STORYMIRROR

Atul Bangar

Tragedy Crime Thriller

3  

Atul Bangar

Tragedy Crime Thriller

The Pianist

The Pianist

2 mins
205

The Pianist...

रात्री ची वेळ. नाझी सैनिकांची एक गाडी ज्यु लोक रहात असलेल्या एका अपार्टमेंट खाली येवुन थांबते.नाझी सैनिक आल्याच समजताच ते लोक आपल्या घरातील सगळ्या लाईट्स बंद करतात जेणेकरून नाझी सैनिकांची नजरेस ते पडू नयेत.ज्यु लोकांच्या घरांची विनाकारण झाडा झडती घ्यायची, त्यांना नाहक त्रास देऊन शहरातुन बाहेर काढायच अस काहीस नाझी सैनिकांच धोरण असत. नाझी सैनिक अपार्टमेंट मध्ये घुसुन थेट तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरात शिरतात. त्या घरातील सर्व लोक रात्रीच्या जेवणासाठी डायनिंग टेबल वर बसलेले असतात. नाझी सैनिकांना पाहून ते लोक भीतीने एकदम स्तब्ध होतात. नाझी सैनिकांचा कमांडर त्या सर्वांना उठून उभा राहण्याचा आदेश देतो. ते सर्व लोक झटकन उभे राहतात पण त्यांच्यातीलच व्हीलचेअर वर बसलेल्या असह्य वृद्धास मात्र उठून उभा राहणे शक्य होत नाही. तो कमांडर त्याच्यावर जोरात ओरडून त्याला उभे राहण्यास सांगतो पंरतु तो वृद्ध तसाच बसुन राहतो. रागावलेला तो कमांडर सोबत असलेल्या सैनिकांना त्या वृद्धास घराच्या गॅलरी मधुन खाली फेकण्याचा आदेश देतो. क्षणाचाही विलंब न करता ते सैनिक त्या वृद्धास व्हीलचेअर सकट उचलून घराच्या गॅलरीत आणतात. अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून ते त्या असह्य वृद्धास निर्दयपणे खाली फेकतात.जमीनीवर जोरात आपटल्यान त्या वृद्धाचा जागीच मृत्यू होतो. त्या नंतर ते नाझी सैनिक घरातील सर्व व्यक्ती ना अपार्टमेंट च्या खाली आणतात. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या वृद्धा व्यक्ती साठी रडण सुद्धा त्याच्याकडून शक्य होत नाही. नाझी सैनिक त्या सर्व लोकांना स्वत: जीव वाचवण्यासाठी पळायला सांगतात. जीवाच्या आकांताने ते लोक त्या रस्त्यावर सैरावैरा धावायला लागतात पण तेवढ्यात नाझी सैनिक त्यांच्या पाठीमागून गोळ्यांचा फैरी पाठीची चाळण करून त्या गोळ्या त्या लोकांचा जीव घेतात.क्षणात त्या रस्त्यावर मृतदेहांचा खच पडतो. 


दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यु लोकांवर झालेल्या अन्याय व अत्याचारां वर बनलेले अनेक सिनेमे पाहिलेत.परंतु The Pianist या सिनेमाची गोष्ट थोडी वेगळी आहे.हा सिनेमा पहाताना काही ठिकाणी अक्षरश: कंठ दाटून येतो. या सिनेमातील हा सीन पाहून नकळत पणे डोळ्यात पाणी आल्या शिवाय रहात नाही.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy