Sudhir Marathe

Classics

4.6  

Sudhir Marathe

Classics

लेक

लेक

3 mins
604


सगळीकडे काळाकूट अंधार होता,कुत्र्यांच् अधुन मधून भूंकण आणि रातकिड्यांचा आवाज या व्यतिरिक्त भयाण वाटत होत.काजवे लुकलुकुत घरावरुन जात होते.


सावित्रीच्या प्रसुतिवेदना वाढत होत्या.आबाच्या विनंतीमुळे बाजूच्या साळीकाकू घोंगडी अंगावर घेवून कंदीलाच्या उजेडात आबाला येताना दिसल्या.

आबाच्या काळजात धस झाल.” देवा पांडुरंगा हे काय योजलेस रे, परमेश्वरा!”आबा पुटपुटला आणि पुढे हरिनामाचा जप चालू केला.

कुईं कुईं आवाज जोरात ऐकू आला.हरीने रस्त्यावर भूंकणाऱ्या कुत्र्यांच्या कंबरडयात लाथ घातली. होती.”मेली अवेळी भूंकत असतात.”कुत्र केकट्टत दूर निघुन गेल, तसा आवाज हळू हळू मंद झाला.हरि हालत डुलत होता, हरिची स्वारी आकाशात चांदन्या शोधत होती.दरवाजावर येताच हरि आबाला बघून थांबला.


आबा ‘’ बायको इथे वेदनानी विव्हळत असताना तू… , जा ताईला बघ, घेवून ये.लवकर, निखारे टाक. पाणी गरम करत ठेवलाय.लेका बाप होणार आहेस.जाताना बघत चाल. आज आमवास.बघ रस्त्यावर कुठे काय टाकलय असत.!” हरी” पण आबा आज “, आबा “जा म्हणाल ना, देव बघतोय सगळ, पांडुरंगह्या रात्रि आता कुठे न्यायाच पोरीला, डॉक्टरभी कुठून आनयाचा!”


साळीकाकूनी दार उघडल. दरवाजाच्या करकर आवाजाने आबा दचकुन उठला, “आबा कापड आणि उन पाणी दे’ लुगड़ी कापड आणि उन झालेल पाणी, ती घरात घेवून गेली


“पोरगी सुखरूप असू दे देवा पांडुरंगा” सावित्रीची वेदना आबाला त्रास देत होती.आपल्या घरात नातवंड रांगणार, आंगाखाद्यावर खेळणार ,आबाच्या ईच्छा पूर्ण होणार ह्या विचाराने आबाने देवाचे नाव घेतले. सावित्रीच्या विव्हळन्याने आबा कासाविस् होत होता.

“हरि कुठे राहिला, कुठे रस्त्यावर पडला नाही ना.” आबाने कंदील उचलला, आणि रस्त्यावर जावून कंदीलवर धरून हाक दिली. कोणीतरी मदतीला याव म्हणून ,कुकारा मारला. हु हु हु..,जोरात लांबुन साद आली.”देवा परमेश्वरा धावून ये रे…” आबा पुटपुटला.


हरि लटपटत परत आला, “आबा काय झाल.”“अरे जा तू झोप तुला काय जमायाच नाय.सगळ गाव गवत मळणीत व्यस्त हाय.” “एकटी साळी कस निभावुन घेणार, कोण मदतीला नाय. एक लेक होती ती दुसऱ्या घरी निघुन केली. म्हातारीं असती तर कस घर भरल्यासारख असत, संसार सुखाचा झाला असता, अश्या वेळी निदान सुनेची काळजी घेतली असती लेक झाली तर साक्षात म्हातारीच आली तर भाग्य”


आबाच्या डोळ्यात पाणी आल, आबाने मांडवावावर उभ राहून गावाकडे पाहिले.मळयातुन मशाली चालताना दिसल्या, आबा मांडवावरुन उतरला, खळ सारवलेल बघून आबाला हायस वाटल,तुळशीच रोपट दिसल् , भिंति सारवलेल्या दिसल्या, हे सगळ कधी करून ठेवले, आपल्या येणाऱ्या बाळाची एवढी ओढ़. गोधड़या शिवुन ठेवल्या होत्या.आंगडि, टोपरी दोरिवर दिसत होती, एक छोटीशी टोपलीत काजळ पावडरचे डबे दिसले, सवित्रीला घरात मैत्रीण हवी होती, लेकीच्या स्वागताची तयारी सावित्रीने केली होती


“आबा आपल्या घरी पहिली बेटीच येणार, पहिली बेटी धनाची पेटी,”आबाला मध्येच सावित्रीची आठवण झाली. “सावित्री खुप आनंदी लेक आहे, “पोरी तुझी इच्छा पूर्ण होवू दे,” आबा पुट पुटला.

 

रात्र ओसरली होती, ताई आणि चार पाच बायका घरात आल्या,पुन्हा लगभग सुरु झाली , सवित्रीच् विव्हळन वाढल,आणि सावित्रीने जोरात एक जबरदस्त किंकाळी फोडली.सगळ स्तब्ध झाल, लहान मुलाच्या आवाजाने आबा आनंदित झाला.

साळीकाकू बाहेर आली “आबा लेक झाली, पण पोरीने खूप त्रास दिला बघ”“देव पावला.हे पांडुरंगा ! माझी सावित्री लेक कशी आहे,”आबाने न राहून विचारले “आबा बरी आहे, “साळी काकून स्मित हास्य केल.


सगळं गाव अंगणात जमा झाल होत, आबाच्या कुकारयाने गावाला निरोप मिळाला होता,आबाने सगळ्याच स्वागत केल.

आबा सवित्रीकडे वळला , “सावित्री देव पावला” 

सावित्री” होय आबा, आपल्या घरी लेक जन्माला आली, माझी लेक’


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics