मैस्मबा Part 1
मैस्मबा Part 1
शांती न तानीला ओढतच नान्ही कड नेल. आए नग, आए नग म्हणून ती ओरडत होती. शांती न आज निर्धार च केला होता. तानीच्या डोक्यातील जठ काही झाल तरी कापुन फेकायची .
तानीच्या डोक्यात देवीची जठ आहे हे जर लोकांना कळाल तर तानीला जोगतीण म्हणून सोडावी लागले. तानीच्या आयुष्याची अशी राख रांगोळी झालेली तिला पहायची नव्हती. तिन तानीला नान्ही त नेऊन बसवल. तिच्या एका हातात धारदार विळा होता. दुसर्या हाताने तिन तानीच्या डोक्यातली ती जठ पकडली.तिन त्या विळ्या कड एकदा पाहिल .विळा जठेच्या मुळासी धरला आणि एक जोराचा हिसका मारला तशी जठ कापुन तिच्या हाता त अाली आणि तानी वेदनेन मोठ्याने विव्हळली 'आएएएए'.शांती हातात ल्या जठे कड रागान बघत होती.
मास्तरांचा धडा शिकवुन झाला होता .मास्तर मुलांना पुढ काहीतरी सांगणार तेवढ्यात पिन्याची आणि दिग्याची आपआपसात कुजबुज सुरु झाली. मास्तरांनी हे पाहताच त्यांच्या डोक्याच तापमान हालल.
-'दिग्या , पिन्या काय चालयय?मास्तर जोरात ओरडले तसे दोघ जाग्यावर टाणकन उडाले.'
- 'ते.क.. क.. क काही नाही मास्तर.' घाबरट पिन्याची झालेली ततमम पाहुन सगळा वर्ग हसु लागला. "टनटनटनटनटन"
जोरात शाळेची घंटा वाजली . कोंडवाड्यातुन गुर बाहेर पडावी तसी सगळी पोरं वर्गाच्या बाहेर पडली. वासराच्या नाकात वार भराव तसी पळाली.
दिग्या आणि पिन्या कसेबसे मास्तर च्या मारातुन वाचले. सातवीच्या वर्गात शिकणारे हे दोघ बालवाडी पासूनचे मित्र. दोघांची मैत्री असी घट्ट की परसाकड जायच म्हणल तरी दोघ सोबतच. दोघांपैकी एक जरी सोबत दिसला नाही तर गावातले लोक विचारत "दुसर बेण कुठ गेल? ".त्यातला दिग्या भलता कुटाणेखोर होता आणि त्याला साथ द्यायला पिन्या. रोज काही ना काही कुटाणा करुन घरावर बालट आणल्या शिवाय दोघांना चैन पडत नसे.
शाळा सुटल्या सुटल्या दोघ घराकडच्या रस्ता ला लागले. गावची शाळा थोडी आडबाजूला होती. शी दीडशे घर असलेल हे हिरगाव. त्यात गावातली घर इकड तिकड विखुरलेली होती. दिग्याच आणि पिन्याच घर आसपासच होत. त्यामुळ रोज दोघ सोबतच शाळेला यायचे .
दोघ जण गुमान रस्ता न जात होते. तेवढ्यात पिन्या म्हणाला
-'वाचलो रे भो आज, नाहीतर मास्तरांनी बरीगत नसती ठेवली'.
-'हावो ना, शाळा सुटली म्हणून बर झाल. 'दिग्या लगोलग बोलला.
-'होय र पिन्या मास्तरांनी आज शिकवलेल्या धड्यातल खर असल काय रं?मला तर लइ वाईट वाटल बघ. '
-काय माहित? असल बी. पण तुला माहितेय का ती देवीची जठ कापली तर देवीचा कोप होतो.
-'तुला कोन सांगितले हे? '
-'म्या माझ्या आजीला बोलताना आयकल होत एकदा. '
-ह्याचा....चल बे काय बी नको फेकु. कोप बीप असल्या गोष्टी नसत्यात कुठ. '
-तुझा इश्वास नसल माझा हाय.... देवा आईईई.....माफ कर गं लेकराला. पिन्या जोरान विव्हाळला .
-'अए.... अर गप की...उगा इव्हळु नग रस्तानी. 'दिग्या पिन्या वर भडकून म्हणाला.
असच गप्पा भांडण करत दोघजण गावच्या फाट्यापर्यंत आले . गावच्या फाट्यावर गावातल्या च रघ्याची चहाची टपरी होती. गावातले रिकाम टेकडे लोक तिथ दिवसभर पडुन असतात. कोणी पेपर वाचत तर कोणी पत्ते खेळत दिवसभराचा वेळ कसातरी घालवत असत.
दिग्या आणि पिन्या टपरी समोरुन जात होते. तिथ असलेल्या लोकांच्या काहीतरी गप्पा सुरु होत्या. पेपर वाचणारा एकजण म्हणाला.
-'समाजात चांगल काम करणाऱ्या ला जगु देत नाहीत राव.'
-'का? काय झाल? दुसर्या एकान विचारल.'
- नरेंद्र दाभोळकरांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हे काय बातमी आली.'
-'अवघड दिवसमान आलेत लका, लोकांना लुबाडणार्याच्या गळ्यात फुलाच हार पडत्यात आणि लोकांच भल करु पहाणाऱ्यांचा च्या छातीत गोळ्या.'
हे सगळ बोलण तिथुन जात असलेल्या पिन्या आणि दिग्याच्या कानावर पडल . पिन्याचा मनात लागलीच प्रश्न निर्माण झाला.
- 'हे दाभोळकर कोन रं दिग्या?
-'काय माहित लका, पण चांगला माणूस होता वाटत.'
अस म्हणून दिग्या गप्प झाला आणि दोघजण फाट्याच्या खालच्या बाजु न असलेल्या पांदी च्या रस्त्याकड जाऊ लागले.
ही गावची पांद म्हणजे गावातुन फाट्यावर येण्यासाठी साठी चा रस्ताच होती. पांदी च्या दोन्ही बाजूंना दगडांनी रचलेल्या पवळी होत्या. बोराटीच्या झाडांनी पांदी च्या दोन्ही बाजुन गर्दी केली होती. अधी मधी लिंबाची झाडही होती.
पिन्या आणि दिग्या या पांदीनच घराकड निघाले होते. पिन्या दोन- चार दगड हातात घेऊन ती उगाच इकड तिकड भिरकावत होता.त्यामुळ बोराटीत बसलेली पाखर भेदरून उडु लागली.दिग्या आपला शांतपणे कसलातरी विचार करत चालला होता.
पांदीन सरळ पुढ गेल की एका वळणावर दोन रस्ते फुटत होते. एक रस्ता सरळ गावच्या वेशी कड जात होता तर दुसरा रस्ता पिन्या आणि दिग्याच्या वस्तीकड जात होता. त्या वळणावर भल मोठ लिंबाच झाड होत. पांदीन इकड तिकड हुंदाडत दोघजण त्या रस्त्या च्या वळणावर असलेल्या लिंबापासी आले....
Part 1 to be continued.
