुझी...मी काही नाही सांगितलं त्यांना तुझ्याबद्दल...' काही नाही शामल तुझी ताई खोटं बोलते आहे बरं..तिने की नाही आम्हांला तुझी एक चोरी सांगितली आहे... 'प्लिज जिजू सांगा ना काय सांगितलं आहे ताईने माझ्या बद्दल तुम्हांला ....' शामल म्हणाली. 'हेच ....की ....तू ...कसं चोरून... मला पाहण्याचा प्रयत्न केलास आणि प्रशांतलाच नवरा मुलगा समजलीस...' आणि तिघेही जोरजोरात हसू लागले... शामल मात्र लाजून चूर झाली.... समोरच आइसक्रीमच शॉप होतं...आइस्क्रीम खाणार का?? विषय बदलत रमेशने विचारलं ....आणि एका सूरातच सगळ्यांनी हो म्हटलं... तुम्ही बसा मी पटकन घेऊन येतो म्हणत रमेश आइस्क्रीम आणायला गेला...पण कोणासाठी काय फ्लेवर घ्यावे त्याला काहिच समजेना...शेवटी त्याने शॉप मधूनच रेश्मा ला खुणावले ...मी आलेच तुम्ही बसा गप्पा मारत असं म्हणून रेश्माही शॉप कडे गेली... आता तिथे फक्त शामल आणि प्रशांत दोघेच होते...प्रशांत ने शामल कडे पाहिलं...ती उगाच मातीत पायाच्या अंगठ्याने खड्डा करत इकडे तिकडे पाहत होती...

'काय गं शामल मी कसा दिसतो??' .... प्रशांतने शामल कडे पाहत प्रश्न केला... प्रशांत च्या या विचित्र प्रश्नाने शामल बावरली...हा काय प्रश्न आहे ?? कसा दिसतो म्हणे... शामल ने चेहर्यावर प्रश्न चिन्ह आणत प्रशांतलाच प्रतिप्रश्न केला...म्हणजे ??काय म्हणायचयं तुम्हाला ...मी नाही समजले?? 'हेच की मी कसा दिसतो??'... चेहरा अगदी नॉर्मल ठेवत प्रशांतने पुन्हा विचारलं 'मला का बरं विचारता आहात हा प्रश्न तुम्ही ...घरून निघताना आरसा पाहिला नव्हता वाटतं...'शामल गालातल्या गालात हसत म्हणाली... पाहिला की ...अगदी नीट पाहिला आरसा ...पण काही लोक मला पाहून पळून जातात...म्हणून म्हटलं ...मी कसा दिसतो...डोक्यावर शिंग वगैरे तर नाही उगवली न माझ्या...प्रशांत ने मुद्दाम डोक्यावर हात फिरवत विचारलं... आता मात्र शामलला हसू फुटलं...'माफ करा हा !! त्या दिवशी मी अशी काहीच न बोलता तिथून गायब झाले....पण तुम्ही असे अचानक समोर आलात अन मी घाबरले...काय बोलावं सुचलच नाही...' 'ए पण काय गं ...तू तर मला डायरेक्ट नवरा मुलगाच करून टाकलसं की...बाईसाहेब मी नुकतीच F.Y ची EXAM दिली आहे...आणि तू तर मला बोहल्यावरच चढवायला निघालीस की...'...प्रशांत हसत म्हणाला... 'ते जरा चुकलच माझं...एक तर मी तुम्हाला लांबून पाहिलं...ते ही चोरून... त्यात जिजूंसोबत त्यांचा भाऊ येणार याची काही मला कल्पना नव्हती...त्यामुळे थोडी गलतीसे मिस्टेक झाली'...शामल जीभ चावत आपले कान पकडत म्हणाली ... आता मात्र दोघेही खळखळून हसू लागले... 'आणि हे काय तू मला अहो जाहो काय करतेस...अरे तुरे केले तरी चालणार आहे बरं....मला तेच जास्त आवडेल..' शामल काही बोलणार तेवढ्यात रेश्मा अन रमेश आइस्क्रीम घेऊन आले... शामल आणि प्रशांतचा संवाद तिथेच थांबला... दोन दिवस राहून रेश्मा ,रमेश आणि प्रशांत निघाले...शामल तेव्हा आपल्या ताईच्या गळ्यात पडून खूप रडली...तिचा सगळयात मोठा आधार तिला सोडून चाललेला...ताईच अन तिच नातं बहिणींपेक्षा मैत्रीच जास्त होतं... रेश्मा आपल्या सासरी चेंबूरला गेली...प्रशांत त्याच्या घरी कुलाब्याला...तर शामल होती ठाण्याला...प्रशांत आणि शामल आता कसे भेटतील बरं?? नुकतीशामल आपली प्रत्येक गोष्ट आधी ताईला सांगत असे...त्यामुळे रेश्मा सासरी जाताना सर्वात जास्त दु:खी शामलच होती...च झालेली ओळख इथेच थांबेल का?? की शामल आणि प्रशांतच्या नात्यात आणखीन वेगळं वळण येईल??हे नातं सुरु होण्यापूर्वीच तर संपणार नाही??? खूप प्रश्न आहेत न?? शामल ने नुकतीच बारावीची परिक्षा दिलीय ...तर प्रशांत ने F.Y ची मग पुढे काय होईल बरं?? अजून खूप लहान आहेत न दोघं....पर पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त... शामल आणि प्रशांत पुन्हा भेटतात ??की ही त्यांची शेवटची भेट ठरतेय ....जाणून घेण्यासाठी भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत सायोनारा...दोस्तों... तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा...या कथेला तुम्ही जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल धन्यवाद..


Rate this content
Log in

More marathi story from Shital Thombare

Similar marathi story from Romance