खंबीर ती भाग -५
खंबीर ती भाग -५
प्रेरणाच्या दहावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी बिपीन आणि त्याच्या मित्रांचे एका मुलाशी कडाक्याचे भांडण झाले आणि ते भांडण इतके वाढले की एकमेकांच्या जिवावर ते उठले.. बिपिन ने त्या मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकला.आणि तो मुलगा भयंकर जखमी झाला.तो मुलगा एका नगरसेवकाचा मुलगा होता.बिपीन आणि त्याच्या मित्रांवर केस झाली त्यांना जेलमध्ये टाकले...बिपीनच्या एका मित्राने ही बातमी त्याच्या घरी कळवली.तेव्हा बिपीन चे वडील घाईघाईने निघाले.. रस्त्यावर चालतांना एका भरघाव येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली.आणि ते जागेवरच बेशुद्ध पडले..
प्रेरणा ला आपला पेपर सोडुन आधी वडिलांना दवाखान्यात टाकावे लागले.मदतीला कुणीही नाही.आई बोलु शकत नाही.म्हणुन प्रेरणालाच सर्व पहावे लागले..मन मोठं करुन तिने आपली परीक्षा देणे टाळले.आणि खंबीर पणे आईवडिलांच्या पाठीशी उभी राहिली.त्यांना धीर दिला.त्यांना सांभाळले..भाऊ जेल मधुन सुटुन येईल. आणि आईवडिलांसाठी तो काही करेल.याची तिने अपेक्षाच सोडुन दिली होती.
अपघातामुळे वडिलांचा एक पाय पुर्ण गेला होता.ते काहीच करु शकत नव्हते.प्रेरणाने एका कंपनीत काम शोधले.शिक्षण थोडे दिवस बाजुला ठेवावे लागेल हे एव्हाना तिला समजले होते.म्हणुन काम करुन घर कसं चालवता येईल या गोष्टी ला तिने प्राधान्य दिले..
(क्रमशः)
फोटो साभार गुगल
