Shital Thombare

Romance

4  

Shital Thombare

Romance

कथा तुझी अन माझी...भाग 7

कथा तुझी अन माझी...भाग 7

6 mins
1.1K


(भाग 7)

शामल ने विषय टाळला...पण प्रशांत ला माहित होतं त्याला घरी फोन करणारी शामलच होती...शामलला आपली काळजी वाटते आहे हे पाहून त्याला ही बरं वाटलं... दुसरयाच दिवशी प्रशांत ने शामल ला भेटून सरप्राईज द्यायच ठरवलं....शामल पोहचण्याआधीच तो शामलची वाट पाहत युनिवर्सिटी मध्ये हजर होता...शामलला प्रशांतच असं भेटायला येणं अनपेक्षित होतं....प्रशांत ला अचानक आलेलं पाहून ती खूप आनंदी झाली...तिचा आनंद तिच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता... शामल ने आज एक ही लेक्चर अटेंड न करता पूर्ण दिवस प्रशांत सोबत घालवला... आज अचानक भेटायला कसा आलास??...शामल म्हणाली तुझी आठवण आली म्हणून...काल माझ्या मुळे तू खूप टेंशन मध्ये होतीस...तुला सॉरी पण म्हणायचं होतं... ते तर तू फोन वरही बोलू शकला असतास त्या साठी इतक्या लांब यायची काय गरज होती... गरज कशी नव्हती...त्या शिवाय तुझ्या चेहर्यावरचा आनंद कसा पाहू शकला असतो.... अच्छा... फक्त अच्छा... मग काय बोलू...??? शामल तुला एक विचारू ?? विचार ना काय विचारायचं आहे... तुला माझी इतकी का काळजी वाटत होती..??तुझे इतके मिस्स्ड कॉल आणि मेसेजेस पाहून मी ही बेचैन झालो...तुझी अस्वस्थता जाणवली आणि सरळ तुला भेटायला आलो... पण इतक्यात शामल च्या मैत्रिणी चा कॉल आला आणि त्यांच बोलणं अर्धवटच राहिलं...मैत्रिणीने शामल ला कँटीन मध्ये बोलावलं...शामल आणि प्रशांत दोघेही तिथे गेले... शामलच्या एका मैत्रिणीचं लग्न ठरलं होतं..ती पत्रिका देण्यासाठी घेऊन आलेली...सगळ्यांबरोबर तिने प्रशांतला ही आमंत्रण दिलं...आणि आवर्जून यायला सांगितलं...लग्न मुंबईलाच चर्चगेट च्या जवळपास होतं...प्रशांत तिथेच कुलाब्याला राहत होता...शामलने ही प्रशांत ला फोर्स केलं लग्नाला येण्यासाठी... तुझ्या फ्रेंडस मध्ये येऊन मी काय करणार??? प्रशांत म्हणाला पण शामलचे फुगलेले गाल पाहिले आणि तो तयार झाला..ठिक आहे मी येईन लग्नाला पण तुला पूर्ण वेळ माझ्या सोबत रहावं लागेल...कबूल??? शामल खुश होत म्हणाली ....कबूल कबूल एकदम कबूल!!

दोघेही कँटीन मधून बाहेर पडत असतानाच .... समोरून एक लेडी जाताना दिसली...प्रशांत ने तिला पाहून स्माईल केलं...त्या लेडी ने क्षणभर प्रशांत आणि शामल कडे नजर रोखून पाहिले अन स्माईल देऊन निघून गेली...ती जाताच प्रशांत म्हणाला..ओह शिट!!!!... आता ही बातमी घर पर्यंत पोहचणार... का रे काय झाल?? आणि त्या लेडी कोण होत्या??आणि आपल्या कडे असं का पाहत गेल्या??? अरे त्या घर्डे काकू आहेत...युनिवर्सिटी मध्ये फिजिक्स डिपार्टमेंट च्या हेड आहेत..महत्वाचं म्हणजे...त्या आमच्याच समोर राहतात...आईची खास फ्रेंड पण आहे..आई पर्यंत आता ही बातमी नक्की पोहचणार... बातमी कोणती बातमी..?? शामल म्हणाली हेच की आपण दोघे एकत्र फिरतोय... मग त्यात काय एवढं फ्रेंडस तर आहोत... ते तुला आणि मला माहित आहे आपण फ्रेंड आहोत...पण या काकू मिर्चमसाला लावून घरी सांगतील की मी माझ्या गर्लफ्रेंड सोबत फिरत आहे ...प्रशांत म्हणाला... ए तसं काही नाहीये हा... अरे हो !!! पण त्या तर घरी गर्लफ्रेंड च सांगणार... एक क्षण शांत होऊन प्रशांत शामल कडे पाहून तिला चिडवत म्हणाला...खरचं तसं काही नाही ना... त्याच्या बोलण्याने शामल चपापते...आणि हसत हसत म्हणते हो खरच तसं काही नाही.... त्या दिवशी घरी गेल्यावर खरच प्रशांतची घरात झाडाझडती झाली...कोण मुलगी? कोणा बरोबर फिरत होता...काय सुरु आहे तुझं...?? प्रशांत आईला म्हणाला.... अरे ती माझी कॉलेज फ्रेंड होती...युनिवर्सिटीला कामानिमित्त गेलेलो तेव्हा ती भेटली...नेमकं काकूंनी पाहिलं...बाकी काही नाही गं... हे ऐकल्यावर कुठे प्रशांतची सुटका झाली... शामलच्या मैत्रिणीचं लग्न रविवारी होतं...शामल जांभळ्या रंगाची काठापदराची साडी नेसून तयार झाली..लग्नापेक्षा प्रशांत सोबत असेल याची एक्सायटमेंट जास्त होती... शामल आणि तिच्या मैत्रिणी हॉल वर पोहचल्या ... त्या आधीच प्रशांत त्यांची वाट पाहत गेट वरच उभा होता...प्रशांत पिंक शर्ट ऐण्ड ब्लैक सूट मध्ये एकदम उठून दिसत होता...शामल त्यालाच पाहत होती...पण प्रशांतच लक्ष जाताच तिने नजर चोरली... समोरून येणारया शामलवरून त्याची नजर काही हटत नव्हती... शामल ची मैत्रीण शारदा तिला चिडवत म्हणाली...नवरदेव तर बाहेरच नवरीची वाट पाहत उभा आहे... हे ऐकताच शामल लाजली.... प्रशांत शामल ला पाहून म्हणाला...खूपच छान दिसते आहेस...पण काहितरी कमी आहे... काय कमी आहे..शामल लाजत म्हणाली.. आपल्या हातातल्या बूकेतील लाल गुलाब तिच्या समोर धरून प्रशांत म्हणाला... हे घे तुझ्या केसात लाव...अजूनच सुंदर दिसशील.. शामलने ही ते फूल घेतलं...आणि आपल्या डोक्यात माळल्ं...त्यानंतर सगळे मिळून आत गेले...ठरल्याप्रमाणे शामल लग्नात प्रशांतसोबतच होती... लग्न लागल्यावर प्रशांत शामल ला म्हणाला चल तुला माझ्या आवडत्या जागी घेऊन जातो...शामल ही लगेच तयार झाली...प्रशांत शामलला घेऊन मरिन ड्राईव्ह ला समुद्र किनारी गेला...भरधाव धावनार्या गाड्या पाहून शामल ला रस्ता क्रॉस करताना भीती वाटू लागली... कितितरी वेळ दोघेही रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबले...पण गाड्यांची गर्दी काही कमी होईना...शामलने पाहिलं तिचा हात प्रशांतच्या हातात होता...आणि दोघेही रस्ता क्रॉस करत होते...

प्रशांतच्या त्या स्पर्शात शामलला त्याला तीची वाटत असलेली काळजी दिसली... त्या स्पर्शात आधार होता... आपलेपणा होता .... संध्याकाळची वेळ होती ...त्यामुळे मरिन ड्राईव्ह पूर्ण गजबजलेलं होतं...लखलखीत दिव्यांनी सारा परिसर उजळलेला होता.. शामल आणि प्रशांत तिथल्या एका कट्ट्यावर जाऊन बसले...बराच वेळ झाला तरी दोघे शांत होते...शामल एकटक समुद्राच्या उंचच उंच झेपावनार्या लाटांकडे पाहत होती...केसांच्या बटा तिच्या चेहर्यावर येऊन तिला सतत त्रास देत होत्या...पण तिच त्या कडे लक्षच नव्हतं...लाटांचा तो खेळ पाहण्यात ती गुंग झालेली... शांततेचा भंग करत प्रशांत शामलला म्हणाला...कसला एवढा विचार करते आहेस??? काही नाही असच तुला सांगितलं तर तू हसशील मला... नाही हसणारं बोल तरी... असं वाटतं या उंच झेप घेनारया लाटांवर मी ही स्वार व्हावं...आणि उंचच उंच जावं... प्रशांतला शामलच्या बोलण्यावर हसू आलं... म्हणूनच मी सांगत नव्हते...मला माहित होतं तू हसणारं...शामल नाक उडवत म्हणाली... सॉरी पण मी खरेच तुझ्यावर नाही हसलो... मग उगाच हसतो आहेस का?? काही नाही गं सहजच हसू आले... समुद्रकिनारी मस्त गार वारा सुटलेला...फेब्रुवारी महिना असल्याने थोडी थंडी ही जाणवत होती...प्रशांतने आपला कोट शामलला दिला...कोट घालून शामल ला जरा बरे वाटले... खूपच छान जागा आहे रे ही लांबच लांब पसरलेला समुद्र पाहताना खूप मस्त वाटतयं...असं वाटतयं इथेच बसून रहावं फेसाळनारया समुद्राकडे पाहत... ही माझी सगळ्यात आवडती जागा आहे...प्रशांत म्हणाला मला जेव्हा ही वेळ घालवावा वाटतो मी इथे येतो समुद्राच्या सान्निध्यात...सगळीकडे गजबजाट असला तरी आपण एकटेच असतो...आणि तो एकांत मला खूप आवडतो... बापरे!! तू असं काही विचार करत असशील असं कधी वाटलच नव्हतं... शामल मी असाच आहे...माझ्या मनाचा थांग कोणालाच लागत नाही... मी उद्याचा विचार करत बसत नाही...उद्या जे व्हायच ते होईल..त्याच टेन्शन आताच कशाला घेत बसायचे...आयुष्याकडे मी अजून ईतक्या गंभीर दृष्टीने पाहिलच नाही..... प्रशांत म्हणाला.. माझं तस नाही ...माझं आधीच ठरलं आहे एम.ए झालं की बी.एड करायचं आणि मग नोकरी...शिक्षक होण्याच स्वप्न मी अगदी लहानपणापासून पाहत आलेय... मी स्वप्न पाहत नाही नाहितर मग त्या मागे धावत बसावं लागतं ...प्रशांत म्हणाला पण काहितरी ठरवलं असशील न आयुष्याबद्दल... अजून तरी नाही..तशी वेळच आली नाही..पण आता असं वाटतयं ती वेळ लवकरच येईल.... बराच वेळ गप्पा मारल्यावर प्रशांत आणि शामल घरी जायला निघाले...चर्चगेट वरून प्रशांत रात्री पुन्हा शामलला ठाण्याला सोडायला आला... शामल नको म्हणत असतानाही प्रशांत तिला तिच्या सोसायटी पर्यंत सोडून मगच घरी गेला...त्याला घरी पोहचता पोहचता रात्रीचे अकरा वाजले... आज संपूर्ण दिवस दोघे एकत्र होते...शामल बरोबर वेळ घालवल्याने प्रशांत खूप खुश होता...

थोड्याच दिवसात होळीचा सण आला...प्रशांत होळीच्या रंगात न्हाऊन निघायचा तर शामल रंगापासून लांब रहायची.. होळीच्या सणाला प्रशांत ला फार ईच्छा होती शामलला रंग लावण्याची...सुट्टीचा दिवस असल्याने शामल घरीच होती...त्यामुळे त्याची इच्छा पूर्ण नाही झाली... होळीच्या दुसरया दिवशी प्रशांत शामलला भेटायला आला ..त्याने तिच्या साठी रंग आणले होते...होळीला घरातून बाहेर न पडणारया शामलने ही प्रशांत कडून रंग लावून घेतला...त्याच्या प्रेमाच्या रंगात तर ती कधीच रंगली होती...आज होळीच्या रंगातही रंगली... दिवस खूप मजेत जात होते...शामल आणि प्रशांत अधिकच जवळ येऊ लागले...एकमेकांच्या आवडीनिवडी जपू लागले...काळजी घेऊ लागले...एकमेकांना वेळ देऊ लागले होते...भेटीची हुरहुर दोघांनाही जाणवू लागली होती...एकमेकांसोबत वेळ कसा निघून जायचा समजायचच नाही... पण मनातल्या भावना अजून ओठांवर आल्या नव्हत्या... दोघांनीही आपल्या भावनांना अव्यक्त ठेवलं होतं...सारं काही समजून ही अनजान असल्याच भासवत होते... शामलच आयुष्य अगदी सरळ साधं तिने ठरवल्याप्रमाणे चालू होतं...पण प्रशांतच तसं नव्हतं...

आयुष्याकडे गंभीरतेने न पाहणारया प्रशांत च्या आयुष्यात बरीच उलथा पालथ घडणार होती...ती काय ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढच्या भागाची वाट पाहावी लागेल... शामल आणि प्रशांत आपलं प्रेम व्यक्त करतील का?? सोप्पा असेल का त्यांचा पुढचा प्रवास...की त्यांनाही सामना करावा लागेल विरोधाचा??? कित्ती हे प्रश्न हो न...पण सगळीच उत्तरे एकदाच मिळाली तर...कथेतील मजाच निघून जाईल नाही का..??म्हणूनच भेटूयात पुढच्या भागात शामल आणि प्रशांत सोबत..तोपर्यंत सायोनारा..तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा..तुमच्या प्रतिक्रिया मला लिखानाला प्रोत्साहन देतात...धन्यवाद...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance