Akshata alias shubhada Tirodakar

Drama

2  

Akshata alias shubhada Tirodakar

Drama

कॅफे

कॅफे

3 mins
2.8K


तो नेहमी यायचा एकटाच आणि काॅफी पिऊन निघुन जायचा हे चित्र श्रेया नेहमी पाहे.


श्रेयाचा स्वतःचा कॅफे होता. त्यामुळे प्रत्येकावर तिची बारीक नजर असायची. आज पण तिची नजर त्याला शोधत होती, पण तो काही आला नाही. नेहमी त्याच वेळेवर येणारा आज का आला नाही, हा प्रश्न तिच्या डोक्यात घोळत होता.


दुसऱ्या दिवशीही तो आला नाही न राहवून तिने वेटरला विचारलं, "तो माणूस काल आणि आजपण नाही आला. तुला माहीत आहे का त्यांच्याबद्दल..."


"मॅडम कोण माणूस?"


"अरे असं काय करतोस तो नाही का, नेहमी एकटाच गिटार घेऊन येतो... तूच तर त्याला काॅफी देतोस..."


"कोण मॅडम?"


"अरे तुझं लक्ष कुठे असतं?"


"काय रे काय झालं..."


"काही नाही रे मॅडम कुठल्या माणसाविषयी विचारत आहे, ज्या माणसाला मी पाहिले सुद्धा नाही..."


"काय..."


"हो..."


असेच दिवस गेले त्या माणसाचं येणं बंद झालं. एके दिवशी श्रेयाचा मित्र सुमित तिला भेटण्यासाठी आला. तिला असं टेन्स पाहून त्यानं विचारलं, "काय झालं एवढी टेन्स का आहे तू..."


"काही नाही रे..."


"काही प्रॉब्लेम आहे का... मग मला नेहमीप्रमाणे हाय हॅलो केलं नाही तू..."


"अरे काही नाही, कॅफेमध्ये नेहमी एक माणूस यायचा एकटाच गिटार घेऊन... कोणाशीही न बोलता काॅफी पिऊन निघून जायचा, पण जाताना मात्र मला एक सुंदर स्माईल द्यायचा... पण गेले आठ दिवस तो आलाच नाही. वेटरना विचारलं तर त्यांना काही माहित नाही..."


"अगं पण तू का एवढी पॅनीक होतेस... गेला असेल तो कुठेतरी, तू त्याच्या प्रेमात वगैरे पडली नाहीस ना?"


"छे रे पण त्याच्या स्माईलमध्ये जादू होती..."


"हो का पण आता काय करणार तू, स्माईलवाला आता येत नाही..."


"तेच ना त्याला काही झालं तर नसेल ना..."


"अगं पण ना नाव ना पत्ता कसं शोधणार त्याला तू..."


"हो रे तोच तर प्रॉब्लेम आहे. पण तुला असा माणूस दिसला तर सांग मला... गिटार पाठीवर लटकवणारा मध्यम आकाराचे केस, गोरा, जॅकेट घालणारा..."


"अगं हो पण यावरून नाही शोधू शकत त्याला, आणखी तू एवढी टेन्स का होतेस फर्गेट इट यार... असे कित्येक लोक येतात आणि जातात..."


"नाही रे पण तो खरा माणूस वाटला..."


"चल मी निघतो बाय ..."


सुमीत काही दिवसांनी परत भेटायला येतो. आल्या आल्या काॅफी आर्डर करतो. मात्र आज त्याला श्रेया कुठे दिसली नाही तो इतरांना विचारतो तर ती बाहेर गेली आहे असे त्याला कळते.


श्रेया ट्रॅफिकमध्ये असताना तो माणूस तिला दिसतो. श्रेयाला पाहून तो माणूस नजर फिरवतो.


"ओ Mr. हल्ली कॅफेमध्ये आलाच नाही... नेहमी येणं असतं तुमचं? हॅलो मी तुमच्याशी बोलतेय..."


"माझ्याशी हो... यायचो मी तुमच्या कॅफेत आता येत नाही त्यात... काय माझी उधारी नाही आहे..."


"तसं नव्हे नेहमी येणारे ना तुम्ही म्हणून विचारलं... काय आहे ना मी माझ्या कॅफेमध्ये येणाऱ्यांना फक्त कस्टमर म्हूणन नाही तर एक माणुसकी म्हणून प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करते तशी तुमचीही केली..."


"हा हा..."


"मी श्रेया आणि तुमचं नाव..."


"कशाला हवंय तुला..."


"तुम्ही गिटार वाजवता... कुठल्या म्युझिकल बँडमध्ये काम करता... माझ्या कॅफेमध्ये पण मी म्युझिकल प्रोग्रॅम सुरु करण्याचा प्लॅन करतेय..."


"अहो मॅडम पुरे... मी कुठल्याही बँडमध्ये नाही आहे... कळलं का... उगीच हजार प्रश्न करू नका..."


"अहो मिस्टर रागावता कशाला... जर तुम्ही आमच्या कॅफेमध्ये प्रोग्राम सुरु केला तर मी जस्ट विचारते तुम्हाला... तुमची सॅलरी पण तुम्हाला देईन बघा विचार करून..."


"मॅडम पुरे हा उग्गीच डोक्यात जाऊ नका..."


"अरे ही काय भाषा आहे?"


"मग उगीच कशाला माझ्या डोक्यात जाता मी काही गिटार वाजवणारा नाही, मी एक शार्प शूटर आहे कळलं का?"


"काय?"


"हो आणि मी तुमच्या कॅफेमध्ये फक्त माझा एक प्लॅन करायला यायचो... सो माझ्यापासून जरा जपून राहा..."


"पण हे गिटार..."


"ते दाखवण्यासाठी..."


"पण तुम्ही हे कशासाठी करता... कोण पहिले तर विश्वास नाही देऊ शकत एवढे चांगले माणूस दिसता..."


"पैशासाठी आणि हो तुम्ही कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हीच फसाल कारण तुमच्याकडे पुरावा नाही आहे आणि तुमच्या कॅफेमधील वेटरना मी धमकी दिलेली मला न पाहिल्याबद्ल सांगण्याची..."


एवढ्यात हिरवा सिग्नल पडतो आणि तो बाईक फास्ट करून नाहीसा होतो.


एवढा हसरा चेहऱ्याचा साधा माणूस शार्प शूटर... ती कॅफेमध्ये परतते तर सुमीत तिथे असतो...


"काय कुठे गेली होतीस गिटारवाल्याला शोधायला?"


"नाव घेऊ नकोस त्याचं..."


"का?"


"काय झालं मॅडम तूच तर काळजी करत होतीस तो येत नाही म्हणून..."


"आता तर मी त्याला कॅफेमध्ये घेणार नाही... गिटार कुठला तो एक शार्प शूटर निघाला... हसऱ्या चेहऱ्यावर गूढ रहस्य लपवणारा..."


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama