अंजली (Anjali) बुटले (Butley)

Drama


5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Drama


खरच अस काही होत?

खरच अस काही होत?

2 mins 1.0K 2 mins 1.0K

अरे बाळ्या, जा बर मावशी कुठे गेली ते पाहुन ये, काकू बाळ्याला बाहेर पिटाळत होत्या... 

बाळ्याने बसल्या ठिकाणाहुनच आईला ओरडुन सांगीतले, हे काय इथेच तर आहे. शांतपणे पुस्तक वाचत बसली.... 

ये मावशी, आई तुला हाका मारतेय... जा काय म्हणते ती बघुन ये.


मावशीला बाळ्याची हाक, आपल्या बहिणीची हाक काही कानावर पडली नाही. ती आपल्याच नादात पुस्तक वाचत होती, शेजारी नविनच राहायला आलेल्या काकांकडुन तीने ते पुस्तक वाचायला आणले होते. खरंतर काकांनीच तीला आग्रहाने वाचायला दिले होते..लागलीच वाचुन परत करायची काही घाई नव्हती. मावशीला ते आवडल असेल वाचायला... ते वाचत असताना आजुबाजुला काय चालल ह्याकडे मुळीच लक्ष नव्हत... वाचताना मधुनच ती स्वतःशी गालात हसत होती, मधेच तीचा चेहरा धीर गंभीर व्हायचा, मधेच हसरा...

जेवायचीपण तीला आठवण होत नसे वाचत असताना...ताहान भुक विसरून वाचत असे.

वाचनात येवढं काय तल्लीन व्हायचे हे तीलाच ठाऊक.


काकूंची बडबड सुरू झाली होती..., ही पोरगीन माझ नाक कापणार, किती वेळा सांगीतल हिला त्यांच्याकडे जावु नको, ते एकटेच असता, उगाच कशाला झंझट वैगरे...

तुझेही लग्न झालेले नाही, लवकरच तुझेही लग्न ठरेल... गावाला नुसती उंडारत राहते म्हणुन आई-बाबांनी माझ्याकडे पाठवल तरी नीट राहायच सोडून इकडे तिकडे फिरत राहते.. नुसता माझ्या मनाला घोर... 


हे पण माझ्यावर चिडतात... नीट वळण लाव तीला, चार पुस्तक शिकली म्हणुन उगाच आपला तोरा दाखवु नको. कोणाची ओळख करून देतांना ही पहिले आपला वाचनाचा छंद आहे सांगते...

हे ही कधी कधी नको तेंव्हा तीच्याशी सलगी करत असतात..तीला बाळ्या सारखी पुस्तक विकत आणुन देतात. काही गरज आहे का? पण नाही. हे ही तीचे लाड करता बाळ्यासोबतच. ... तुम्हीच बोला म्हटलं तर ते त्यांना नको असतं... वाईटपणा घ्यायचा नसतो स्वतःला... बायको आहेच सर्वांची बोलणी खायला. माहेर काय सासर काय सगळ्यांची बोलणी मीच खायची.


आमच्या बहिणाबाईला कामात मला मदत करायची सोडुन शेजारच्यांकडे गप्पा मारायला जावुन बसायची सवयच झाली आहे आताशा.


काकु चिडल्या कि त्यांचा जिभेवरचा तोल जायचा... वाटेल ते बोलत राहायच्या.. वड्याच तेल वांग्यावर निघायच. कुठला विषय कुठे काहीच कळायच नाही.


त्या बायकांनाही काही कामधाम नाही... गप्पा मारता याच्या त्याच्या घरच्या उखाळ्या पाखाळ्या करत बसता... अॉफिसमधल्या साहेबाच्या बातम्या सर्व ह्यांच्याकडे असता. कोण कोणाकडे गेलं, किती वेळ होतं, काय बोलले... काही न काही काम काढत त्यांच्याकडे जायचे व कोण काय बोलता ते एकायचे व कानात साठवायचे... मग कानगोष्टी करत तिखट मिठ मसाला लावुन आजची ताजा खबर... ह्यांच बि बि सी चॅनल सुरू २४ तास...घरात काम करायला २४ तास घरकाम करायला गडीमाणस आहेत.. त्यामुळे रीकामा वेळच वेळ ह्यांच्याकडे.


बाळ्यालापण आता आईच्या बडबडीची सवय झाली होती, मावशी आल्यापासुन आई उगाच अशी बडबड करत असते अस तोही मानायला लागला.


बाळ्या मावशी घरी आल्यापासुन खुश होता. मावशी त्याचा अभ्यास घ्यायची, त्याच्या सोबत खेळायची, झाडावरच्या चिंचा, आंबे तोडायला मदत करायची. मावशीमुळे कॉलनीतल्या मित्रांमध्ये खेळतांना त्याला एक प्रकारचा मान मिळायचा... त्याची ती मैत्रिणच होती म्हणाण...सुट्टीच्या दिवशीतर ते खूप धुमाकुळ घालायचे, खूप मस्ती चालायची दोघांची. भांडण झालीतरी थोड्यावेळेसाठीच, नंतर परत एकत्र व्हायचे.. त्यांच भांडण सोडवायला कोणी येणार नाही, आपल आपल्यालाच सोडवायच हे दोघांनाही पक्क माहीत होत.


नविन राहायला आलेल्या काकांकडे मावशी गप्पामारायला गेली की आई आपल्याला का सारखी तीच्या मागे हेरगीरी करायला पाठवते हे त्याला काही कळत नव्हते त्यावेळी...वयपण नव्हतं ते सगळ समजायच.


मावशी मात्र खूप खुश असायची त्यांच्याशी गप्पा मारतांना, वेगवेळ्या विषयांवर गप्पा मारायचे ते, त्यांच्याकडचे पुस्तके वाचायला द्यायचे... बाळ्यापण मावशीबरोबर काही पुस्तक वाचायचा... वाचनाची त्यालाही आवड लागली होती...


काकांच नाव अशोक कुलकर्णी होतं. ते एम् पी एस् सी परिक्षा देवुन तहसिलदार म्हणुन आले होते. त्यांना वाचनाची आवड होती. त्यामुळे त्यांच्याकडे खूप पुस्तक होती वेगवेगळ्या विषयांची. वेळ मिळेल तसा ते त्यांच्याकडे आलेल्या तरूण मुला मुलींना, ज्यांना इच्छा होती एम् पी एस् सी, यु पी एस् सी परीक्षेसाठी त्यांना मार्गदर्शन करत असे.


मावशीलापण ह्या परीक्षा द्यायची इच्छा होती. पण तसे मार्गदर्शन करणार कोणी नव्हतं.. घरच्यांकडुन पाठिंबा नव्हता म्हणान हवे तर... सर्वसामान्यांसारखचं दहावी झाली की लग्न... मुलगी म्हणजे जोखीमच... तीला सांभाळन म्हणजे महाकठीण ह्या समाजात. पराया धन...मुलांशी बोलायला मज्जाव ..वैगरे


मावशी बरोबर बाळ्यापण स्वताः जायला लागला काकांकडे... हेरगीरी करायला नाहीतर त्याच्या आवडीची पुस्तकं निवडुन वाचायला आणायला. काकांकडच्या पुस्तक खजिनातं त्याला वाचण्यासारखीपण पुस्तक होती गोष्टींची. त्यांनी पुस्तकपण नीट नीटके , विषय वर्गवारी करून काचेच्या कपाटात लावलेली होती. नुसतं त्या पुस्तकांकडे पाहिले तरी खुप आनंद वाटेल असे रंगीबेरंगी पुस्तक समोर दिसायची... कपाटा समोर बसायला खुर्ची ठेवलेली... खुर्चीवर बसुन पुस्तक हातात घेऊन चाळत बसायच पहिले..


पण काकूंना हे आवडायचे नाही, तीच्या मनात वेगळेच विचार, काकून आजकाल मावशी बरोबरच बाळ्यालाही रागवायच्या... काकुंनीच मावशीला नविन आलेल्या काकांकडे ओळख करून द्यायला घेऊन गेली होती... पहिली ओळख काकुंमुळेच झाली होती. मावशीने पुस्तक वाचनाचा आपला छंद काकांना सांगितल्यावर काकांनी मावशीला त्यांच कपाट पुस्तक भरलेल दाख़वल. मग हळुहळु मावशी काकांकडन पुस्तक वाचायला आणायला लागली... मग काकांना वेळ असेल तर ते काय वाचले, पुस्तकातल्या विषयाबद्दल, लेखकाबद्दल मावशीला विचारायचे व नंतर वाचण्यासाठी नविन पुस्तक सुचवायचे. त्यातली काही पुस्तक त्यांच्याकडे असायची तर काही नसायची.. मावशी काकांकडचेच पुस्तक वाचायची... दुसरी पुस्तक आणणार कुठुन... ती तीच्या डायरीत पुस्तक़ांची नाव लिहुन ठेवायची... म्हणजे विसरायला नको. विकत आणताना कोणत पुस्तक आणायच पहिले तेही लिहुन ठेवायची. मावशीच काम एकदम टिप टॉप असायचं. प्रत्येक गोष्ट नीट नेटकी ठेवायची...


काकूंच्या मनाचा घोर त्यांनाच सतावत होता... काय करणार, त्यांनाही कोणाला सांगावे आपल्या मनातली घालमेल हे कळत नसे.


तस तर त्यानाही पुस्तक वाचनाची आवड होती, शाळेतल्या ग्रंथालयातुन पुस्तक आणुन त्याही वाचायच्या. शाळेच्या अभ्यासाच्या पुस्तकात गोष्टीच पुस्तक लपवुन वाचायच्या... पण काळाच्या ओघात त्यांचा हा छंद कुठल्या गावाला गेला होता कोणास ठाऊक... लग्नपण लवकरच झालं, १०वी नंतर शिकायची इच्छा असुन शिकता आल नव्हत.. नाही म्हटले तरी त्याची खंत त्यांच्या मनात होतीच. मावशी पुस्तक वाचत बसली की त्यांना छानपण वाटायच, तर कधी कधी रागही यायचा...


आता मावशी व बाळ्यापण काकूंच्या ह्या वागण्याने त्रस्त झाले होते...


जरा धीर एकवटुन बाळ्या व मावशीने काकूंना काय त्रास होतो तीला हे विचारयचे ठरवले व विचारले... काकू पहिले सांगायला तयार नव्हत्या, तस सरळ सरळ काही सांगीतल ही नाही, पण त्यांच्या बडबडीतुन मावशी व बाळ्याला काही जाणवल ...काकूंना वाटत होत शेजारचे एकटेच राहत असलेले काका मावशीशी प्रेम संबध जोडतील. सिनेमात दाखवता तसं...


मावशीला कुलकर्णी काकांच मार्गदर्शन मिळाल होतं यामुळे तीने लग्न आता नाही करणार म्हणुन सांगितल.. पदवी परीक्षा व त्याच सोबत एम् पी एस् सी ची परिक्षा अभ्यास करायच तीने ठरवल...


प्रश्न पडला हे कुठे करायच... गावालातर शक्य नाही... काकूंकडे राहुन करायच आपल शिक्षण तर ते तीला मान्य असायला पाहीजे...

घरी आई बाबा तीच्या पुढच्या शिक्षणाला तयार नव्हते, वेळ व पैसा खर्च होईल... परत शिकलेलाच मुलगा लग्नासाठी शोधायला लागेल...

मग काकूंनीच पुढाकार घेतला बाळ्याच्या बाबांशी बोलुन व मावशीला आपल्याकडे शिक्षणासाठी ठेऊन घेतलं... त्याच बरोबर तीच्या काही अटीपण आल्याच... त्या सर्वांच्या भल्यासाठीच होत्या.

मावशी आपल्या शिक्षण अभ्यासाबरोबरच काकूंना घरकामात मदत करायची... तीला काकूंवर भार बनुन तीच्या घरी नव्हत राहायच.


कुलकर्णी काकांची काही दिवसात बदली झाली होती. पण जवळच्या गावाला. जातांना त्यांनी त्यांच्याकडची काही पुस्तके मावशीला भेट म्हणुन दिली. मावशीनेपण त्यांच्याकडे नसलेल एक पुस्तक काकुंना सांगुन बाळ्याच्या बाबांना आणायला सांगितले व कुलकर्णी काकांना भेट दिलं.. ते त्यांनाही खूप आवडल. त्यांनी त्याबद्दल मावशीचे आभारही मानले.

बदली झाल्यामुळे आता आपल्याला भेटायला नाही मिळणार हे दोघांच्या नजरेत दिसलं... तो क्षण काकूंच्या नजरेतुन सुटला नाही. क्षणभर शंकेची पाल चुक चुकली पण त्यावर त्या काही बोलल्याही नाही व आलेली शंका पटकन मनातुन झटकली. एक स्मितहास्य दिल व एकाच वेळी आलेले मिश्र भाव त्यांच्या चेहर्यावर उमटले. काकूंनी कुलकर्णी काकांना इकडे आले की आमच्याकडे चहापाणी, जेवायला येत जा म्हणुन सांगितले. कुलकर्णी काकांना पण आपुलकीच विचारपुस करणार कोणी हवे असे वाटतच होत.. त्यामुळे त्यांनी काकूंच्या आमंत्रणाचा स्विकार केला... इकडे मिटिंग व काही कामासाठी आलो की येत जाईल असे म्हणुन निरोप घेतला.


काकुंना आता मावशीला कोण मार्गदर्शन करेल हा प्रश्न सतवायला लागला...पण तो त्यांनी कोणाशी बोलुन नाही दाखवला. मावशीला त्या फक्त अभ्यास करत जा... वेळापत्रकच तयार करून दिलं... चाहा करून देत असे, थोड्यावेळ मावशीला कंटाळा येऊ नये म्हणुन तीच्या सोबत गप्पापण मारायच्या. त्यांच ध्येय एकच मावशीचा अभ्यास, तीला पदवीपर्यंत शिकवायच, एम् पी एस् सी परीक्षेसाठी मदत करायची. त्याच बरोबर मावशीच काही लफड वैगरे होऊ नये म्हणुन सतत काळजी करत राहायच... मावशी गावाहुन आलेली, साधीभोळी कुणाची वाईट नजर तीच्यावर पडु नये.


कुलकर्णी काका मिटिंगला आले कि वेळात वेळ काढुन काकूंकडे यायचे. मग जेवण सोबतच व्हायच... मावशी व कुलकर्णी काका नविन काय वाचलं, अभ्यास, कॉलेज वैगरे विषयांवर बोलायचे.. दोघांची आवड बरीच जुळायची. गप्पा मारता मारताच मावशीला मार्गदर्शन करून व्हायच. बाळ्यापण कधी कधी त्यांच्या गप्पांमधे सामिल व्हायचा. तोही आपल्या शंका विचारायचा. वेळ मजेत जायचा सर्वांचा.

पुढच्यावेळेस कधी येणार, कोणत पुस्तक वाचुन ठेवायच, कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा हे सांगुन जात असे...


कधी मिटिंग वेळेवर रद्द झाली, नाही येणार असेल तर बाळ्याच्या बाबांना फोन करून सांगायचे.


काकांकडन मिळालेल्या मार्गदर्शनाचा मावशी योग्य वेळी उपयोग करायची... कॉलेजच्या परीक्षेत तीला चांगल यशपण मिळायला लागले...पदवी परीक्षापण चांगल्या मार्कांनी पास झाली... कुलकर्णी काकांचे मार्गदर्शन घेऊन तीने एम् पी एस् सी ची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात लेखी परीक्षेत यश मिळाल...

तोंडी परीक्षेसाठी सराव करावा लागणार होता ... तो कसा करायचा?


ह्या मधल्या काळात कुलकर्णी काकांच लग्नही झाल होत.. त्यांची बायकोपण मावशीला भेटायला यायची कुलकर्णी काकांसोबत... त्यांच्याशीपण मावशीची गट्टी जमली होतीच. तीच पदवी पर्यंतच शिक्षण झाल होत, यु पी एस् सी ची तयारी करत होती, लग्न झाल्यामुळे थोडा व्यत्यय आला होता. मावशीमुळे त्यांनाही परीक्षा तयारी करायला सोबतीण मिळणार होती. दोघींनापण एकमेकींची सोबत होणार होती.


तोंडी परीक्षेचा सराव मी तुझ्याकडंन करून घेत जाईल अस मावशीला सांगितल, तुझ्याबरोबरच माझाही होईल अभ्यास, सराव... मावशीलापण बरं वाटलं पण ते प्रत्यक्षात कस आणायचं? दोन वेग वेगळ्या गावात राहणार, रोज भेट होणार नाही, मग त्या दोघींच ठरलं व्हाटस्अप कॉल, व्हीडीओ कॉल करायचा व आपला सराव करायचा.


मग त्या व्हाटस्अपचा वापर करत परीक्षेची तयारी करायच्या...

मावशी तोंडी परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झाली. ती त्याच श्रेय कुलकर्णी काका काकूंना देते.


एम् पी एस् सी झालेली ती त्यांच्या गावातली पहीलीच मुलगी. मुला-मुलींमधे ही पहिलीच, त्यामुळे मावशीची कॉलर एकदम टाईट असायची... काकू तर खूप खुश होत्या, त्यांच्या घरी राहुन शिक्षण व एम् पी एस् ची परीक्षा यश मावशीने मिळवलं होत...


बाळा व मावशी आता कधी एकत्र आलेतर, काकूंच्या तेंव्हाच्या वागण्याची आठवण झाल्यास खूप हसतात , व काकूंनाच चिडवतात.

खरंच अस काही होतं का? नाक कापल गेल का?


काकूही वैतागतात व आपल्या मनाने शंकेन घर केल होत हे समजुन सांगतात. कमळी, आपली कामवाली सांगत, मावशी त्या नविन आलेल्या सायबा बरोबर नुसत पुस्तक हातात धरून गप्पा मारते हसत असते, ते सायबी नुसते हसतानाच आवाज येतो. दोन-तीन वेळा म्या हसताहाना, जवळ जवळ हातात हात घेतलेल स्वतःच्या डोल्यान पाहल. कमळीच्या सांगण्याने माझ्या मनातपण शंकेन घर केल.


मावशीने सांगितले, अग माझ पहिलं प्रेम हे वाचनावर होत तेंव्हा, कोण माझ्याशी कस वागत, कस बघतं ही अक्कल थोडी होती मला...


सांगन आता नाक उंचावल म्हणून!!! मग एकच हसण्याचा आवाज, एक मेकांच्या हातावर टाळी देत..विचारणा. खरच अस काही होत का?


Rate this content
Log in

More marathi story from अंजली (Anjali) बुटले (Butley)

Similar marathi story from Drama