Shital Thombare

Romance

3  

Shital Thombare

Romance

कथा तुझी अन माझी...भाग 9

कथा तुझी अन माझी...भाग 9

6 mins
361


(भाग9)

प्रशांतने आपल्या मनातील भावना शामल समोर व्यक्त केल्या...आता त्याला प्रतिक्षा होती ती शामलच्या उत्तराची..त्याला हे माहित होतं की ...शामलच उत्तर होच असेल...फक्त ते तिच्या तोंडून ऐकण्यासाठी प्रशांत आतुर झालेला...शामलचं उत्तर कधी एकदा कानावर पडतयं...कधी एकदाच शामल बोलून टाकतेय की प्रशांत I LOVE U ...माझं ही तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे....... प्रशांत च्या हृदयाच्या ठोक्यांनी वेग घेतला...प्रशांतला त्याच्या हृदयाची धडधड जाणवत होती....कानात प्राण आणून तो शामलच्या उत्तराची प्रतिक्षा करू लागला...शामलच्या होकाराने कान कधी एकदा तृप्त होतायत....असं झालं होतं त्याला.... पण बराच वेळ झाला तरी शामल शांत उभी होती... 'माफ कर प्रशांत पण हे शक्य नाही'...शामल इतकच म्हणाली ... आणी हातातील वॉच मध्ये बघून ...उशिर झालाय खूप ..चल मी निघते म्हणतं.... भरभर आपल्या घराकडे चालू लागली... झाल्या प्रकाराने प्रशांत पुरता गोंधळून गेला....शामलने एकदाही पाठिमागे वळून पाहिलं नाही...ती दृष्टीआड जाईपर्यंत प्रशांत तिच्या पाठमोरया आकृतीकडे पाहतच राहिला...

शामल मला नाही म्हणाली? माझं काही चुकलं का? शामलला अजून वेळ हवा होता का?? माझी शामल जिच्यावर मी जिवापाड प्रेम करतोय तिला माझ्या बद्दल काहिच वाटत नाहिये का???एक ना अनेक प्रश्नांचे भुंगे त्याच्या डोक्यात घूमू लागले... कितितरी वेळ प्रशांत शामल गेली त्या रस्त्याकडे पाहत उभा होता...तेवढ्यात मागून येणारया गाडीने जोरात हॉर्न वाजवला आणि प्रशांत भानावर आला... त्याने गाडीला कीक दिली आणि गाडीवर बसून तो निघाला...डोक्यात अनेक शंका,प्रश्न यांच गाठोडं घेऊन तो गाडी चालवत होता...त्याच्या सोसायटीत विल्सन हाऊस ला पोहचला पण त्याची घरी जाण्याची मुळीच इच्छा नव्हती... खाली ग्राउंडला काही मुलं खेळत होती...त्यांना पाहत प्रशांत तिथेच बसला...डोक्यात मात्र विचार चक्र सुरु होते...शामलच असं .... नकार...देऊन ...निघून जाणं त्याला असह्य होत होतं..... तिच्या या वागण्याचा अर्थ तरी काय लावायचा...की माझच चुकलं? मला गैरसमज झाला का ? जसं मला ती आवडते तसच तिलाही मी आवडतोय असच मला वाटलेलं....काय कारण असेल शामल च्या नकाराच...डोक्याचा नुसता भुगा झालाय.... प्रशांतने आपलं डोकं दोन्ही हातांनी घट्ट धरलं अन डोळे मिटले...शामलचा चेहरा काही त्याच्या नजरेसमोरून जाईना.. तेवढ्यात फोन ची मेसेज ट्युन वाजली...प्रशांत ने दुर्लक्ष केलं...पण एकामागे एक मेसेज येतच राहिले...कोण इतके मेसेज करतयं प्रशांत ने वैतागत फोन हातात घेतला... पाहतो तर शामल चे दहा ते बारा मेसेज होते...एकच मेसेज तिने दहा बारा वेळा पाठवलेला...प्रशांत ने मेसेज वाचला....पोहचलास का घरी??? फक्त 3 शब्दांचा मेसेज... प्रशांत च्या मनात आलं शामलला मेसेज करून बोलावं की तुला काय करायचयं मी घरी पोहचलो की नाही तुला कशाला हव्यात नसत्या चौकश्या...??? पण त्याने स्वत:वर आवर घातला... आणी काहिच रिप्लाय न देताच तो त्याचा जीवलग मित्र विक्की राव याच्या घरी गेला... त्याआधी त्याने घरी आईला फोन लावला व सांगितले आज रात्री तो विक्की च्या घरीच थांबणार आहे काही एमर्जन्सी आहे असं सांगत प्रशांतने फोन ठेवला... विक्की त्याला ईतक्या रात्री अचानक आलेला पाहून गोंधळतो ....प्रशांत चा चेहरा पाहून तो समजून जातो काही तरी गडबड झाली आहे.... विक्की: क्या हुआ भाई टेन्स लग रहा है.... (विक्की साउथ इंडियन असल्याने त्याला मराठी नाही येत....)

प्रशांत: कुछ नही यार बस यूँही....

विक्की :तुझे अच्छे से जानता हूँ...बता क्या बात हैं...?? 

प्रशांत: उसने मुझे ना कहांँ...मुझे लगा वो भी मुझे पसंद करती हैं ...पर वो मना कर के चली गई ..और एक बार भी उसने मुडकर नहीं देखा

विक्की: अरे भाई कौन...??किसकी बात कर रहा हैं??... चल क्या रहा हैं तेरा...

प्रशांत या काही दिवसात शामल भेटल्यापासून जे काही घडलेले ते सर्व विक्कीला सागुंन टाकतो...

विक्की: यार ऐसे कैसे उसने ना कह दिया.... रुक मै अभी बात करता हूँ उससे.... विक्की प्रशांत चा फोन हातात घेत बोलतो...

प्रशांत :जाने दे यार जब उसने मना ही कर दिया तो अब बात करने का क्या फायदा .... विक्की प्रशांत चा फोन हातात घेतो... बघतो तर शामल चे 15 ते20 मेसेज असतात....घरी पोहलास का?काही तरी बोल प्रशांत ???... सॉरी प्लीज बोल ना काहितरी??? तुझी काळजी वाटत आहे रे.... अरे कुठे आहेस???......वगैरे वगैरे...

विक्की: अरे प्रशांत बात करना उससे कितने मेसेज कर रही है वो.....

प्रशांत :मुझे अब कोई बात नही करनी है उससे... उसे जो करना था वो तो उसने कर दिया......

विक्की : रुक मै मेसेज करता हूँ मेरे फोन से के तू ठिक है घर पहूंच गया है.... विक्की शामल ला मेसेज करतो की," प्रशांत ठिक है , मेरे घर पर है , मै प्रशांत का दोस्त विक्की हूँ ...."

इथे प्रशांतचा काहिच रिप्लाय येत नाही पाहून शामल टेन्स असते...विक्की चा मेसेज पाहून शामल थोडी रिलैक्स होते. आणि विक्की ला मेसेज करते..." ख्याल रखना उसका प्लीज..."

विक्की :यार उसके बिहेवियर से तो लगता है वो तुझसे प्यार करती हैं...वरना तेरी चिंता क्युँ करती???

प्रशांत: वही तो लगने में और होने मै बहुत फर्क है!

विक्की :पर मुझे तो हाँ लग रहा हैं उसके साइड से...इतनी चिंता कर रही हैं तेरी युहिँ बेवजा नही रे...

प्रशांत: अगर हाँ होता ...तो ऐसे ना बोलके क्युँ जाती???

विक्की :हा यार ऐसे ना बोलना भी सही नही है..उसे समझना चाहिये तेरे फिलींग्स का ऐसे मजाक नही बना सकती वो... मेरे Ex को देखा ना क्या किया उसने मेरे साथ... ये लडकीयाँ होती ही दलबदलू......

प्रशांत:ओय चुप ...मेरी शामल ऐसी नही है! और तेरे Ex को कहा ला रहा बीच मै...

विक्की: जाने दे... तू ये बता अब क्या करने वाला है तू...

प्रशात :पता नही यार...मुझे कुछ समझ में नहीं आ रहा हैं...मै उससे बहुत प्यार करता हूँ ...पर उसपर कुछ प्रेशर भी नही डालना चाहता... 

विक्की: टाईम दे उसे थोडा सब ठिक हो जायेगा प्रशांत: उसके अलावा कोई चारा भी नहीं हैं...

विक्की: तू तेरी साइड से पूरी कोशिश करता रेह एक ना एक दिन वो जरूर हाँ बोलेगी....

प्रशांत: पर फिर भी उसने ना कहा तो????...

विक्की: भाई तेरे लिये तो उसको उठाके लायेंगे..

दोघेही हसतात..प्रशांत हसत त्याला म्हणतो..." भाई तू रेहने दे " रात्री प्रशांत विक्की च्या घरीच थांबला ...पण रात्रभर त्याला झोप लागली नाही...शामल च्या विचारांनी तो अस्वस्थ होता..त्यातही शामल ने दिलेल्या नकाराने तो अगदीच बेचैन झालेला ....पहाटे कुठे त्याला झोप लागली.... इकडे शामल सकाळी कॉलेजला जायला निघाली...तिने प्रशांत ला मेसेज केला ...पण बराच वेळ झाला त्याचा रिप्लाय आला नाही...कॉल चे ही उत्तर दिले नाही.... प्रशांत इकडे फोन सायलेन्ट वर ठेऊन शांत झोपला होता...बारा वाजता विक्की ने त्याला जबरदस्तीने उठवले... सॉरी यार ...शामल का फोन आ रहा था पर मैनें तुझे उठाया नहीं...विक्की म्हणाला... प्रशांत ने काहीच उत्तर न देता फोन हाती घेतला...शामल चे मेसेज कॉल होते पण काहिच रिप्लाय न देता...त्याने पुन्हा फोन ठेऊन दिला... कॉलेज मध्ये प्रशांतशी आज काहिच बोलणं न झाल्याने शामलचं लेक्चर मध्ये अजिबात लक्ष नव्हतं...राहून राहून ती फोन कडे पाहत होती...प्रशांत च्या रिप्लाय ची प्रतिक्षा करत होती... नेमके आज सरवदे सर आले नव्हते...त्यामुळे शामल ला एक लेक्चर ऑफ मिळाले...ती बाहेर आली आणि प्रशांत ला कॉल केला...

प्रशांत: हेलो शामल: मी किती कॉल केले मेसेज केले तुझा काहिच रिप्लाय आला नाही..तू ठिक आहेस ना...

प्रशांत: हंम्म

शामल: हम्म ...काय काही तरी बोल ना...

प्रशांत: काय बोलू?? तू बोलण्यासारख काही ठेवलेच नाही...

शामल: माफ कर मी तुझं मन दुखावलं...पण माझा नाईलाज आहे...आपण फ्रेंडस बनून नाही का राहू शकत..

प्रशांत: आता ते शक्य नाही...मी तुझ्याकडे एक मैत्रीण म्हणून नाही तर लाइफ पार्टनर म्हणून पाहत आहे... माझे तुझ्यावर काल ही प्रेम होते आज ही आहे आणि उद्या ही ते असेच राहिल...मैत्रीच नातं आता शक्य नाही... शामल : असे काय करतोस रे.... मला तुझ्या सारखा मित्र गमवायचा नाहिये...

प्रशांत: हे बघ माझ्या मनातल्या फिल्लींग्स मी तुझ्याशी शेअर कल्या..पण त्याला तू नकार दिलास.. मी तुझ्या निर्णयाचा आदर करतो तुला विचारणार पण नाही की तू का नकार दिलास...?? तू ठरवलेच आहेस तर मी ही कुठल्याही गोष्टीसाठी तुला फोर्स नाही करणार....

शामल: ठिक आहे तुझी मर्जी पण मी माझा चांगला मित्र नाही गमवणार...

प्रशांत: चल ठिक आहे ठेवतो आता मी बाय.... शामल बाय बोलण्याच्या आत प्रशांत फोन ठेवतो... ईकडे प्रशांत खूप दुखी असतो त्याच्या पहिल्या वाहिल्या प्रेमाला नकार मिळाल होता ज्याची त्याने कल्पना ही केली नव्हती.... मात्र तिकडे शामल खूप खूश असते की आपल्या वर कुणी इतकं प्रेम करु शकतं.... असा तिने कधीच विचार केला नव्हता ...तसा प्रशांत खूप चांगला मुलगा आहे ...आपल्यावर जीवापाड प्रेम करतो आणि आयुष्यभर तो आपल्या ला खूप आनंदात ठेवेल याची तिला जाणीव होतीच.... पण शामल चा नाईलाज होता..... प्रशांत ला शामल हो म्हणेल का? काय असेल शामल चा नाईलाज?? काय होईल दोघांचे ?? पाहूयात पुढिल भागात तब तक सायोनारा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा..


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance