Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Shital Thombare

Romance


3  

Shital Thombare

Romance


कथा तुझी अन् माझी - भाग2

कथा तुझी अन् माझी - भाग2

4 mins 386 4 mins 386

शामलची मोठी बहिण रेश्मा... तिने नुकतंच आपलं शिक्षण संपवलं होतं..तोच अचानक एक दिवस शामलचे चुलत काका त्यांच्या घरी आले...शामलचे वडिल नुकतेच कामावरून घरी आलेले...

'काय भालचंद्र कसा आहेस? आणि आज इकडची वाट कशी काय सापडली तुला? तुम्ही लोकं तर विसरूनच गेला आहात आम्हांला...'

'काय रे दादा तू पण...कामामुळे कुठे वेळ मिळतो आहे... कुठे येण्या जाण्याला...आणि तू तरी कुठे फिरकतोस रे आम्हां गरिबाच्या घरी...'

दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागले... इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या...तोपर्यंत शामलची आई चहापाणी देऊन जेवणाच्या तयारीला लागली...

'भावोजी आता आला आहात तर जेवूनच जा..'

'नाही हो वहिनी जेवणासाठी पुन्हा कधीतरी येईन आता महत्वाच्या कामासाठी आलो होतो...तेवढं करतो अन निघतो...'

'ते काही असो जेवणाशिवाय जाऊच देणार नाही मी तुम्हाला.... तुम्ही मारा गप्पा तोपर्यंत मी जेवणाचं बघते'...असं म्हणतं शामलची आई स्वयंपाकघरात शिरली...सोबतीला रेश्मा होतीच...


शामलची बारावीची परिक्षा जवळ आली होती...ती आपली कोपऱ्यात बसून अभ्यास करत होती...तसंही शामलला घरातल्या कोणत्याही कामात रस नव्हता...आपला अभ्यास एके अभ्यास...कधी आईने काही काम सांगितले तरी शामल अभ्यासाचा बहाणा करून मोकळी होई... शामलच्या बाबांचा या बाबतीत तिला पूर्ण पाठिंबा होता...त्यामुळे शामल जरा जास्तच शेफारली होती... इकडे शामलचे बाबा अन् भालचंद्र काका गप्पा मारू लागले...भालचंद्र काकांनी शामलची बहिण रेश्माला गावी एका कार्यक्रमात पाहिलेलं... त्या आधी खूप लहान असताना तिला पाहिले होते... त्या कार्यक्रमात रेश्मा सगळ्यांना कामात मदत करत होती...स्वभाव अगदी शांत...सगळेच कौतुक करत होते तिचे..त्यांनी रेश्माला बरोबर हेरलं... भालचंद्र काकांचा एक मित्र आपल्या मुलासाठी मुलगी शोधत होता...काकांनी रेश्मा आणि तिच्या कुटुंबाबद्दल कल्पना दिली...आणि मुलाकडची मंडळी मुलगी पाहण्यासाठी यायचं म्हणत होते... मुलाची अन् त्याच्या कुटुंबाची सर्व माहिती भालचंद्र काकांनी शामलच्या वडिलांना सांगितली...

शामलचे वडिल म्हणाले...'स्थळ चांगलं आहे पण आम्ही अजून रेश्माच्या लग्नाचा विचारच केला नाही'

'अरे! मग आता कर... चांगलं स्थळ असं हातचं जायला नको...'


ते आहेच रे ...पण पैश्यांची काही सोय नको का करायला.... तुला तर माहित आहेच माझी नोकरी ही अशी...मुलांचं शिक्षण अन् घरखर्च ह्यातच सारा पैसा जातो...जमा पूँजी अशी काही नाही...पसंती झालीच तर पुढे कसं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे...' 'सगळी सोंग आणता येतात पण पैश्यांच सोंग कसं आणणारं'

