कथा तुझी अन् माझी - भाग पहिला
कथा तुझी अन् माझी - भाग पहिला


ही कथा आहे शामल आणि प्रशांत ची...त्यांच्या पहिल्या भेटीची...पहिल्या वाहिल्या प्रेमाची...प्रेमाचा प्रवास सुरु होऊन...लग्नापर्यंत पोहण्याची... आपला नायक प्रशांत आणि नायिका शामल ना नात्यात होते...ना कॉलेजात...ना ऑफिसात एकत्र...एवढच काय दोघांची शहरेही एकमेकांपासून कोसो दूर... आपला नायक म्हणजे प्रशांत मुंबईत कुलाब्या सारख्या एका उच्चभ्रू वस्तीत राहणारा...तर शामल ठाण्यात राहणारी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी...दोघांचा दूर दूर पर्यंत काही संबंध नव्हता...
शामलच्या घरात तिचे बाबा एका खाजगी कंपनीत कामाला होते...आई गृहिणी...एक मोठी बहीण...शामल मधली आणि लहान भाऊ असं पाच जणांच सुखी कुटुंब...शामल नुकतीच दहावीची परिक्षा देऊन कॉलेजात दाखल झालेली... प्रशांतच्या कुटुंबातही फार काही वेगळी परिस्थिती नव्हती...वडिल सरकारी कर्मचारी...आई गृहिणी ...मोठा भाऊ...मधवा प्रशांत...अन लहान बहिण असा छोटासा परिवार... शामल आपल्या शिक्षणाबाबत,भविष्याबाबत गंभीर...तिच लक्ष्य ठरलं होतं..अन त्या दिशेने तिने आपला प्रवास ही सुरु केलेला... शामल च्या घरचे वातावरण फारच कडक शिस्तीचे...मुलांशी बोलायचे नाही,उगाच कोणाशी हसायचे नाही,रस्त्याने येताजाताना खाली मान घालून जायचे अन यायचे...
घरात वडिलांच्या शब्दापुढे कोणी जात नसे...तसा धाकच होता त्यांचा... शामल ला मुक्त संचार हवा होता...वडिलांची बंधने जाचक वाटायची तिला..त्यामुळे बर्याचदा शामल कडूनच या बंधनांना विरोध होई...पण हा विरोधही लपूनछपून आईला पुढे करून...वडिलांच्या पुढे ही उभे राहण्याची शामलला भीती वाटे ....शामलच काय सगळेच शामलच्या वडिलांना दचकून राहत... शामलला लहानपनापासूनच शिक्षक होण्याची भारी हौस होती...तिच्या भातुकलीच्या खेळातही ती शिक्षकाची भूमिकाच निभावत असे...
तर इकडे प्रशांत स्वभावाने अत्यंत बेफिकीर...राजा सारख आयुष्य जगायचं...ना आजची फिकिर ना उद्याची चिंता असणारा...थोडासा उडाणटप्पू...पण मनाने अत्यंत प्रेमळ...मित्रांचा काफिला सतत आसपास... ना कोणाची भीती ना कसला धाक...शिक्षणाची आवड नाही...घरच्यांची इच्छा म्हणून शिक्षण सुरु...भविष्याचा कसला विचार नाही...मनाला पटेल ...जसं वाटेल तसच जगायचं हा त्याच्या आयुष्याचा फंडा...मौज मस्ती मित्र यात दिवस कसे मस्त चालले होते... शामल आणि प्रशांत सगळ्याच बाबतीत दोन विरुद्ध टोकं होती..अगदी स्वभाव आणि आवडीनिवडी सुद्धा...शामल अगदी काकूबाई सारखी राहणारी तर प्रशांत फ्याशन च्या जगतात जगणारा...
दोघांचं राहणीमान पूर्ण वेगळे...तरीही ही दोन विरुद्ध टोकं एकत्र आली... कसं झालं बरे हे ?? आपले नायक नायिका एकत्र कसे आले? काय घडलं असेल बरे ज्यामुळे ते भेटले...हे जाणून घेण्यासाठी भेटुयात कथेच्या पुढच्या भागात...आपला नायक प्रशांत आणि नायिका शामल सोबत... (क्रमशः)