क्रांतीज्योत-सावित्रीबाई फुले
क्रांतीज्योत-सावित्रीबाई फुले
स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ज्या काळात झाला. त्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासून व स्वातंत्रयापासून वंचित ठेवल्या जात होते.. अशा काळात सातारा जिल्हातील नायगाव या गावी खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरी 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्या आई -वडीलच्या एकुलत्या एक लाडाच्या कन्या होत्या. वयाच्या 9 वर्षी त्यांचा विवाह 12 वर्षच्या ज्योतिबांशी झाला. ज्योतीबा फुले उदारमतवादी, महान समाज सुधारकहोते. त्यांच्या सहवासात आपले व्यक्तिमत्व घडविण्याचे भाग्य सावित्रीबाईना लाभले.
विद्येविना मतीगेली |
मतिविना निती गेली ||
नितीविना गती गेली ||
गतिविना वित गेले.
वित्तविना शूद्र खचले |
इतके अनर्थ एका अविद्येने केले ||
त्या ज्योतिबांनी आपल्या पत्नीपासून स्त्रीशिक्षणाला आरंभ केला. प्रतिकूल परिस्थितिमध्ये सावित्रीबाईनी शेतात झाडाखाली बसून काळया मातीत अक्षरे गिरवीत, स्त्रीशिक्षणाची महुर्तमेढ रोवली. नंतर सरकारी शाळेत प्रवेश घेऊन पुढचे शिक्षण चालू ठेवले.
14 जानेवारी 1848 साली ज्योतिबानी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. सावित्रीबाईंनी शिकवायची जबाबदारी घेतली. सावित्री बाईंनी या सर्व प्रसंगाना सामोरे जात, आपले शिक्षण कार्य सुरु ठेवले. नंतर दोघांनी मिळून परत दोन शाळा काढल्या. त्त्यांच्या कार्यासाठी इंग्रजी सरकारने 1952 साली त्त्यांच्या सत्कार केला. आपल्या कार्यावर त्यांची निष्ठा होती.
सावित्रीबाई फुले त्या उत्तम कवयित्री /लेखिका होत्या. त्त्यांच्या 1854 साली 'काव्यफुले हा कवितासंग्रह प्रसिध्द झाला. स्त्रियांनी शिकावे, अनाथांना आश्रम मिळावा हे त्याचे ब्रीद होते. दलितांना मायेने सांभाळणारी, स्त्रीशिक्षणासाठी तन मन धनाने धडपडणारी, कुठल्याही समाज कार्याला धडाडीने सामोरी जाणारी, थोर सामाजिक कार्यकर्ती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांचा 10 मार्च 1897 दुर्देवाने प्लेगचा भीषण रोगाने मृत्यू झाला. अशा या माऊली ला माझे विन्रम अभिवादन |
