Atul Bangar

Horror Crime Thriller

4.0  

Atul Bangar

Horror Crime Thriller

क्लेप्टोफोबिया

क्लेप्टोफोबिया

6 mins
284


सदरील कथा पुर्णतः काल्पनिक आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी. 


रात्रीचे दोन वाजले होते. सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले होते. रात किड्यांची किरकिर सोडता सगळी कडे स्मशान शांतता होती. रात किडे एकसारखी किरकिर करत होते. दुर कुठुन तरी कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. अशुभाची चाहुल आधीच लागल्या सारखी ती विव्हळत होती. त्यांच्या विव्हळन्याने रात्री ची ती भयानक शांतता ढवळून निघत होती.

वंदना तिच्या घराच्या वरच्या मजल्यावरील बेडरुममध्ये गाढ झोपलेली होती. घरामधील सर्व लाईट्स ऑफ दिसत होत्या. फक्त वंदानाच्या बेड मध्ये एक रेड लाईटचा छोटासा बल्ब चालु होता. त्याचा अंधुक सा लाल प्रकाश सर्व रुममध्ये पसरला होता. घराच्या मुख्य दरवाज्याच्या वरती एक लाईट चालु होता. मागच्या कम्पाउंड मध्ये एकही लाईट दिसत नव्हता. त्यामुळे कम्पाउंड मध्ये सर्वत्र अंधार होता.

रात्र मी म्हणत होती. रात्रीची ती कातर वेळ पुढ सरकण्या च नाव घेत नव्हती. जणु काही घड्याळाचे काटे एका जागी स्तब्ध झाले होते.

अचानक वंदानाच्या घरामागच्या कम्पाउंड वॉल वरुन खाली काहीतरी धपकन पडण्याचा आवाज आला . त्या काळ्याकुट्ट अंधारात एका व्यक्तीची अंधुकशी आकृती वंदनाच्या घरामागच्या कम्पाउंड वॉल वरुन खाली उतरून आली होती. त्या व्यक्तीच्या हातात कसली तरी बॅग दिसत होती. काळोखात त्या व्यक्तीने इकडे तिकडे एकदा पाहिल.पावलांचा आवाज न करता ती व्यक्ती हळूहळू घरामागच्या मागच्या मेन डोअर च्या दिशेने जाऊ लागली.

मेन डोअर जवळ जाऊन त्यान तो उघडण्याचा प्रयत्न केला परंतु तो आतुन लॉक केलेला होता. मग त्या व्यक्तीन सोबत आणलेल्या त्याच्या बॅग मध्ये हात घातला. डुप्लिकेट चाव्या असलेला एक चाव्याचा बंच त्याच्या हातात दिसत होता. त्यान त्यातील हर एका चावीन लॉक उघडुन पाहिल . पण त्यातील एकही चावी ने तो मेन डोअर उघडला नाही. या कारणानें ती व्यक्ती भयंकर संतापली. त्यान त्याच्या बॅग मधील स्कु्ड्राइव्हर सारख काहीतरी अवजार काढल आणि त्यान तो ते लॉक उघडण्याचा प्रयत्न करु लागला. बऱ्याच वेळ प्रयत्न केल्यानंतर त्याला तो दरवाजा उघडला.

घरामागच्या मेन डोअर ने त्या व्यक्तीन घरात प्रवेश केला. घरात सर्व त्र अंधारच दिसत होता. त्याच्या कडे असलेल्या टॉर्च च्या सहाय्याने तो घरात फिरु लागला.दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या त्या व्यक्तीला काही केल्या घरातले लॉकर सापडत नव्हते. ती व्यक्ती कसलीच भीती नसल्यासारखी घरात वावरत होती. खालच्या घरामध्ये काहीच भेटत नसल्याने ती व्यक्ती घराच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना शोधु लागली. किचनच्या बाजुने असलेला जिना त्याला दिसला. त्या जिन्याच्या सहाय्याने ती व्यक्ती वरच्या मजल्यावर गेली.

कोणत्यातरी अनोळखी व्यक्ती न आपल्या घरात प्रवेश केला आहे याची वंदनाला कल्पना सुद्धा नव्हती. ती शांत झोपलेली होती.

बेडरुम च्या त्या पॅसेज मधुन चालत ती व्यक्ती वंदनाच्या बेडरुम समोर येवून उभा राहिली. वंदानान दरवाजा आतुन लॉक केलेला होता. त्यान दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला पण त्याला तो आतुन लॉक असल्याच समजल . परत लॉक उघडण्या साठी तेवढीच झटापट करावी लागणार म्हणून ती व्यक्ती चिडली होती. त्यामुळे त्यान रागाच्या भरात दरवाज्यावर जोर जोरान लाथा मारण्यास सुरू केल.

"धाड ...धाड " असा जोरान आवाज होऊ लागला. तो जोराचा आवाज ऐकून वंदना दचकून जागी झाली. एवढ्या रात्री दरवाज्यावर कोण लाथा घालतय म्हणून ती पुरती घाबरली होती. तिचे हात पाय थरथर कापु लागले. तिच काळीज जोर जोरान धडधडु लागल. वंदाना मोठ्याने ओरडून विचारु लागली

"कोण आहे ते, एवढ्या रात्रीच घरात कसे घुसलात. "

समोरुन काहीच उत्तर येत नव्हत. ती व्यक्ती एकसारखी दरवाज्यावर लाथा घालत होती. प्रत्येक लाथे सरशी दरवाज्याच लॉक ढिल होत होत. वंदनाची भीतीन गाळण उडाली होती. काय कराव काही सुधरत नव्हत. त्या व्यक्तीच लाथा मारन सुरुच होत. दरवाज्याच लॉक जवळपास निखळुन पडणार.तोच वंदनान तिच्या बेडरुम मधला जड असलेला टेबल दरवाज्याला आडवा लावला. संतापलेल्या त्या व्यक्तीन शेवटीची एका जोरदार लाथ दरवाज्यावर घातली तस आतल लॉक तुटुन पडल. पण दरवाज्याला टेबल आडवा असल्याने त्याला तो उघडला नाही.वंदना मोठ्या मोठ्याने मदती साठी ओरडत होती. ती टेबलला दरवाज्या कडे ढकलून उभी होती. बाहेरुन त्या व्यक्तीन अंगातल्या सर्व ताकतीने दरावाजा आत ढकलला तसा टेबल मागे लोटला गेला. वंदना मागच्या माग कोसळली.

दरावाज्यात उभी असलेली ती भारदस्त आकृती वंदना नी पाहिली. रुम मधला तो हलकासा लाल लाईट त्याच्या चेहर्यावर पडला होता. त्या व्यक्तीचा दाढी वाढलेला चेहरा भलताच उग्र वाटत होता.त्या अंधारात तिन त्याला निरखून पाहिल. एक काळ्या रंगाच जॅकेट त्या व्यक्तीन घातलेल होत. त्या व्यक्तीच्या हातात एक लांब गुंडाळलेली नायलॉन ची दोरी होती. हे सगळ बघुन वंदनाला भीतीन कापरच भरल. जीव वाचवण्याचा फुटकळ प्रयत्न म्हणून ती रुम मधल्या एका कोपऱ्यात दडून बसली.

ती भारदस्त शरीराची व्यक्ती वंदनाच्या दिशेने पुढे सरकु लागली. ही व्यक्ती आज आपला जीव घेणार असा भयानक विचार तिच्या मनात आला. वंदना समोर येवुन ती व्यक्ती हळूहळू खाली बसु लागली. त्या व्यक्तीचा चेहरा वंदना च्या चेहर् या समोर आला. त्याचे डोळे लालबुंद दिसत होते. जुन्या जखमेची एक खुन त्याच्या डाव्या डोळ्यावर दिसत होती. त्या व्यक्तीने दोन पायांवर बसत वंदनाला विचारले.

"घरामध्ये असलेल्या लाॅकरची चावी कुठय? "त्याचा आवाज भरडा होता आणि त्याचा बोलण्यात रगेल पणा वाटत होता. भीतीन वंदनाची वाचाच गेली होती.

वंदना च्या न बोलण्यान त्याला राग अनावर झाला. त्यान जोरान तिच्या तोंडावर चापट मारली तसी वंदना जोरान रडु लागली. मदती साठी ती हाका मारु लागली." वाचवा,कोणीतरी वाचवा मला."

म्हणून ती ओरडत होती.

" तुला परत एकदा विचारतोय, लॉकरच्या चाव्या कुठ ठेवल्यास? "

"माझ्या कडे नाही येत त्या चाव्या , प्लीज मला मारु नका. " वंदना त्याच्या समोर गयावया करु लागली.

"गुपचुप चाव्या माझ्या हातात दे नाही तर तुझा गळा आवळयला मला खुप वेळ लागणार नाही. " त्यान तिला भीती दाखवण्याचा प्रयत्न केला.

"किती दा सांगु, त्या चाव्या माझ्या कडे नाही येत .माझा नवरा घेवुन गेलाय त्या चाव्या आणि तो नाहीये इथे."ती वैतागून म्हणाली.

त्या व्यक्तीन वंदनाचे केस रागान पकडले आणि तो तिच डोक भिंतीवर जोरान आदळू लागला. तो तिला आता मारुन टाकणार अस वाटत होत. नंतर त्यान तिच्या केसांना पकडुन तिला उठवल. ती वेदनेने विव्हळत होती. सर्व शक्ती निशी त्यान तिला बेडवर फेकल . वंदना झपकन बेडवर जाऊन आदळली.

त्यान त्याच्या हाता ली ती नायलॉन ची दोरी दोन्ही हाता त सरळ धरली आणि तो वंदना च्या दिशेने जाऊ लागला. वंदना जीव वाचवण्यासाठी दरवाज्याच्या दिशेने पळणार तोच त्यान त्या नायलॉन च्या दोरीचा फास तिच्या गळ्यात अडकवला.

तो फास वंदना च्या गळ्या भोवती घट्ट होऊ लागला. ती तिचे हात पाय झटपटु लागली. तिचा श्वास घुसमटु लागला. तिची ताकत त्या व्यक्ती समोर कमी पडु लागली. जीव वाचवण्याचे तिचे सगळे प्रयत्न फोल ठरु लागले.

तेवढ्यात एका लोखंडी रॉडचा खणकन आवाज झाला. अचानक तिच्या गळ्याभोवती असलेला दोरीचा फास सैल झाला. तिच्या माग उभा असलेली ती व्यक्ती धाडकन खाली कोसळली. वंदना जोरजोराने धापा टाकु लागली. क्षणभर काय झाल हे तिला कळलच नाही.

 गळ्याभोवती ची दोरी बाजुला करत वंदना न माग वळुन पाहिल. तिच्या माग झाले ला प्रकार पाहुन तिच डोक गरगरायला लागल. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. "ती उग्र चेहर् याची व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. त्याच्या डोक्यातुन एकसारख रक्त बाहेर येत होत. बाजुलाच तिची मुलगी रितु हातात लोखंडी रॉड घेवुन उभा होती. त्या रॉड वरुन रक्त ओघळत ते खाली टपकत होत."

आणि त्याच क्षणी गाढ झोपेत असलेली वंदना या भयानक स्वप्नाच्या पिंजऱ्यातुन दचकून जागी झाली. तिच्या चेहर् यावर सर्वत्र घाम दिसत होता.खुप वेळची दारावरची डोअर बेल वाजत होती. त्या आवाजान च तिला जाग आली. तिनं घड्याळा मध्ये पाहिल तेव्हा रात्री चे अकरा वाजले होते. तिचा पती सुभाष ऑफिस च्या कामानिमित्ताने उशीरा घरी येणार होता. अस त्यान तिला फोनवरुन सांगितल ही होत. कदाचित तिच्या ते लक्षातून गेलं असावं. विचित्र पडलेल्या स्वप्नामुळे ती अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होती. भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती .

सुभाष आला असेल म्हणून ती दरावाजा उघडण्यासाठी गेली. जाता जाता तिन रितु च्या बेडरुममध्ये डोकावून पाहिल. ती तिला शांत झोपलेली दिसली. दरवाज्यावर सुभाष एकसारखी घराची डोअर बेल वाजवत होता.

भीत भीत तिन डोअर वीव्ह मधुन पाहिल. दरावाज्यावर सुभाष च आहे याची खात्री झाल्यावर तिन दरवाजा उघडला.

सुभाष सोबत आणखी कोणीतरी व्यक्ती असल्याच तिला भास झाला.

"अग किती वेळ झाल डोअर बेल वाजवतोय , तुला सांगितल होत ना उशीर होईल म्हणून." न बोलता वंदना फक्त सुभाष कड पहात राहिली.

"आणि एवढी का घाबरलीस तु ? , वंदाना न सुभाष कड फक्त पहात राहिली.

"सुभाष तुझ्या सोबत आणखी कोणी आल होत का?" वंदना न त्याला विचारल

"नाही ग माझ्या सोबत कशाला कोण असेल " अस म्हणून तो घरामध्ये गेला.

त्यान वंदनाला दरवाजा लावून घेण्यास सांगितल. वंदना दरवाजा लावणार तोच घराच्या गेट जवळुन एक व्यक्ती तिच्या कडे एकटक पहात असल्यासारख तिला वाटु लागला.

तिन थोड नीट निरखून पाहिल

"त्या व्यक्तीन अंगावर काळ्या रंगाच जॅकेट घातल होत. त्याची दाढी विक्षिप्त पद्धतीने वाढलेली दिसत होती. त्याच्या एका हातात कसली तरी बॅग होती."

क्लेप्टो फोबियाने त्रस्त असलेल्या वंदनाला तिच्या स्वप्नातील व्यक्ती अस्तित्वात असल्या चा भास होऊ लागला. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror