खरी श्रीमंती
खरी श्रीमंती
रात्री झोप लागत नव्हती. काय कराव कळत नव्हतं.
“थोड़ घराबाहेर फेर फटका मारून येतो “ विवेकने बायकोला हाक दिली.
“लवकर या, वाटेत कोण भेटल तर गप्पा मारत बसू नका” बायकोही घरातून बोलली.
विवेक शिड्या उतरत घराबाहेर आला.
राजुभाई दुकान बंद करत होता, “राजुभाई” विवेकने त्याला हाक मारली.
राजुभाई भेटला की आध्यात्मिक गप्पा चालू झाल्या समजायच्या ,
विवेकने शांतपणे त्याच बोलण ऐकले.
राजुभाई,’’ तुम्ही पण खूप लोक येतात. आम्ही आता बरेच मैराथन धावल. मेडल खूप जमलय. डॉक्टर, डेन्टिस्ट खूप लोक आपल्या ग्रुप मध्ये येतात.आजच फी भरली, तुम्ही। पण येवा की.”
राजुभाई विवेकला मँरेथोन स्पर्धेत सहभागी होण्याबद्दल सांगत होता.
राजुभाई विवेकला भेटला तर मराठीच बोलायचा.
त्याने त्याच बोलण ऐकून घेतल.
विवेकने सांगितलेल्या आध्यात्मिक शिबिरात तो जावून आला होता.त्याची आठवण त्याने करून दिली” विवेक भाऊ आम्ही ते तुम्ही संगीतालेल कोर्स केल, चांगल फायद झाल, तुम्ही कधी करणार. मी माझ्या मुलाला पण करून घेतल, बायको पण महिन्यामधि करून घेईल”
तू फक्त लोकांना सल्ले देतो हे बायकोच म्हणण विवेकला आठवल आणि चुकल्या सारख वाटल.
“मरेथोंन करूया राजुभाई ” विवेक राजुभाईला सांगून निघून गेला.
राजुभाईची प्रतिक्रिया आणि स्वतःच बोलण याने ओशाळलेल्या विवेकने शिबिर कार्यक्रम पक्का करून टाकला.
दोन दिवसाचा मन चिंतन शिबिराचा कार्यक्रम पूर्ण करून विवेकला थोड़ बर वाटत होत,
” हे सगळ किती दिवस टिकेल कोण जाणे.” विवेकची बायको पुटपुटली आणि विवेकची तपश्चर्या भंग झाली.
शिबिरात असताना एक प्रश्न विचारण्यात आला होता, तो त्याच्या डोक्यात घोळत होता, “तुम्ही किती श्रीमंत आहात, आणि कसे श्रीमंत आहात”
विवेकने मनातल्या मनात सगळे हिशोब मांडले होते, राहत घर ,घराची कींमत, बँकेचे हप्ते, विमा, गुंतवणूक, आणि वगैरे, वगैरे….
विवेक आता सतत दुसऱ्याशी स्वतःला तोलू लागला, स्वतःला आजमवायच कस.आपण हा प्रश्न आपल्या बायकोलाच विचारुया, पण विचारयचा कसा.
विचारांची देवाणघेवाण करायची तरी कोणाशी. चल विचारुन टाकुया नाहीतर एकदम परखड़ बोलनारी हिच ती एकमेव व्यक्ति.
“काय रे काय घुटमळतोस, चल मधून बाजूला हो” बायको तिच्या नेहमीच्या सुरात म्हणाली
,”मला तुला काही तरी विचारायचे आहे.
एकदम खर खर उत्तर हवय.’’
‘’अरे किती वेळ झालाय एक प्रश्न विचारतोयस, एवढयात माझ जेवन तयार झाल असत. चल जा हितून, नसते प्रश्न विचारु नकोस.’’
‘’एक मिनिट, फक्त एक मिनेट ‘’
‘’दिवसभर मर मर मरायच आणि संध्याकाळी घरी येवून हा माणूस त्रास देणार”
“आता करायचे तरी काय, हरि हरि श्री हरि, पाषाण तो देव, अन्धराच रंग, पांडुरंग”
विवेक काहीच न बोलता मनात पुटपुटला.
प्रसंगानुसार गाण , कविता म्हणायची विवेकला सवय होती.विवेकने गाण गायल तर कुटुंब त्याच्यावर तूटुन पडायच.
विवेकला वाल्या कोळयाची गोष्ट आठवली, कोल्हाच तो सगळ्यांना लूबाडत होता. आणि कुटुंबाच पोट भरत होता,पण ह्या गोष्टीचा आपल्याशी काय सबंध, विवेक स्वतःशी पुटपुटला. आपल्याकड़े अस काय आहे जे आपल्याला श्रीमंत बनवेल.आनंदी बनवेल.सगळ्या गोष्टी पैश्याकड़े येवून अडतात.
आज संजय विवेकला भेटायला आला होता, दोघेही लंगोटी यार होते. विवेकला आज संजय बरोबर डब्बा खावा लागला, संजय “ भाग्यवान आहेस विवेक, रोज टिफ़िन देते वाहिनी.वा, पनीर ! रोज वेग वेगळी पाककृति, पंच पकवान्न!
हे सगळ सोप्प नसत, मुलाला संभाळते, मीच बघ, घरी पण पार्सल मागवुन खातों. वाहिनीना सांग कधी तरी जेवायलाच येतो घरी”
विवेकला बायको विषयी आदर वाटायला लागला.
विवेक “यार संजा, तू लाखातली गोष्ट सांगितली”
“बाबा संजय, चलो दक्षिणा निकालो, संजय का ध्यान और ज्ञान कभी गलत नही होता”
“तुला माहिती आहे विवेक आपण एकमेकाना दुःखी कुत्ता म्हणायचो.
जो तेरेपास वो मेरेपास नही है”
“ मेरे पास मा है’
“अरे चुप मध्येच विषय बदलला, चल मी निघतो.”
कस्तूरी जायते कस्मात, को हन्ति करिणाम शतं।
किम कुर्यात कातरो युध्दे मृगात सिंहः पलायते।।
विवेक घरी पुटपुटला, आणि विवेकला आठवल मुलाने संस्कृत विषय घेतला आहे. जरी ह्या श्लोकाचा अर्थ वेगळा असला तरी त्याचा संबन्ध विवेकने स्वतःशीच लावला. कस्तूरी मृगाच्या पोटात असते, म्हणजे आपल्याकडे काहीतरी आहे. शंभर हत्तीना कोण हरवू शकतो म्हणजे आपल सामर्थ्य काय? युद्धात भीतरे काय करतात, पळतात, नाही मी पाळणारा नाही. विवेक स्वतःशीच गुणाकर भागाकार करत होता, विवेकला आपली श्रीमंती कळाली. संजयच्या दुःखी कुत्राच्या आठवणी ने त्याला हसू आल, तो स्वतःशीच पुटपुटला
“ मनाची श्रीमंती , विचारांची श्रीमंती, माझी श्रीमंती, माझ्याच पाशी.”
