केली पण प्रीती - भाग ९
केली पण प्रीती - भाग ९
कथा पुढे. . .
भाग (९)
दोन दिवसांनंतर शरयुचा कॉल आला . मी मिटिंगमधे होतो. शेवटचे नंबर पाहुन कळाले तिचा फोन आहे. मी पेंसिलने तो नंबर एका फाईल च्या मागे लिहुन ठेवला.
फ्री झाल्यावर बाहेर बाल्कनीत गेलो आणि तिला फोन लावला. तिनेही उचलला!
"बोल शरयु कशी आहेस ?!!" मी विश्वासाने बोललो.
"वॉव श्रीधर !! तुम्ही कॉल बैक केला , ग्रेट ! कसे आहात ? फॅमिली कशी आहे.?"
" मी मजेत . तू बोल फ्री आहेस ना, बोलू शकतेस. ? "
"अहो असं काय ? बोलू शकते. मी आत्ताच ऑफिसातून आले. पार्ट टाइम जॉब करते ना. 4 वाजेनंतर वेळच वेळ असतो मला."
"हो का ,म्हणजे घरी तर काही प्रॉब्लेम नाही न मी बोललोतर?" मी दबकतच विचारले.
"अहो काहितरिच काय .?
मुलं शाळा -कॉलेजात आणि मिस्टर अॉफिसमधे. आणि ते असले तरीही कधीच विचारत नाहित कि कुणाचा फोन आहे वगैरे. अाणि फोन तर कधीच बघत नाहित माझा. तुमच्या मालूसारखा! " ती हसली.
मी मोठ्यांदा हसलो.
"अग काय हे तू माझी टिंगल करतेस काय? पण छानच. कमाल आहे तुझ्या मिस्टरांची.! "
"कमाल काय त्यात . विश्वासाची गोष्ट आहे श्रीधर. लग्नासारखी नाती केवळ विश्वासावरच टिकतात . नाही का?"
" अगदी बरोबर. आणि तुझा स्वभावही तसा शांत , कुटुंबवत्सल . छान म्हणजे तू मजेत आहेस, हो ना?? . मला इतकच माहित करायचं होतं. " मला रिलॅक्स वाटलं.
" श्रीधर मी खरच तृप्त आहे संसारात. आणि मला काहिच कमी नाही. फक्त तुमच्याशी एकदा केव्हातरी निवांत भेटून बोलायचय . इतकच ." किती गोड आवाज तिचा.
"छान !! पण काय गं भेटून काय बोलायचंय?? मला टेंशन आलं एकदम!"
"अरे यार काय हे? टेंशन घेउ नकात. तुमचं टेंशन म्हणजे . . . हा हा हा!! सहज बोलायचय , एकदा भेटायचं आहे. इतकच. "
"ओके नो टेंशन. ए शरयु तुला माझा नंबर कुठुन मिळाला गं ?"
"मावशींकडून.!! म्हणजे तुमच्या आत्या कडून.
एकदा मुलांसोबत फिरायला गेलो होतो पुण्याला .
तेव्हा भेटून आले त्याना . माझ्या मुलांना पाहण्याची इच्छा होती त्यांची, शिवाय माझ्या मुलांना माझी खोली दाखवायची होती. . त्यांनी लॅण्ड लाईन नंबर दिला. तरीही ३ महिने विचार करून मी तुम्हाला पहिला फोन केला होता. "
" हो का ? पण केवढा गोंधळ झाला तुझ्या पहिल्या फोनचा.! पण तू डेअरिंग केलीस अन शोधलस मला. ." य़ावेळी तिचा चेहरा दिसला असता तर किती बरं झालं असतं असं वाटलं.
असंच आम्ही बोलत राहिलो. जनरल.
इंदोरचं वातावरण, तिचा माझा परिवार' तिकडचे सणवार , मुलांची शिक्षणं , इत्यादि.
जवळ जवळ २०-२५ मिनिटं. ती किती फ्री बोलत होती. माझंही दडपण गेलं . मस्त वाटलं , हलकं वाटलं !!
कमाल ही कि जुन्या गोष्टी तिनेही काढल्या नाहित अन् मी पण नाही.
" ओके शरयु , यानंतर तू फोन करू नकोस , मी करत जाईन फ्री असेल तेव्हा. तू बोलत जा नाहितर कट कर जर बिझि असशील तर." असं सांगुन मी फोन ठेवला.
तिचा नंबर सेव्ह केला "मार्केटिंग मॅनेजर सुजित २ " या नावाने अन रिलॅक्स झालो. कसलं दिव्य केलं असं वाटलं मला.
हो , वॉट्स अप होतं त्या नंबरला, पण योगायोगाने डिपी मात्र निसर्ग चित्र होतं.. छान!.
* * * * *
महिन्यातून एकदा वगैरे मी तिच्याशी बोलायला लागलो.
चाटिंग मी करत नाही. ते टाईप करणे मला अावडत नाही. आणि रिस्कही नको असं वाटलं.
कॉल डिलीट करायला तेवढं शिकलो.
नेमीप्रमाणे एकदा ती सहज म्हणाली कि तिला मला भेटायचय, माझा प्रॉब्लेम मी सांगितला होता. ती खूप समजुतदार अाहे. .तेव्हा ती इतकी फ्री नव्हती पण आता खूप बोल्ड झालिय.
एम पी मधे असल्याने असेल कदाचित पण ती अस्खलित हिंदी बोलत होती , ते पण शुद्ध.
मला हिंदी बोलायला एेकायला आवडतं.
हिंदी सिनेमा व गाणी म्हणजे जीव कि प्राण.!
पण तिच्याशी बोलताना कळत होतं कि मी किती अशुद्ध हिंदी बोलत होतो.
माझं जीवन आता खूप मजेत चाललेय.
जुन्या मित्र मैत्रिणिंचे संपर्क काढतोय.
नंबर सेव्ह करतोय.
कधी कधी त्यांच्याशी बोलतो , कधी कधी शरयुशी बोलतो.
कधी फेबुकवर फोटो पाहतो.
कधी ती फोटो पाठवते , तिचे किंवा फॅमिलीचे. मी पाहतो आणि डिलिट करतो. थोडा स्मार्ट झालोय असं वाटतंय.
तिच्याशी अफेअर ठेवावं किंवा सतत संपर्कात रहावं असं काहिही माझ्या मनात नाही. ह्याची गरजही नाही , आणि हे तर मी तेव्हाहि करू शकलो असतो.
माझ्यावर जिवापाड प्रेम करणार्या मुलीला मी नकळत दुखावलय ही भावना होती इतकच.!
तिला एकदा भेटण्याची ओढ आहे आणि भेटून सॉरी म्हणण्याची इच्छा आहे मनात कुठेतरी. ती खुश आहे हे बघावं अन समाधानाने रहावं इतकंच.!
थोडक्यात काय तर मी गोष्टीमॅनेज करायला शिकलो आणि आनंदी रहायला लागलो.
शेवटी काय स्वतःचा पर्सनल आनंदही महत्वाचा!!
मी काही कुणाला धोका देत नव्हतो कि फसवत नव्हतो.
इतक्या वर्षांनी स्वतःचा मानसिक आनंद शोधत होतो.
शरयुशी मैत्री करणं तशी सुखावह भावना अाहे.
त्यावेळचं माझं सहज बोलणं , वागणं आणि बिनधास्तपणा तिने तिच्याप्रति आकर्षण समजुन घेतलं.
तसं पाहिलं तर जेन्युईनली मी स्वतःच कनफ्युजड् आहे.
तिच्यामधे खरंच काहितरी होतं जे मला तिच्याकडे खेचायचं. काहितरी मला ओढायचं किंवा कदाचित तिच्या प्रेमाची ओेढ एवढी तीव्र होती कि ती स्पंदने माझ्यापर्यंत यायची.
ते तसं अनाकलनीय आणि शब्दात न मांडता न येण्यासारखं होतं!!
मी तेव्हा फ्लर्ट असेन पण चरित्रहीन नव्हतो!!
एकदा तिला भेटून प्रेमाबद्दल थँक्यू आणि नकाराबद्दल सॉरी म्हणावं अशी सूप्त इच्छा मनात आहे.
* * * * *
तिचा पहिला फोन येवून गेला त्याला आता ३-४ वर्ष झाली. १- २ महिन्यात कधीतरी बोलणं होतं. मग उगीच इकडचं तिकडंचं कधी जुनं काही !!!
खूप छान वाटायचं तिचं बोलणं! आता तीहि कंफर्टेबल झाली होती आणि मी ही.
क्रमशः