केली पण प्रीती - भाग ५
केली पण प्रीती - भाग ५
केली पण प्रीती (भाग ५)
शरय़ुचं निघुन जाणं बरोबरच होतं, कारण आता 'काय' हक्काने ती माझ्या गाडीवर बसणार होती.
मला अाजही आठवतं कि ती संध्याकाळ माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट संध्याकाळ होती.
मी रविकडे गेलो होतो( माझा मावसभाऊ). तो घरी नव्हता .
तिथुन निघालो .
खूप डिस्टर्ब होतो.
कुठल्याशा सिनेमाला गेलो, एकटाच.
तिथेही हिरोइन मधे शरयुचा चेहरा दिसला . अर्ध्यातून उठुन आलो.
एका सहकार्यांच्या घरी कसलीशी पार्टी होती .
येत नाही म्हणालो होतो, पण रात्री ९ वाजता तिथे गेलो.
सर्वा ओली पार्टी सुरु झाली होती.
कॉलेजच्या फायनल ईयर नंतर त्यादिवशी २ बिअर प्यालो .
उशीरापर्यंत तिथेच रमलो .
मी काही बोलणार नाही याची दक्षता घेतली.
घरी आलो अन् झोपलो.
सकाळी उशीरा उठलो. ऑफिसला सुट्टी टाकली.
शरयुने मौन व्रत घेतलं होतं जणु पण रिमाने मला चांगलच झापलं होतं .
माझ्या वागण्यावरून आणि भेटीतल्या शेवटच्या वर्तणुकीबद्दल !
मला अाजही आठवतं, मी तिला म्हणालो होतो," मी जे वागलो- समोरच्याने ते अॅक्सेप्ट केलं ! मग तुला, थर्ड पर्सनला , काय प्रॉब्लेम आहे?"
तिने किती वेळ वाद घातला होता माझ्याशी ,जणु मी तिलाच हर्ट केलंय!!
भन्नाट होती रिमा आणि त्या दोघींची मैत्री .
आता कुठे असतील दोघी ,कोण जाणे?
""श्री , अरे श्री , काय झालं?" मालुचा चिंतापुर्ण आवाज़.
मी एकदम वास्तवात आलो, २१ वर्ष मागे गेलो होतो. .
आता भानावर आलो.
"काय रे श्रीधर , सहा वाजता अालास , जरा पडतो म्हणून आत आलास. अरे , रात्रीचे नऊ वाजुन गेले बाहेर अाला
नाहिस. तब्ब्येत बरी नाही का?"
तिने कपाळाला व गळ्याला हात लावून पाहिला.
" काही नाही गं. थकलो होतो. डोकं दुखत होतं म्हणून पडलो. डोळा लागला . "
"नक्की ना ! कि त्या टपो र्या डोळ्यावालीचा फ़ोन आला म्हणून डिस्टर्ब झालास?"
"काहितरीच मालू तुझं. त्याचा काय संबंध?"
"लग्नाला २१ वर्षे झाली ,तरी , तुला मी २४ वर्षांपासून ओळखते रे" इति मालू.
"ते सोड गं. जेवणात काय केलंय.? उशीर झाला आज." मी विषय बदलला. ती मला चांगली ओळखते हे मात्र नक्की !
"काही विशेष नाही रे. थालीपिठं लावली होती, पोरींना भूक लागली होती , मग आम्ही खाऊन घेतलं. तुझ्यासाठी गरम लावते . उठ चल."
"हम्म्म चल. जेवून घेतो. पुन्हा ऑफिसचं बरच काम आहे."
जेवल्यावर वरच्या खोलित आलो.
ही माझ्या घरातील माझी आवडती जागा आहे.
वरची खोली म्हणजे काम आणि मनोरंजन!
वाचण्याचा विशेष नाद नाही पण काही पुस्तकं, टेबल-खुर्ची , माझं कंप्युटर , लॅपटॉप , म्युझिक सिस्टम , मोठा टिवी, ऑफिसच्या फाइल्स , सगळं इथेच.
थोडावेळ काम केलं आणि जुनी गाणी लावून पडलो, निवांत दिवाणवर.
आज का कुणास ठाउक शरयुची खूप खुप आठवण येत होती.
माझ्या आयुष्याचा सिनेमाच जणु मी पहात होतो.
पुन्हा त्या अविस्मरणीय दिवसाची , त्या रात्रीची आठवण तीव्र झाली.
ती जीवघेणी संध्याकाळ, मग नंतरच्या काही बेचैन रात्री.
शरद दादाच्या खोलित दाराजवळ झोपून त्या खोलितला अंदाज घेणं.
शरयु त्या घटनेनंतर कसली विरहाची गाणी ऐकायची.
मला खूप वाईट वाटायचं . . 'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी , मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, हमनेतुझको प्यार किया है जितना!
पत्थर के सनम चं ते गाणं. . कसं विसरू??
"ऐ काश के होती खबर तूने किसे ठुकराया है,
शीशा नही सागर नहीं, मंदिरसा इक दिल ढाया है. . "
या ओळी वाजल्या आणि शरयुने मोठ्यांदा हुंदका दिला आणि रडायला लागली होती.
रिमाने गाणं बाद केलं आणि तिला समजावत राहिली , रागावत राहिली.
मी मात्र दाराआड अपराधी भावनेने कुढत राहिलो.
कुणीतरी आपल्यावर इतकं जीवापाड प्रेम करतंय ही भावनाच मला दडपण आणत होती.
एकदा तर सुधा मलहोत्राचं गाणं घेवून अाली अन मला म्हणाली कि हे तुमच्यासाठी आहे.
"तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको, मेरी बात और है मैने तो मुहब्बत की है"
मला मात्र आजही ' "मेरे हाथों में तेरा चेहरा था' जैसे कोई गुलाब होता है " या ओळी ऐकल्या कि ती पांढर्याशुभ्र ड्रेसमधली मंद लाइट मधली हॉटेल मधली शरयु आठवते.
मग मी शरद दादाच्या खोलित जाणं कायमचं बंद केलं .
मग ८- १५ दिवसात त्या मुली आणि मी अगदी अनोळखी सारख्या राहु लागलो.
औपचारिकता सुरु झाली.
आणखी पंधरा दिवस गेले अन् मुली preparation holidays म्हणून त्यांच्या गावी गेल्या.
माझे ते पुण्यातले दिवस खूप रटाळ गेले.
शरयु वापस आली ती लग्न ठरलेली बातमी घेवूनच.
मला त्याचा फोटोही दाखवला.
मला खूप छान वाटला तो.
म्हणजे माझ्यापेक्षाही डॅशिंग आणि हँडसम !!
शरयुचं लग्न ठरल्याने आत्या नाराज होती.
तिच्या मनात काहीतरी होतं हे नक्की . तिने माई नानांना सांगितले, त्यानीही हुरहुर व्यक्त केली.
मला बेचैनी होती पण आनंदही होता कि शरयु चं मन तिकडे गुंतेल.
माझं पोस्टिंग चं लेटर आलं . नोकरी कनफर्म झाली.
मला वर्षभरासाठी बैंगलोर ब्रांच दिली.
माझ्या आयुष्याचा वेगळा प्रवास सुरु झाला.
मुली अभ्यासात बिझी झाल्या, आणि मी इथलं काम संपवण्याच्या नादात ऑफिसमधे जास्तवेळ थांबू लागलो.
त्याच दरम्यान ------
एक दिवस अचानक मालूचा भाऊ माझ्या ऑफिसमधे आला .
तो अलरेडी माझ्या बद्दल सगळी चौकशी करून आला होता.
मला भेटला.
त्याला थोडी शंका होतीच पूर्वीपासून ,आम्हा दोघांबद्दल !
" श्रीधर , मालूसाठी स्थळं शोधायला सुरु केलंय बाबांनी."
त्याच्या ह्या वाक्याने मी हादरलोच .
मालू महिन्यातून एखादे पत्र लिहायची , ऑफिसच्या पत्त्यावर, पण हे स्थळाबद्दलचं लिहिलं नव्हतं तिने!
माझ्याघरी मी अजून सांगितलं नव्हतं .
आत्यालाही मी अजून सांगितलं नव्हतं .
.तिला काय वाटेल असा विचार आला.
मालूच्या भावाशी व्यवस्थित बोललो .
आता मात्र मालूचं आणि माझं प्रेमप्रकरण गंभीरतेने घेण्याची गरज होती.
त्याने सगळे पत्ते वगैरे घेतले आणि पुढाकार घेउन लग्नाचे ठरविन असा शब्द दिला.
तो पूर्ण आठवडा खूप तनावात गेला.
अॉफिसमधे कामाचे लोड आणि घरी सगळे ताणतनाव.
मावसभाऊ , मित्र आणि बहिण सगळे जण मधे पडले आणि शेवटी आमच्या - (माझी आणि मालूच्या) साखरपुड्याची तारीख ठरली.
क्रमशः