'होईल रे सगळं व्यवस्थित...तो वर बसला आहे ना त्याला सगळ्यांचीच काळजी आहे... काहीतरी सोय होईल...आता निदान पाहण्याचा कार्यक्रम तर करु पुढचं पुढे बघता येईल...' हो नाही म्हणत शामलचे वडिल मुलगा पाहायला तयार झाले... शामल एका कोपऱ्यात अभ्यास करत होती...पण तिचं सारं लक्ष काका आणि बाबांच्या बोलण्याकडे लागून होतं... ताईचं लग्न अरे व्वा मज्जाच मज्जा...ताईच्या लग्नाबद्दल बोलतायत आणि ताईला माहितच नाही...आता बघतेच तुला... शामल स्वयंपाक घरात आली...आई तुला काही मदत करु का? म्हणत उगाच कामामध्ये लुडबुड करु लागली...तिला पाहून आई आणि ताई दोघीही म्हणाल्या...आज सूर्य कोणीकडे उगवला म्हणायचा..? तू आणि मदत करणार? शामल लटक्या रागात म्हणाली...'का मी काही काम करत नाहीच वाटतं..ते तर बाबा मला अभ्यासाला बसवतात म्हणून नाहितर मी काम करायला तयारच असते...' आई आणी रेश्मा दोघीही हसू लागल्या... 'तसेही आता ताईची रवानगी झाल्यावर मलाच की करावी लागणार तुला कामात मदत...' रेशमाने शामलचा कान पकडला....'काय गं माझी कुठे रवानगी करतेस??' 'ताई कान दुखतोय गं...मी नाही काही आई बाबाच तुझी रवानगी करणार आहेत तुझ्या सासरी.... काका बाबांशी त्याबद्दलच बोलत आहेत...तुझ्यासाठी स्थळ घेऊन आलेत' 'रेश्मा ने शामलचा पिरगाळलेला कान सोडला...अन् लाजली ' 'ए आई ही ताई बघ लाजतेय... असं म्हणतं शामल जोरजोरात हसू लागली... हो का तुमचा नंबर लागला की तुम्ही पण अश्याच लाजाल हो राणीसाहेबा'...आई हसत म्हणाली... लग्न नाही गं बाई...या भानगडीत आपण नाही पडणार... कोण करणार ते रांधा वाढा उष्टी काढा...माझं शिक्षण आणि मी बरी आहे...असं म्हणतं शामल ने बाहेरच्या खोलीत धूम ठोकली...


रात्री झोपण्यापूर्वी बाबांनी घरात भालचंद्र काकांनी सांगितलेल्या स्थळाबद्दल सांगितले...सगळेच खुश होते येत्या रविवारी पाहुणे मंडळी रेश्माला पाहायला येणार होते... सगळेच तयारीला लागले...अगदी साफसफाईपासून मेनू काय बनवायचा इथपर्यंत जय्यत तयारी सुरु झाली... चहाच्या नवीन कपांपासून बसण्याच्या सतरंजीपर्यंत नवीन खरेदी करण्यात आली... पाहुणे आल्यावर पाणी कोणी द्यायचं, मुलीला बाहेर कधी अन् कोणी आणायचं इथपर्यंत सगळी पूर्वतयारी झाली... शामलची त्यावेळी नेमकी परिक्षा सुरु होती...तिच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून शामलच्या अभ्यासाची सोय शेजारच्या काकूंच्या घरात करण्यात आली होती... शामलची फार इच्छा होती....ताईला पहायला येणाऱ्या मुलाला एकदा तरी पाहण्याची ....आपला जीजू कोण होणार नको का पहायला? पण बाबांपुढे शामलच काही चालले नाही...पाहुणे येण्याआधीच तिची रवानगी शेजारच्या काकूंकडे झाली.... शामलचं अर्ध लक्ष अभ्यासात तर... अर्ध नवरा मुलगा कसा दिसत असेल बरं हा विचार करण्यात लागलं होतं... ताईच्या लग्नाची गडबड सुरु असताना शामल आणि प्रशांतची भेट कशी झाली असेल बरे?.... (क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from Shital Thombare

Similar marathi story from Romance