Atul Bangar

Drama Tragedy Crime

4.2  

Atul Bangar

Drama Tragedy Crime

दानपेटी

दानपेटी

8 mins
270


हिरगावा वर काळ्या ढगांनी गर्दी केली होती. पाण्यानी गच्च भरलेले ढग गावा वर ओझ झाल्या सारखे भासत होते. क्षणात दणदण पाऊस येईल असी परिस्थिती झाली होती.गावातली ढासळलेली घर मेलेल्या मुडद्या सारखी पडली होती. त्यांच्या पडक्या भिंतीवरच वाढलेल गवत सुसाट वार् यान हेलकावे खात होत. सगळ कस चित्रात ल्या सारख स्तब्ध झाल होत. अचानक पावसाचे टपोरे थेंब गावावर कोसळू लागले. जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच गावातले रस्ते पाण्यान तुडुंब भरुन वाहु लागले. शेण मुत , लेंड्या नी गावची गटार तुंबु लागली. त्यान ती सगळी घाण रस्त्यावर आली होती .गावात ल देऊळ पावसान न्हाऊन निघाल होत.मंदिराच्या आडोस्याला चार पाच कुञी ऊब शोधत पडली होती. हिरगाव हे सगळं सोसत पाय दुमडून रस्त्याचा कडेला पडल होत.

गावातली माणस मानेला ओझ झाल्या सारखी गुडघ्यात माना घालून आपआपल्या खोपटात बसली होती. पण अस खोपटात बसुन पोटातली भुक कशी शांत व्हायची? काही ना वाटायच ही भुकच एक दिवस उपाशी राहून मरुन जाईल. पण त्यांच्या लेकरांना मरण काय असतय हेच माहीत नव्हत. त्याना फक्त पोटात पडलेल्या आगीची जाणीव व्हायची. निदान लेकरांसाठी तरी का होयना काहींना बाहेर पडावच लागणार होत.

असेच तिघे जण हिरगावच्या बस स्टँड मधी भुकेच मनोरंजन करत बसले होते. तिच मनोरंजन केल्यावर तरी निदान ती शांत बसल अस त्यांना वाटत होत.

'आयला ह्या पावसाच्या आज लईच लावून धरलय यानी ' चिमा आभाळाकड बघत नाराजी च्या सुरात बोलला.

'या **** ला बी आजच पडायच होत. घरात जोंधळ्याचा एक दाणा शिल्लक नाय, आपुन कस बी प्व्याट जाळु र पर लेकरांच काय?'किसन्या पावसावर राग काढीत म्हणाला.

'अार पर तुला काल परवाच सावकाराच्या इथ चांगली हमाली भेटली होती की .ते पैक संपल व्हय लगीच?' शंक्या न मधीच विचारल

'घरात खाणारी तोंड सहा अन राबणारा एकट्या म्या कसी पुरत लागायची?'

'ते बी खर हाय म्हणा.'शंक्याच तोंड.

तेवढ्यात सांगली हुन निपाणी ला जाणारी एक बस स्टँडा मधी घुसली. पावसाच पाणी स्टँडा मधी सगळी कड साठल होत. सर्वत्र घाण, राड दिसत होती. पाणी उडवत बस स्टँडा त येवून थांबली. हमाली ची वाट बघत बसलेले तिघ तराट पळत बस जवळ आले. बस मधुन धोतरावाले दोन तीन जण उतरले. त्यांच्या जवळ काही अवजड सामान दिसल नाही. धोतराचा सोगा वर धरुन तसेच ते पुढ निघुन गेले. काही वेळात बसनी ही बस स्टँड सोडल.हिरमुसल्या चेहर्यान तिघ परत स्टँडा च्या त्या खोपडात येवून बसले.

पावसान चांगलाच जोर धरला होता. तो रागान त्या कुजलेल्या बस स्टँडच्या खोपडावर कोसळत होता.त्याच्या खाली बसलेले हे तिघ आजच्या भूकेचा अंत कसा करायचा या विचारात होते. समोरच रामड्याच एकमेव हाटेल दिसत होता. गिर् हायकाचा पत्ता नव्हता पण तिथ कामाला असलेला रंग्या उगच बार- बार टेबल पुसत होता. स्टोव्ह वर चहा उकळत होता. पुढ भजी तळुन ती गार पडली होती.

किसन्याची ओझ वडायची गाडी पावसात भिजत पडली होती.काही दिवसांपूर्वी च त्यानी पाळलेल त्याच गाढव सावकाराचे धान्याचे पोते वाहता वाहता मरुन पडल होत .

'का रं किसन्या आता ह्या गाडीच काय करणार तु? तुव्ह गाढाव तर मारलस बिना आन पाण्याच.'चिम्यान किसन्या ला उगाच डिवचल.

'उगा अवचाटा सारख बोलु नग. मग आता पातुर जगल ते बिना चारा पाण्याच जगल व्हय?

'पण लेका म्हतार पणाला त्याच्या बोकांडी एेवढा बोझा दिलास, त्यानच मेल बघ ते.'शंक्या च तोंड मधीच बोलल.

'अारं गाढाव माझ ,गाडी माझी, तुम्हाला काय तरास?'

'आम्हाला कसला तरास. तरास तुलाच हाय, बस आता सवताच गाडी ओडत.' चिम्या न किसन्या ला खिजवल .

तेवढ्यात बस स्टँडात दुसरी एक बस शिरली. चिखल उडवत ती रामड्याचा हाटेल समोर येवून थांबली.गिर्हाईक येईल म्हणून रंग्यान परत एकदा टेबलावर फडक मारुन घेतल. बस स्टँडात बसलेले तिघ या वेळेस जागचे हालले नाही. ए.स टी तुन कोणी सामान घेवून खाली उतारल्या शिवाय जायचच नाही अस त्यांनी ठरवल. बस मधला एक सुद्धा माणुस जागचा हालला नाही. ढोरांना गोचीड चिकटुन बसावा तसी ती बस मधी बसुन राहिली.बस चा ड्रायव्हर आणि कंडक्टर तेवढे बस मधुन उतरले. रामड्याचा हाटेलात जाऊन त्यांनी चहा घोटला.चामड्याच्या पिशवीतून ड्रायव्हर न बारा आणे काढले आणि रामड्याचा हातावर टेकवले.रामड्याचा चेहरा पार उतारला .

पाऊस कमी व्हायच नाव घेत नव्हता. काळ्या ढगांन मुळ लवकरच अंधार पडल्या सारख वाटत होत.

चिम्यान जवळ असलेली अर्धी बिडी पेटवली.तिचे झुरके घेत तो समोर उभा असलेल्या बस कड एकटक बघत होता.

'च्या मारी आजचा दिस असाच जायच्या माग दिसायला . सकाळ ची पार रात व्हायला आली पण साधी एक हमाली भेटु नाय.'चिम्या चिंतेच्या सुरात बोलला.

'तुला र कशाला चिंता. दिस असाच फुकाट जाऊन देणार् यात ला हाईस व्हय तु. सतरा भानगडी करुन प्व्याट जाळसील तु.'शंक्याच तोंड.

'आता भट्टी वर दोन तास काम केल तर दोन रुपय जाग्यावर काढल पण मागच खालेल दणक आठवल की नग वाटतया.'

'सुखाच बारा आण नग वाटत्यात तुला. चांगल वरीस भर जेलात सडत होतास की.त्या दोन रुपाया पायी दुसर तंगड बी घेशील मुडुन.'शंक्या चिम्या ला समजावत म्हणाला.

'आर इथ अास भुकेला हसवत बसण्या परीस चार दणक खालेल बर.'

'याला समजावण म्हंजी आपल डोक फोडून घेण्यासारख हाय बघ.'शंक्या किसन्या कड बघत बोलला.

किसन्या च त्यांच्या बोलण्या कड लक्ष नव्हत.समोरुन च गावतले दहा बारा लोक बस स्टँडा च्या दिशेने येताना त्याला दिसले.

'गावातले इतके लोक कुढ निघाले रं या वक्ताला?शंक्यान किसन्या ला विचारल.

'आर ते लोक आपल्या कडच येत्यात वाटत.'किसन्या

'आयला एखाद काम बीम त घिवुन नसतील आली आपल्यासाठी?.'चिम्या त्याचा लंगडा पाय सावरत म्हणाला.

गावात ले लोक तावा तावान त्या तिघा जवळ आले.

'चला र ,तुमच्या तिघाला बी सरपंचान मंदिरा समोर बोलावल हाय.' लोकांच्या घोळक्या समोर असणारा दिगांबर त्यांना म्हणाला.

'कामुन बोलावल हाय दादा. काय काम बीम हाय काय आमच्यासाठी?'चिम्या न लागलीच विचारल.

'गप गुमान चला, आघाव प्रश्न ईचारु नगा.' काडी वानी हातपाय असणाऱ्या दिनकर न त्यांच्या वर दम टाकला. गावात नेमकी काय भानगड झालीय आणि त्याच्या शी आपला काय संबंध म्हणून तिघ पण विचारात पडले. 

किसन्यान जमिनीवर पडलेली त्याची खाकी टोपी उचालली आणि तो त्या लोकांसोबत गावात जायला निघाला. लगोलग त्याचा माग शंक्या आणि चिम्या निघाले.

पावसाचा जोर जरा कमी झाला होता. गावात अंधार गडप पडला झाला होता. रस्त्यान नीट स दिसत नव्हत. तसच रस्त्यान ठेचकाळत ते तिघांना घेवून मंदिराकड चालले होते.

गावात मंदिरा समोर पेट्रोमॅक्सचा दिवा जळत होता .लोकांनी मंदिरा समोर गर्दी केली होती. गावच्या मंदिराचा सदा बामण सरपंचा सोबत उभा होती.बाजुलाच पोलीस पाटील या तिघांची वाट बघत उभा होता.

दहा बारा लोकांसोबत हे तिघ मंदिरासमोर आले. चिम्या एका पायांनी लंगत मागुन येत होता. मंदिरा समोर जमलेली गर्दी पाहुन किसन्या आणि शंक्या च पाय थर थर कापु लागले. चिम्यानच काहीतरी भानगड केली का काय म्हणुन ते दोघ रागानी त्याचा कड बघु लागले.

चिम्या जसा समोर आला तसी सरपंचान त्याचा पेकाटात लाथ घातली. चिम्या व्हरगाडुन जमीनीवर पडला. पडल्या पडल्या तो विव्हळु लागला.

'आयो दादा हानु नका ना, काय केलय म्या ? अस म्हणून चिम्या रडु लागला.

'वो सरपंच दादा कामुन हाणायले त्याला उगाच? दिसभर आमच्या संगच होत ते.'किसन्या सरपंचाला म्हणाला.

तस माग उभा असलेल्या दिगांबर न किसन्या च्या कमरात लाथ घातली. किसन्या कोलमडून जमीनीवर पडला.

'गावातल्या देवाच्या दानपेट्या सुद्धा पुरानात व्हय र तुम्हाला.'गावचा पोलीस पाटील पुढ होऊन बोलला.

'दानपेटी , आवो काय बोलायले पाटील तुम्ही , आज दिसभर बस स्टँडा तच बसुन हाऊत आम्ही.' शंक्या रडका चेहरा करुन म्हणाला.

'सरपंच, ह्या चिम्यानीच या दोघांना हाताशी धरुन हेव डाव रचला असल, लई बेरकी हायीत ही .'अंगात खोट अवसान आणुन दिनकर म्हणाला.

'गुमान केल्याला गुन्हा कबुल करा, दानपेटीतल चोरल्याल पैस कुठ हायत ते सांगा.'सरपंचान थोडा दम टाकुन पाहिला.

'देवाची आन घेवुन सांगतोत दादा, मंदिराच्या जवळ सुदीक गेलो नाय आम्ही.'किसन्या

'ही अशी आयकायची नाहीत. दांडक्यानी चांगली चिंबवील्यावर बघा कशी घडा घडा बोलत्यात.' दिगांबर ताकदीचा माज असल्या सारखा बोलला.

'अय सिंदळीच्या , पोलीस पाटील मेला काय गावचा, व्हय माग तिकड.'पोलीस पाटील.

शंक्या ,किसन्या , चिम्या चोरी न करुन चोरागत उभी होती. गावात ल्या देवाची दानपेटी कोणी फोडली कुणास ठाऊक . बेरकी चिम्या न भुतकाळात केलेल्या सतरा भानगडी आज त्यांच्या अंगावर धावून आल्या होत्या. चिम्या च्या संगतीन राहन त्या दोघांना चांगलच महागात पडल होत.

किसन्या ची बायको गर्दी च्या एका बाजूला उभा राहून सगळ पहात होती. हे विपरीत काय झाल म्हणून ढसा ढसा रडत होती.

'हे बघा आजुन बी येळ गेलेली नाय, तालुक्याच पोलीस यायच्या आत सगळ खर खर सांगा. पोलीस स्टेशनात नेल तर लई तुडवतील तुम्हाला.' पोलीस पाटील समजुतीच्या सुरात बोलला.

'पाटील आम्ही खरच सांगतोयात, आमचा यात काय बी हात नाय.'शंक्या काकुळतीला येवून बोलला.

तालुक्याच्या पोलीसांची गाडी गावच्या वेशी तुन आवाज करत मंदिरा समोर आली. सब इनस्पेक्टर सोबत दोन हवालदार गाडीतून खाली उतरले. पोलीस पाटील गडबडीन समोर गेला.

'काय पाटील, काय भानगड आहे.'इनस्पेक्टर नी पोलीस पाटलाला आल्या आल्या विचारल.

'काही नाही साहेब, या तिघांनी मिळुन गावच्या देवाची दानपेटी फोडली. 'पोलीस पाटील

'नाय सायब, आम्ही काय सुदीक केल नाय, खोटा आळ घेवून या लोकांनी आम्हाला यात घेरलय.'किसन्या पुढ होऊन बोलला.

'अए भाडखाऊच्या , लई दात आले व्हय र तुला.'अस म्हणून सरपंच किसन्या वर धावुन गेला. इनस्पेक्टर न सरपंचाला शांत रहायला सांगितल .

'यांनीच ती दानपेटी फोडली याचा काही ठोस पुरावा हाय का तुमच्या कड?'इनस्पेक्टर न पोलीस पाटलाला विचारल.

'पुरावा कशाला पाहिजी शंभर टक्के या तिघांच च काम हाय हे.ह्या चिम्या वर पहिल्या च दोन केस हायत चोरीच्या.' दिगांबर च्या अंगात परत बळ आल.त्याच्या घरात झालेल्या चोरीत चिम्याचाच हात होता असा त्याचा ठाम विश्वास होता.चिम्या ला जेलात घालून त्याला चिम्या वरचा सुड उगवायचा होता.

'सायब, म्या पहिल असल धंदे करीत होतो.त्याच्या साठी वरीस भर जेलाची हवा बी खाऊन आलोय.पर आता म्या ते सगळ सोडून दिलय सायब.'चिम्या स्वतः ची बाजु मांडत म्हणाला.

'गावात यांच्या बिगर हे काम कुणी बी करायच नाय सायब.काल रातच्या ला ह्यो चिम्या मंदिरा जवळ येरझर् या खालताना दिसला होता .हमाली भेटली नसल ,म्हणून देवाची दानपेटी दिसली.' दिनकर इन्स्पेक्टर ला स्पष्टीकरण देत बोलला.

दानपेटी या तिघांनी च फोडली अस दिगांबर आणि दिनकर बार बार इनस्पेक्टर च्या मनात घालत होते.अधुन मधुन एकमेकांना ईशारा करुन काहीतरी खुणवीत होते.

इनस्पेक्टर आणि पोलीस पाटील बाजुला जाऊन थोड काहीतरी बोलले.

'हवालदार टाका यांना गाडीत, बघुत पोलीस स्टेशनला जाऊन काही बोलली तर बोलली .'इनस्पेक्टर न सोबत आलेल्या हवालदारांना आॅर्डर दिली .

'सायब आयका आमच , आम्ही काय नाय केल.'

'सायब ह्यो सगळा ह्या दिग्या आणि दिनक्याचा डाव हाय. यांनीच फोडली असल ती दानपेटी ,आम्हाला सोडुन द्या सायब.

तिघपण इनस्पेक्टर समोर गयावया करु लागले. इनस्पेक्टर न त्यांच ऐक आयकल नाही.

'जे काय बोलयच ते पोलीस स्टेशनला.'अस म्हणून इनस्पेक्टर गाडीत बसला.'

हवालदारांनी तिघांना गाडीत कोंबल आणि गाडी आवाज करत गावच्या वेशी बाहेर गेली.तमाशा संपल्या सारखी मंदिरा समोर ची गर्दी कमी होऊ लागली.

दिगांबर आणि दिनक्या एकमेकां कड बघुन बेरकी हसत होते.

' साप बी मेला अन काठी बी तुटली नाय, अायला काय डाव टाकला त्वा, मानल गड्या.'दिगांबर मोठ्या न खिदाळत दिनक्या ला म्हणाला.

'आर मह्या संगट रहाय फक्त ,तुला आणखीन लई डाव शिकवितो.'

अस म्हणून दोघ तिथुन हालते झाले. दानपेटी फोडणारे खरे चोर बाहेर मोकाट फिरत होते.अन निरपराध तीन जण जेलमध्ये डांबण्यासाठी नेले होत.त्यांच्या पोटातली भुक उपाशी राहून आज खरच मेली होती.

मंदिरातल्या देवा समोर जळणारा दिवा वार् याचा झोकान विझून गेला होता.अंधारातून मंदिरात ला देव डोळ नसल्या सारखा बघत होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama