The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Shital Thombare

Romance

3  

Shital Thombare

Romance

कथा तुझी अन् माझी - भाग 8

कथा तुझी अन् माझी - भाग 8

6 mins
450


रविवारचा दिवस असला तरी शामल आजही सवयीप्रमाणेच लवकर उठली...उठल्या उठल्या तिने प्रशांतला गुड मॉर्निंग मेसेज केला...आणि फ्रेश होण्यासाठी गेली... शामल फ्रेश होऊन आली तरी प्रशांतचा काही रिप्लाय आला नव्हता... तिने पुन्हा त्याला मेसेज केला...अर्धा तास झाला तरी प्रशांतचा काहीच रिप्लाय येईना...शेवटी शामलने प्रशांतला कॉल केले...दोन कॉल झाले तरी पलीकडून कसलाच प्रतिसाद मिळेना...शामलला आश्चर्य वाटले.. इकडे प्रशांत मात्र अजूनही गाढ झोपेत होता...साडेदहा वाजता आईने जबरदस्तीने प्रशांतला उठवलं...तेव्हा कोठे प्रशांतने अगदी नाईलाजाने डोळे उघडले...डोळे चोळतच प्रशांतने आपला फोन हाती घेतला...पाहिलं तर शामलचे दोन मेसेज, कॉल येऊन गेलेले... अंथरूणावर लोळतच त्याने शामलला कॉल केला...

प्रशांत : गुड मॉर्निंग...शामल...

शामल : गुड मॉर्निंग नाही.... गुड आफ्टरनून म्हणायची वेळ झालीय...मिस्टर प्रशांत.. काय करत होतात आपण इतका वेळ...एकाही मेसेजचा, कॉलचा रिप्लाय नाही..एरव्ही तर पाच मिनिटात तुझा रिप्लाय येतो..

प्रशांत : आज तो संडे है यार...सगळं कसं आरामात...लवकर उठून करायचय काय?

शामल : तुझं बरं आहे... कुंभकर्ण कुठला..

प्रशांत : कुंभकर्ण वगैरे काही नाही...काही काम असेल तर मी ही उठू शकतो सकाळी लवकर...विनाकारण का उठू.?

शामल : राहू दे रे राहू दे तुझं हे नेहमीचच आहे..

प्रशांत : असं काही नाही..आता हेच बघ ना उद्या माझा मित्र यूएसला जाणार आहे सो त्याला सोडायला आम्ही सगळे फ्रेंडस पहाटे तीनला एअरपोर्टला जाणार आहोत...

शामल : तू आणि पहाटे तीनला उठणार... जाऊ दे ना कशाला उगाच मस्करी करतो आहेस... बरं झालं आठवण झाली...उद्या मलाही कॉलेजला लवकर जायचं आहे...

प्रशांत : का रे काय आहे उद्या कॉलेजमध्ये..?

शामल : उद्या कॉलेजमध्ये सेमिनार आहे... त्यासाठी लवकरच जायचे आहे.. सकाळी 7.30 लाच पोहचायचे आहे

प्रशांत : ओके !! तेवढ्यात प्रशांतची आई आवाज देते... प्रशांत लँडलाईनवर फोन आला आहे तुझ्या मित्राचा...

प्रशांत : चल बाय मला मित्र बोलावत आहेत क्रिकेट खेळायला... नंतर बोलू आपण....

शामल : नीट खेळ पहिल्या बॉलवर आउट नको होऊस

प्रशांत : तू नको शिकवू आता मला... चल बाय...

शामल : बाय.. प्रशांत फ्रेश होउन.. ब्रेकफास्ट करतो आणि खेळायला जातो...क्रिकेट म्हणजे त्याचा जीव की प्राण...आज मैदानात त्याने धावांचं अर्धशतक पार केलं... बराच वेळ झाला तरी प्रशांतचा कॉल, मेसेज काहीच आला नाही... शामलला काही चैन पडेना शेवटी तिनेच प्रशांतला कॉल केला...

प्रशांत : बोल...काय म्हणतेस?

शामल : काही नाही म्हटलं.. सांत्वना करावी...

प्रशांत : कशाबद्दल?

शामल : पहिल्याच बॉलमध्ये आऊट झाल्यावर फार वाईट वाटत असेल ना...

प्रशांत : ओह! मग तुला तर माझं सांत्वन नाही कौतुक करावं लागेल...कारण मी 50 रन काढून अजूनही नॉट आऊट आहे

शामल : हो का मला तर वाटलं होतं तुझी विकेट केव्हाच पडली..

प्रशांत : ती तर तू भेटल्यावरच पडली..(एकदम हळू आवाजात बोलतो)

शामल : काय म्हणाला? परत बोल..

प्रशांत : काही नाही...

शामल : ओके चल बाय.. बोलूयात नंतर...

प्रशांत : बाय...


ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटेच प्रशांत आणि त्याचे मित्र एअरपोर्टला मित्राला सोडायला जातात...त्यानंतर बरोबर 4.00वाजता प्रशांत शामलला मेसेज करतो...चलो गुड नाईट अभी हम सोते हैं... शामलला आज सकाळी लवकर जायच असल्याने ती 5वाजताच उठते मोबाइल पाहते तो प्रशांतचा मेसेज गुड नाईट... हसतच प्रशांतला मेसेज करते...गुड नाईट आपकी होगी हमारी तो गुड मॉर्निंग हैं...सो गुड मॉर्निंग... शामल तयारी करून 6वाजताच बस स्टॉपवर येते...हिवाळ्याचे दिवस असल्याने बाहेर अजूनही थोडा अंधार होता...बसस्टॉपवरही तुरळक गर्दी होती...शामल बसची वाट पाहत उभी होती... इतक्यात एक बाईकस्वार तिच्या समोरच बाईक उभी करतो...ब्लॅक कलरचे जॅकेट डोक्याला हेल्मेट परिधान केलेल्या त्या अनोळखी व्यक्तीला पाहून शामल दचकते...तो बाईकस्वार तिला बाईकवर मागे बसायला खुणावतो...तशी शामल अजूनच घाबरते... इकडे तिकडे पाहते पण बसस्टॉपवरही एक दोनच माणसे असतात. सगळे बसच्या प्रतिक्षेत असल्याने तिच्याकडे कोणाचेच लक्ष नसते...शामलला घाबरलेली पाहून तो बाईकस्वार आता बाईकवरून खाली उतरतो, तिच्याजवळ चालत येत तो हेल्मेट काढतो...

प्रशांत!!!.... शामल डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहतच राहते...प्रशांत जवळ येताच...

शामल : तू तर माझा जीवच घेतला होतास...आणि आज हे काय नवीन सकाळी सकाळी इकडे कुठे?

प्रशांत : काल कोणीतरी मला कुंभकर्ण म्हणून चिडवत होतं... म्हटलं आज सरळ सरप्राईजच द्यावं.. शामल प्रशांतकडे पाहून हसते...

प्रशांत : आता इथेच थांबून गप्पा मारणार आहेस का?? उशीर नाही का होत कॉलेजला जायला...बस लवकर मी तुला सोडतो...


बाहेर थंडी असल्याने प्रशांत शामलला आपलं जॅकेट घालायला देतो...जॅकेट घालून शामल प्रशांतबरोबर बाईकवर बसते...प्रशांत शामलला विचारतो...काही खाल्लं आहेस का? शामल : नाही रे इतक्या सकाळी कुठे? चहा घेतला अन् निघाले.. तू तर पहाटेच घरातून बाहेर पडला आहेस...चहा तरी घेतलास की नाही?

प्रशांत : नाही ना. पण आता मस्त कडक चहा प्यावासा वाटतो आहे...सकाळी सकाळी एखादं हॉटेलही उघडं नसेल..टपरीवर आवडेल का चहा घ्यायला तुला?

शामल : टपरीवर?

प्रशांत : तू चल तर... टपरीवरही खूप छान चहा मिळतो... प्रशांतजवळच एक चहाची टपरी पाहून बाईक थांबवतो... दोघेही चहा घेतात आणि निघतात.. दोघेही युनिवर्सिटीमध्ये पोहचताच..शामलला सोडून प्रशांत जायला निघतो...तेवढ्यात शामल प्रशांतला थांबवते.

शामल : तू ही चल ना माझ्याबरोबर सेमिनारला

प्रशांत : नाही यार मी आता मस्त घरी जाऊन झोपणार आहे...

शामल : ए झोपाळू चल ना माझ्या सोबत तशी ही ओपन एण्ट्री आहे...कोणीही येऊ शकतं...

प्रशांत : ओके येतो मी, पण बोअर झालो तर मी एक क्षण पण नाही थांबणार सेमिनारमध्ये आणि तुलाही माझ्याबरोबर बाहेर पडावं लागेल मंजूर...

शामल : ठिक आहे बाबा चल आता...

शामल आणि प्रशांत दोघेही सेमिनार हॉलमध्ये जातात...हॉल खूप मोठा असल्याने...प्रशांत आणि शामल सर्वांत शेवटी जाऊन बसतात... इकडे सेमिनार सुरु होतं... पण प्रशांत मात्र जांभया द्यायला लागतो...त्याच्या नकळत त्याचा डोळा लागतो...अन् शामलच्या खांद्यावर टेकतो तोच शामल त्याला जागं करते...

शामल : अरे सेमिनार सुरु आहे तू झोपा काय काढतोस? उठ लवकर कोणी पाहिलं तर काय म्हणतील...

प्रशांत : कोण नाही पाहत... सगळे सेमिनारमध्ये गुंग आहेत..आणि तसेही मी डोळे बंद केलेत कान तर माझे उघडेच आहेत न... मी ऐकतोय सर... आता मला दहा मिनिटं डोळे मिटू दे फक्त मग बघ कसा फ्रेश होतो.. असं म्हणत प्रशांत पुन्हा डोळे झाकतो...

शामल : कठीण आहे या कुंभकर्णाच...

लंच टाईम होताच प्रशांत आणि शामल बाहेर पडले...प्रशांत शामलला म्हणतो..बाहेरच एक मस्त चायनीज रेस्टॉरंट आहे तिथे चायनीज मस्त मिळतं...जाउयात का खायला... तुला कसं माहित मला चायनीज आवडतं...शामल आश्चर्य व्यक्त करत म्हणाली...

तुलाही आवडतं??...प्रशांत ने शामलला हळूच चिमटा काढत सेम पिंच म्हटलं...आणि हसू लागला...


जेवण झाल्यानंतर शामल सेमिनारला जायला निघाली तोच प्रशांत तिला म्हणाला : ए शामल आता नाही मी येणार आत... जाम बोअर झालोय..तू पण नाही जाणार आहेस..चल आपण जरा बाहेर फिरायला जाउयात...

शामल : अरे पण सेमिनार अजून संपला नाही...तोच कसं निघायच्ं...

प्रशांत : तू येणार आहेस की नाही ते सांग मी इतक्या सकाळी तुझ्यासाठी आलो... तुला मात्र माझी जराही कदर नाही..

शामल : ए नौटंकी बस्स झालं चल निघूयात..मेलोड्रामा नको सुरु करूस... ओके...

प्रशांत आणि शामल दोघेही गाडीवर बसून निघतात...

शामलः आपण बाहेर तर पडलो खरे पण जायचं कुठे नक्की?

प्रशांत शामलला म्हणतो चल आपण ठाण्याला जाउयात एखाद्या मॉलमध्ये..

शामल त्याला ओके म्हणते...

दोघेही 5.30ला ठाण्याला पोहचतात...ब्रिजवरून जात असताना ...प्रशांत पाहतो खाली जत्रा भरलेली आहे...प्रशांतच मन बदलतं ...तो शामल ला म्हणतो..मॉलच्या ऐवजी जत्रेत फिरायला आवडेल का तुला...? शामल पण आनंदी होते....आणि दोघे एकत्र जत्रेत जातात...पार्किंगमध्ये गाडी उभी करून...शामल आणि प्रशांत जत्रेत फिरू लागतात... एकमेकांसोबत जत्रेतल्या गमतीजमतीचा आनंद घेत असतात...तोच शामलचे लक्ष आकाशपाळण्याकडे जाते...

शामल : ए प्रशांत चल ना आकाशपाळण्यात बसूयात...

प्रशांत : आकाश पाळणा नको रे मला भीती वाटते...

शामल : भीती तर मला ही वाटते... पण तू आहेस ना सोबत मग मला नाही भीती वाटणार...

प्रशांत : ठिक आहे तू म्हणते आहेस तर बसूयात.. दोघेही तिकिट काढतात आणि आकाशपाळण्यात बसतात... आकाशपाळणा वर जाऊ लागतो तसा दोघांच्या पोटात गोळा येतो... शामल आपले डोळे घट्ट मिटून घेते... आणि प्रशांतचा हात धरते...अगदी घट्ट...प्रशांतही शामलचा हात आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरतो...पण काहीच क्षणात दोघांचीही भीती नाहीशी होते...आणि ते दोघेही हसतहसत राइड एन्जॉय करतात...एकमेकांची अवस्था पाहून दोघेही पोटभर हसतात..


जत्रेत बराच वेळ फिरल्यावर शामल जायला निघते... चल प्रशांत निघूयात आपण बराच उशीर झालाय... ठिक आहे मी सोडतो तुला आणि मग मी ही घरी निघतो.. दोघेही बाईकवर बसतात ...प्रशांत शामलच्या सोसायटीपासून थोडं लांब बाईक उभी करतो...शामल बाय करून निघणार तोच प्रशांत शामलला पुन्हा थांबवतो...

आजच्या दिवसाबद्दल थँक्स...तुझ्या सोबतीत दिवस खूप छान गेला...

शामलही म्हणते खरंच आज दिवस कसा संपला समजलंच नाही...

प्रशांत : शामल मला तुला काही सांगायचयं..

शामल : हा बोल ना

प्रशांत : शामल मला तू खूप आवडतेस... या दीड दोन महिन्यांच्या सहवासात माझ्या नकळतच माझं तुझ्यावर प्रेम जडलं...माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू शामल... माझी लाइफ पार्टनर होशील?

शामल प्रशांतच बोलणं ऐकून चपापते...तिला कल्पना होती हे कधीतरी घडणार..पण इतक्या लवकर आणि या ठिकाणी अशाप्रकारे प्रशांत तिला प्रप्रोज करेल... असं तिला वाटलं नव्हतं... (क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from Shital Thombare

Similar marathi story from Romance