Jyoti gosavi

Inspirational

3  

Jyoti gosavi

Inspirational

कल्याणा छाटी

कल्याणा छाटी

1 min
1.2K


समर्थ रामदास स्वामींचे कल्याण नामक एक शिष्य होते . त्यांचे मूळ नाव "अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी"

 एकदा राम नवमी ची मिरवणूक चालू असताना एक झाडाची फांदी आडवी येत होती, जो कोणी ती फांदी छाटणार तो खोल विहिरीत पडणार होता.अंबाजीने वरील फांदी छाटली आणि तो खोल विहिरीत पडला. दिवसभर मिरवणुकीमध्ये सर्वजण अंबाजी ला विसरले. संध्याकाळी सर्वांना आठवण झाली त्यांना वाटले विहिरीत पडून किंवा पाण्यात गारठून अंबाजी  मेला असेल.

समर्थांनी विहिरीच्या काठावरुन अंबाजी कल्याण आहे ना अशी हाक मारली विहिरीतून आवाज आला "स्वामी आपल्या कृपेने कल्याण आहे" त्यानंतर त्यांचे नाव कल्याण स्वामी पडले. हे समर्थांचे लाडके शिष्य होते परंतु समर्थ वारंवार त्यांची परीक्षा घेत.

एकदा समर्थांच्या मांडीला गळू झाले.ते अत्यंत ठणका मारत होते परंतु त्याला उपाय असा होता की कोणीतरी तोंडाने हे गळू चोखून घेतले तर ते बरे होणार होते. कल्याणस्वामिनी मागचा पुढचा विचार न करता त्या गळुला तोंड लावून चोखणेस सुरुवात केली  तर काय आश्चर्य आत मध्ये सुमधुर आंबा होता.

तो समर्थांनी गळू म्हणून मांडीवर बांधला होता. असेच एकदा श्री समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी सज्जनगडाच्या एका कड्यावर उभे होते आणि समर्थांच्या खांद्यावरती ठेवलेली छाठी वाऱ्याने उडाली. त्यावर समर्थांनी "कल्याणा छाटी" एवढेच शब्द उच्चारल्या बरोबर कल्याण स्वामींनी मागचा-पुढचा विचार न करता सरळ दरी मध्ये झेप घेतली आणि समर्थांची छाटी घेऊन ते पुन्हा वरती आले.

इतका शिष्याचा आपल्या गुरु वरती प्रगाढ विश्वास असला पाहिजे तर गुरु आपल्याला कुठेही सांभाळून घेतात, आणि गुरु आपलीच चिंता करत असतात. ते सदैव आपल्या पाठीशी असतात असे या कथेतून आपणाला दिसते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational