शब्दसखी सुनिता

Inspirational Others

4.0  

शब्दसखी सुनिता

Inspirational Others

कोयता

कोयता

7 mins
255


    दसरा सण जवळ येत होता म्हणून रघु आणि त्याची बायको अंजना आपल कुटुंब आणिआपल बिर्‍हाड घेऊन तोडीला जायची लगबग करू लागले. रघु त्याच्या लहानपणापासून त्याच्याबापुसोबत दरवर्षी तोडीला जायचा त्यामुळे त्याचशिक्षण काही झालच नाही, कस घेणार त्यालातान्ह्या भावाला सांभाळाव लागते. मायबाप उन्हात राबराब राबायचे तेव्हा यांची गुजराणचालायची. रघूच लग्न झाल. त्याला तीन मुलेदोन मुलींची लग्न झाली. त्यातल्या लहाणीचरकमाच लग्न यावर्षीच अलीकडे झाल. त्यांनाहीदोघांना तोडीला न्यायचा विचार चालू होता. त्याची मोठी मुलगी सरू आणि जावई रामहे ही त्यांच्यासोबत जायचे. रघुला एक मुलगागणेश चौथीपर्यंत शिकत होता. पोरग लय हुशार.त्याला शिकण्याची खुप ईच्छा होती. जेव्हा हंगामसंपुन ते घरी आपल्या वस्तीवर आले की गणेशशाळेत जायचा शिकायचा. अस करता करता तो चौथीपर्यंत शिकता. त्याला लिहता वाचतायायला लागल. बाकी आख्या वस्तीत कुणीहीशिकत नव्हत. सगळे शाळा सोडून तोडीचाहंगाम आला की मायबापाला मदत म्हणूनजायचे. नाही काम केल तर खायच काय ?हा प्रश्न होता. म्हणुन हंगामात पाच सहा महीनेरेटून काम करायचे. भाकर तुकडा दिवसातुनएकदाच खायचे. कधी बैलगाडीत बसुन रस्त्यातखाव लागे तर कधी रात्री जेवायला बसल कीबोलवण आल की जाव लागायच हे असल जीणगणेशला नको वाटायच. त्याला शिकायच होतआणि चांगल काम करायच त्याच स्वप्न होतं.              


रघु आणि अंजनाने सगळी तयारी करुनठेवली होती. गाडी आली की केव्हाही तोडीलानिघता येईल म्हणून... मी काय म्हणते...रकमाच्या नवर्‍याला तुम्ही तोडीला जायचंय म्हणून आधीच सांगुन ठेवा, म्हणजे तयारीत राहतील. आधीच रकमाच्या लग्नाच कर्ज हाय आपल्यावर आणि मुकादमकडून पणआपण उचल घेतलीय ती फेडायला नको का..म्हणुन म्हणते, संमदी जण जाऊ... यंदाच्याहंगामाला तेवढच कर्ज तरी फिटेल आणि थोडेपैक तरी शिल्लक पडतील. रघु - " अग , अंजे तुझ संमद बरोबर आहे. पणया म्हातारा आणि म्हातारीच काय करायच...? "त्यांच्यापाशी नको का एकजण, जरा विचार करकी... एक तर बापुंची तब्येतीच काय बी खर नाय.ते म्हातार कवा बी जाईल, म्या काय म्हणतुया...' गण्याला राहू दे की त्यांच्याजवळ, तेवढाच त्यांनाआधार होईल. तो संमदी काळजी घेईन आणिकाही दुखल खुपल तर तो त्यांना सरकारी दवाखान्यात नेऊ शकतो. नाहीतर ही एकटीम्हातारी काय करणार ? अन् तो शाळेत जातुया ना तर शाळाबी पुरी करेल एवढ वरीस शिकू देत्याला... अंजना - तुम्ही म्हणता ते संमद पटतया पण हेडोक्यावरच कर्ज कवा फिटायचा आणि तो मुकादम सोडील का आपल्याला, त्याची उचलनग का लवकरात लवकर द्यायला... एकतरमागचा हंगाम काही बी धड नाही गेला. संमदीपैक गेले, शिल्लक तर काही सुध्दा राहीलीनाही बघा. अग पण गण्या तुझ ऐकेल का ?तो नाही येणार म्हणत हुता. मी समजावेन त्याला, तुम्ही काय बी त्याला म्हणू नका.गणेश शाळेतुन आला. सगळीकडे तोडीलाजायची लगबग सूरू होती... थोड्याच वेळातगाडी येणार होती. सगळी लोक तोडीला जाणार होते. तो शाळेतुन आल्यावर त्यालामायने पटकन् भाकर खाऊन शेतातुन पाण्याचाड्रम भरूण आणायला लावला. " ये आये, काय ग आज तोडाला जायचय का ?"हो तू बी लवकर आवरून घे बघ... आता गाडी येईल. आधी प्यायला पाणी आण भरून बाबा,एकतर लांबचा पल्ला आहे. तुम्हांस्नी पाणी लागेल. "ये आये म्या नाय येणार यंदाच्या वर्षीतोडीला " म्या इथच बापु आणि आजीजवळराहील आणि शाळा शिकेल.अंजना - आर गण्या तु शिकलास की आतालिहिता वाचता येत ना... मग बस झाली कीशाळा... अरे शाळेला बी पुढ शिकाया पैका लागतोया..." जा ग तरिबी मला शिकायच... "अंजना - " आर कमावलेला पैका जर शाळेतभरला तर उद्या खायच का ? माय त्याला जवळ घेत तिकड शाळा असल तर बघु पणतु आधी आमच्यासंग चल. तुझ्या बराबरीच संमदीपोर आता शाळा सोडूनच निघाली नव्ह... तुझआपल काहीतरीच... जा लवकर...गणेश - मला माहीत आहे तिकड गेल का माझीशाळा बुडालीच... तिथ नाय ग शाळेची सोय.अंजना - गणेश ऐकत नाही म्हटल्यावर परीस्थितीपुढे हैराण झालेली ती चिडली आणि त्यालाम्हणाली...." हे बघ गण्या, तु काही आता लहाननाय, लाडात येऊ नग उगाच." रकमा ताईच्या लग्नाला आपण उसने घेतेलेलेलोकांचे पैक द्यायला नको का ? आन् त्यामुकादमकडुन उचल घेतलेली नको का परतकरायला ? त्याला मनाला फार वाईट वाटल.शाळा शिकण्याच्या वयात त्याला हे सगळकराव लागणार होत. म्हणून म्हणते, ' चल तुहीतोडीला संमदच कर्ज फेडता येईल आणियंदाचा हंगामही बरा जाईल. आन् शाळाशिकण हे काही आपल्या लोकाच काम नाहीत्याला पैका लागतोय बाबा, तुही जरा समजुनघे की... गणेश तरी रडत होता... त्याला तोडीलाजायच नव्हत. तेवढ्यात त्याचा बा आला...अरे गण्या जा की तेवढा ड्रम आण भरूनपाण्याचा... निघाव लागेल आपल्याला...     


गणेशने डोळे पुसले नि तो शेतात ड्रम भरूनआणायला निघाला. त्याला गाव अन् शाळासोडून जायच नव्हत. पण परीस्थितीमुळे त्यालामाय आणि बा बरोबर जाव लागणार होत. त्यांची परिस्थिती त्यालाही कळत होती, म्हणून तो मायने बोललेल ऐकत होता. आई म्हणालीना नाय कमावल तर खायच काय ? तिचहीबराबरच हाय म्हणा... जगायला पैक तर पाहीजे.ही गरीबी फार वाईट... गाडी येते संमदी बिर्‍हाडीदुसर्‍या जिल्ह्यात तोडीसाठी जातात... तिथेएका शेताजवळ त्यांची व्यवस्था होते. मालक चांगला होता तिथला. दुसर्‍या दिवशी पासुनलगेच तोडीला सूरूवात झाली. सकाळी पहाटेचउठाव लागे, पटापट आवरून उजाडायला लागलतोडीला लागायच. कींवा लांब रान असेल तरलवकर निघाव लागे. गणेश उठला नव्हता.आईने त्याला आवाज देऊ देऊन उठवला नितयारी करायला लावली. गाडीतच न्याहारी करूम्हणुन संग भाकर बांधुन घेतली. गडी माणसपहाटेच गुरांना चारा आणि पाणी देऊन बैलगाड्यातयार ठेवत. बायका पहाटे चारला उठून चुलीवरभाकरी थापायच्या. सकाळी उशीर झाला तरकाळा चहाही नशीबी नसायचा. गणेश आणित्याचे माय बाप निघाले तोडीला रानात. तिथेगेल्यावर गण्यालाही ऊस तोडायला लावला.आज त्याच्या हातात पेनाऐवजी कोयता होता.त्याला खुप वाईट वाटत होत, पण ईलाजच नव्हता. मायबाप तर दिवसातुन एकदाच जेवायचे.भर उन्हातही ऊस तोडीतच राहायचे. कधी कोयतालागला तस फडच्याचा तुकडा बांधला की लागलेपरत कामाला... अस त्यांच रोजचच चालायच.गणेश खुप दमुन जायचा. त्याला हे काम नकोवाटायच, पण त्याच्या बराबरीची सगळीच पोरशाळा सोडून तोडीला यायची. कधी कधी तरउशीर होऊ नये म्हणुन बैलगाडीतच दोन चारघास पोटात ढकलत होते. एकदा रानात तोडीलाजुपल की कश्याचही भान राहत नव्हत. आमच्यातल्या काही बायका मुलांना आडोशाला झोळीतटाकत. तेथेच खेळायला लावत. इकडे आईबापउन्हातान्हात कोयत्याने सपासप ऊस तोडायचे.लेकर उन्हात जायची. खेळायची. कधी कुणीहट्ट केला लहाने मुलाने तर माय ला नाईलाजानेमाराव लागायच. काम मागे पडू नये म्हणूनअस लकरांना समजाव लागे. गणेश हे सगळबघत होता.           


एक दिवस घाईघाईत ऊस तोडताना त्याच्याहाताला कोयता लागला, भर दुपारची वेळ, उन्हखुपच वाढलेल होत, त्याला त्या फडात खुपचगुदमरायला व्हायच. तरीबी तो तसच काम करतहोता, पण त्याच्या हाताला कोयता लागला,हातातुन थोड रक्त यायला लागल. त्याची मायआणि बा त्यालाच ओरडले..." तुझ लक्ष कुठ असतया रे, जरा कामावर ध्यान दे की " त्याच्या आईने त्याच्या हाताला साडीचाफडक्याचा तुकडा बांधला नि परत कामालात्याने सुरूवात केली. थोडा वेळ बसताही नाहीआल. जखम तर खुप दुखत होती. तो कसातरीऊस तोडत होता. संध्याकाळी अंधार पडायचाघरी जायला... सगळे दमुन जायचे, बायकांचीतर जास्त फरफट होत होती. त्यांना घरच आणीतोडीच दोन्हीपण बघाव लागे. गण्याच्या दोन्ही बहिणींची लग्न झालेली होती, त्याही तिथे होत्यातोडीला आलेल्या, परंतु सगळ्यांचा स्पयंपाकवेगवेगळा करायचे. आईला निम्मी मदत तरघरी गेल्यावर गण्याला करावी लागे. गुरांना पाणीआणि चारा देणे ही त्यालाच पाहाव लागे. बा तर तपास नसायचा तो रात्री पित बसायचा.त्याला जेवण करायला बोलवाव लागे. नाहीतरतिथेच पिऊन पडायचा. गणेशला खरच सगळ्यालोकांचा राग यायचा. त्याला रोजच्या दमण्यामुळेकामाला जायला नको वाटायच पण आता त्यानेसवय करून घेतली होती. गणेशला कळू लागलहोत की आपण या मुकादमाच देण नाही दिलतर हा आपल्याला उचलेल. त्याला दुनियादारीकळू लागली होती. त्याच शाळा शिकण्याचस्पप्न भंग पावल होत. कारण मुकादम म्हटलाहोता की तुमची मुले साखर शाळेत जातील, शिकू शकतील पण कसल काय ? बंद पडेल शाळा ? त्याला शाळेतील मुलांना पाहील का आपल्या शाळेची आठवण यायची पण तो लगेच भानावर यायचा आणि पुन्हा तोडीला लागायचा. शेवटी हा कोयताच आपल नशीब आहे अस समजुन तो पुढे जात होता.


एकदा त्याच्या बरोबरीची विठ्ठल, संत्या, मोहनपिंट्या... शेकोटी करून बसले होते रात्री निवांत. त्यांच्या गप्पा चालू होत्या. आपण शिकलो नाही याच कुणालाही वाईट नव्हत. त्यांनी विड्याप्यायला सुरूवात केलेली, त्यांच्या सर्वांचे वडीलांच पाहुन हे शिकले होते. ते समजायचेकी हेच आपल नशीब आहे. " अरे पण आपणशाळा शिकलो तर ही वेळच नाही येणारआपल्यावर... त्यांनी ऐकून उलट गण्यालासुनावल. " अरे हे तोडीच काम नाय केल आपणतर आपल कस भागणार ? तु जरा विचार कर की.... तु जर शाळेत शिकाया लागला, तर पैसेतुम्हांला कोण देणार ? तुझा बा च पण आतावय झालय आणि माय तर खुप करत असते.म्हणून ते म्हटले, शाळेचा विचार सोड आणिमाय आणि बा ला कामात मदत करत जा...        त्याची नंतर उरलीसुरली शिक्षणाची आशाहीसंपली. त्याचा बा घरी आल्यावर खूप आजारी पडला. त्याला उपचारासाठी बरेच पैसे गेले.खुप दवाखाने झाले. खुप चकर्‍या मारून झाल्या.पण तो शेवटी गेला. मग काय गणेशच्या नशीबीत्याच कोयत्याचा आधार होता. त्याची माय पण थकली होती. फक्त सहा महीने रोजगार मिळतो.बाकी तर सहा महीने रोजगारविना काढाव लागत.नंतर बा च्या जाण्यानंतर त्याने आणि मायनेमिळून कर्ज आणि लोकांचे पैक परत केले.गणेश आता मोठा झाला होता. दरवर्षी आईसोबत तोडीला जायचा... मग काही वर्षांनीत्याचही लग्न झाल. नशीबाने त्याला थोडी तरीशिकलेली मुलगी भेटली होती. गणेशला आपणशिकलो नाही याच फार वाईट वाटायच.पण काय करणार ? परीस्थितीमुळे सगळ कराव लागत. जगण्यासाठी पैसा तर लागतोच ना ! त्याशीवाय पोटाची खळगी कशी भरणार ?आणि संसार कसा चालणार ....


पण हे काहीअसो... त्याला एक मुलगा झाला. त्याला खुपआनंद झाला. त्याने ठरवल होत की आपली मुलं तरी शाळा शिकतील. गणेश आणि त्याचीबायको जेव्हा जेव्हा तोडीला जायचे नातेव्हा त्याला शाळेची त्या वेळेची आठवणयायची. त्याचा मुलगा मोठा झाला होता. त्याचशाळा शिकण्याच वय होत. सगळे तोडीला जायला निघणार होते. त्याच दिवशी गणेशनेएक निर्णय घेतला... त्याचा मुलगा राजु लाआपण शाळेत पाठवायच. त्याला तोडीला नाय न्यायच...माझ्या हातातला हा कोयता मीआयुष्याच्या शेवटपर्यंत खाली पडु नाय देणार.खुप कष्ट करेन.... पण माझ्या राजुच्या हातीमी कधीच कोयता नाय येऊ देणार ...त्याच्याहाती फक्त पेन असेल... पेन... तो खुप शिकेलआणि चांगल्या कामाला लागेल. निदान त्यालाअशी रोजगारासाठी धावाधाव आणि हे असलजीण जगाव लागणार नाही.... म्हणून गणेशतोडीला जायच्या आधीच त्याच्या राजुला बोर्डींग स्कुल मध्ये टाकतो... त्याला इथे यामुलांबरोबर शिकायच अस सांगतो. त्याच्याराजुलाही खुप आनंद होतो शाळेत... त्याला तिथे खुप छान वाटल असेल, त्याचा चेहराच सांगतहोता... राजुही वर्गात बसला आणि शिकण्याकडेलक्ष देऊ लागला... गणेश आता परत माघारीफिरला... त्याला जायच होत ना तोडीला पण या वेळेस त्याच्या चेहर्‍यावर एक वेगळ्याच प्रकारच समाधान होत....                                     


टीप - ऊसतोड कामगार गावागावांत तोडीसाठी येतात.उन्ह, वारा, थंडी कश्याचीही पर्वा न करता आपलकाम करतात. आज ज्यांच्यामुळे आपण चहात साखर घेतो, गोड खायला कुणाला आवडतनाही.... सणाला तर हमखास आपल्या ताटात गोड पदार्थ लागतोच.... हे कोणामुळे शक्य आहे.ऊसतोड कामगारांचं साखर उत्पादनामध्ये मोठयोगदान आहे.... त्यांना एकवेळेच साध जेवणही नीट आणि वेळेवर मिळत नाही. हे कामगार अशा कितीतरी अवहेलना सोसून जगत आहेत. अशा या कामगारांना योग्य तो न्याय आणि मोबादला मिळाला पाहिजे...सरकारने यांचा विचार केला पाहिजे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational