STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

खंबीर ती (भाग-२)

खंबीर ती (भाग-२)

2 mins
175

मुलाने बिपीन ने चांगले शिक्षण घेऊन नौकरी ला लागावे असे दोघांनीही वाटत होते.त्यासाठी दोघं नवरा बायको काटकसर करून थोडे थोडे पैसे ही जमा करत होते.प्रेरणा आणि बिपीन दोघांनीही चांगल्या शाळेत शिकायला टाकले होते..

बिपीन ला ट्युशन ही लावले होते.कारण तो अभ्यासात थोडा कच्चा होता. त्याचे डोके चालत नसे.खरं तर त्याचे अभ्यासात मनच लागत नसे.

चौथीच्या वर्गात असतांनाच तो नापास झाला होता.

त्यामुळे नातेवाईक आणि शेजारी पाजारी कधी कधी बोलत ही असत "या मुलाचे काही खरे नाही.. बिचाऱ्या गरीब आईबापाचे कष्टाचे पैसे वाया घालवेल हा फक्त.."


आईवडिलांना तर काही कळत नसे.कोण काय बोलतोय ते पण प्रेरणा सर्व ऐकायची.

बिपिन भविष्यात काही करेल की, नाही याची काही शाश्वती दिसत नव्हती. कारण शेवटी म्हणतात ना "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात." पण याऊलट प्रेरणा ही अतिशय हुशार होती. अभ्यासात ही आणि इतर गोष्टतही..एक कमालीची उत्सुकता होती तिच्यात कुठलीही गोष्ट शिकण्याची, जाणुन घेण्याची, समजुन घेण्याची तिला नेहमीच घाई असायची..

कमालीचा आत्मविश्वास दिसायचा तिच्यात जो तिच्या वयाच्या इतर मुलांमध्ये तेवढा नसेलच..

दुसरीच्या वर्गात असुनही फाडफाड वाचन तर करायचीच पण पाढेही सर्व तोंडपाठ. तिला कधीच कुठली ट्युशन लावायची गरजच पडली नाही..


शाळेत क्रिडा स्पर्धा असो, चित्रकला स्पर्धा असो, निबंध लेखन असो प्रत्येक गोष्टीत प्रेरणा अव्वल असायची.पण तिचे वकृत्व सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे.

तिच्या वयाच्या मानाने तिचे वकृत्व वाखाणण्याजोगे होते. वकृत्व स्पर्धेत तिचा पहिला नंबर हा ठरलेला असायचा.. शाळेत प्रेरणा सर्व शिक्षकांची आवडती विद्यार्थी होती.. दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱी प्रेरणा वयाच्या मानाने जास्तच समजुतदार ही होती..


कधी कुणीही आईवडिलांना काही बोलले आणि तीने ते ऐकले तर ती सरळ सरळ बोलुन टाकत असे "माझ्या मम्मी पप्पा ला काही ऐकु येत नाही.तर तुम्ही काहीही बोलणार का? पण मला सर्व ऐकायला येते आणि बोलताही येते.म्हणुन त्यांना काही बोलण्याच्या आधी विचार करा..मी परत तुम्हाला उलट उत्तर देऊ शकते.हे लक्षात ठेवा.."

एवढीशी प्रेरणा एक बडबडी आणि गोंडस मुलगी आहे असे समजून तिच्या बोलण्याकडे हसुन सर्वेच दुर्लक्ष करत असत..

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational