swati Balurkar " sakhi "

Romance

4  

swati Balurkar " sakhi "

Romance

केली पण प्रीती - भाग १३

केली पण प्रीती - भाग १३

9 mins
1.9K


कथा पुढे---

"आमच्याकडे तर "कुणाचा फोन" आहे अशी शंका जरी आली तरीही मालू म्हणते फोन स्पीकर वर टाका. मग कशाचे जगजीत अन कोणते गुलज़ार!! आणि तू इतकी बिनधास्त बोलतेस नवर्‍याशी . . छान वाटलं. !"

" हो , तुम्हाला म्हटलं ना. . . मी पण त्यांना फ्रीडम देते अन् ते मला. आमची चांगली मैत्री आहे. मी माझ्या सगळ्या आवडी जपते आहे आता. वेळही आहे. "

ती उभी होती - सहज बाजूला खुर्ची सरकवून बसली.

"शरयु तो काळ खूप सुंदर होता ना गं ! आपण किती गाणी गझल्स ऐकली त्यावेळी. दूरदर्शनवर कितीतरी सिनेमे पाहिले एकत्र.

मस्त वाटायचं . . तुम्ही दोघी , आत्या अन् मी!"

" हो ना ! एक कुटुंबाची भावना होती. तुमचं अर्धवट सोडलेलं शब्दकोडं पूर्ण करणं मला आवडायचं , तुम्हाला चहा- पाणी देण्यात आनंद वाटायचा. " ती कुठेतरी हरवली पुन्हा.

"अाज एक सांगतो , जे तेव्हा सांगितलं नव्हतं. तुझं हे सगळं काम करणं , माझी काळजी घेणं ,खूप आवडायचं मला. तू रात्री आत्याला मदत करायचीस आवरताना ते पण मला खूप आवडायचं!"

" आणि मी ss???"

" तू ssss ? म्हणजे तू आवडायचीस पण मालूसारखं तुझ्यासोबत आयुष्य घालवावं अशी फीलिंग आली नाही कधी, त्यावेळी . स्पष्टच सांगतोय. पण आता मात्र? तेव्हा तू खूप इमोशनल होतीस ना गं शरयु?"

" हं . आताही आहे . . .पण थोडी प्रॅक्टिकल पण झालेय आता. "

" बरं इमोशन वरून विचारतो, तुझं त्यावेळचं आवडतं गाणं कुठलं होतं ?"

" काहितरीच ? कसं सांगणार? असंख्य गाणी होती. लताजींची , अाशाजींची , अरुणदातेंची आणि गझल्स. .!"

"तरीही एक खूप आवडतं एखादं सांग ना?"

" हंम्म्म. . अरुणजींचं --अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी ,

लाख चुका असतील केल्या ,

- - - केली पण प्रीती!"

" येस्स!! हेच म्हणत होतो मी. बरं हिन्दी आवडतं गाणं ??"

" काय हो श्रीधर? हिन्दी ss तेव्हाचं आवडतं गाणं ? ते आता पण आवडतं ना मला. --

'हमने देखी है

इन आँखो की महकती खुशबू '

'हाथ से छूके इसे

रिश्तों का इल्जाम न दो'

एक अहसास है ये

रूह से महसूस करो

प्यार को प्यार ही रहने दो

कोई नाम न दो "

ती मस्त गाणं गुणगुणायला लागली.

" ओके ! माझं झालं आता तुमचं सांगा. . फेवरेट हिन्दी गाणं ?

मी बेसुर्‍या आवाजात सुरु केलं -

"लगजा गले कि फिर ये हँसी रात हो ना हो

शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो." अाणि माझे दोन्ही हात पसरले.

"मला वाटलंच हे गाणं असणार !!" आणि ती मोठ्यांदा हसली. हसायला लागली , हसत राहिली , हसत राहिली आणि थांबेचना.

मी बेचैन झालो.

"अगं काय बसना यार . माझा मजाक उडवतेस काय?"

ती थांबेना. मला तिचं हसणं आवडत होतं पण ती खिल्ली उडवतेय असं वाटत होतं .

मी पटकन तिचे हात हातात घेतले.

आणि ती हसायची थांबली.

भानावर आली.

" श्रीधर ,आपण सोबत पाहिलेला इज़ाज़त आठवतो का हो ? "

"हो ना , टि वी वर, आपण चौघांनी घरात पाहिलेला. आठवतो ना "

" मावशीना बोर झाला म्हणून त्या हॉलमधेच पडल्या पडल्या झोपी गेल्या. रिमाच्या डोक्यावरून चाल ला विषय म्हणून ती मॅगझिन वाचत बसली आणि बसल्या बसल्याच झोपी गेली होती. "

"हो शरयु . सुरवातीला चौघेजण बसलो होतो पण सिनेमा संपेपर्यंत आपण दोघेच तन्मयतेने बघत होतो. कसं विसरेन मी.

या सगळ्या आठवणी कुठेतरी द डलेल्या होत्या. तुझ्या भेटण्याने कसं सगळं ताजं झालं. "

मला खरच आठवत होतं कि त्या सिनेमातल्या काही डायलॉगच्या वेळी मी तिच्याकडे पाहिलं होतं आणि नजरानजर झाली होती. ती नशा औरच!

श्री त्यातलं " मेरा कुछ सामान " या गाण्याला मी खूप उराशी लावून होते. कितीतरी दिवस! ऐकून खूप भावनिक व्हायचे. "

" खरंच ते 'मायाचं ' पात्र अविस्मरणीयच. तू तशी नाही वागलीस पण भावनेने मात्र मायाच आहेस माझ्या आयुष्यातली."

मी तिच्याकडे पाहिलं.

ती एकदम गप्प झालेली.

खाली पहात होती.

हातातल्या टिश्यू पेपरला चुरगाळत होती.

"शरयु , गप्प का गं ? बोलना , मोकळेपणाने बोल. "

तिने वर पाहिलं , डोळ्यात दोन अश्रु होते.

आठ वाजत आले होते. वेटर बिल देवून गेला होता.

शरयु इतक्या वेळात आत्ता मला खूप वेगळी आणि पुर्वीसारखी वाटली.

तिने माझ्याकडे पाहिलं व म्हणाली.

श्रीधर तो शेवटवा दिवस आठवा. सकाळी आम्ही जाणार होतो. आदल्या रात्री मालूला सोडून तुम्ही खूप उशीरा आलात. निघतानाची आपली भेट झाली नाही.

इज़ाज़त वरून आठवलं तेव्हा मी तुमच्या आयुष्यातून इजाजत न घेता गेले होते. आज मात्र तुम्हाला भेटून , तुमची परवानगी घेवून जावं अशी इच्छा होती.

it may sound you funny or filmy but. . from bottom of my heart I ask your permission to depart!

या एका इच्छेसाठीच मी तुमचा फोन नंबर मिळवला , संपर्क ठेवला. एक शेवटची भेट आणि पूर्णविराम !!!

श्रीधर मला आज परमिशन द्या. कुठल्याच स्वरूपात यानंतर मी तुमच्या आयुष्यात राहणार नाही."

ती खूप इमोशनल झाली होती. उभी राहिली. , माझे दोन्ही हात हातात घेतले अन कपाळाला लावले.

मला कळत होतं कि त्या क्षणी तिने मला मिठिही मारली असती पण इच्छा असुनही तिने तसं केलं नाही. ती शारिरीक मर्यादेत होती.

मी खरच हळवा झालो. इतका आदर माझ्यासारख्या साधारण माणसाला?!

मीही उठलो . उजवा हात सोडवून तिच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणालो-

" शरयु दिली परवानगी तुला. . . दूर जाण्याची. अशीच आनंदात रहा, मनसोक्त जग. "

ती मस्त हसली.

आम्ही सोबत चालायला लागलो. माझ्या हाताचा आधार तिच्या खांद्यांना होता. बाहेर निघताना रस्त्यात थोडा अंधार होता.

ती पुन्हा कधीच भेटणार नाही ही भावना मला असह्य झाली आणि तिच्या खांद्यावरचा हात खेचून मी तिला जवळ ओढली.

विजेचा धक्का लागावा तसा तिने माझा हात काढला आणि शाळकरी मुलाप्रमाणे माझ्या दोन्ही हातांची घडी घातली.

" प्लीज ssss श्रीधर हे करु नकात. मला शारिरीक आकर्षण कधीच नव्हतं , तेव्हांही आणि आता तर नाहिच. याबाबतीत मी माझ्या नवर्‍याकडून तृप्त आहे. "

"काहिहि काय बोलतेस शरयु. स्पर्शातून प्रेम व्यक्त होतं ती काय वासनाच असते का प्रत्येकवेळी."

" तसं नाही पण स्पर्श म्हणजेच प्रेम असतं असंही नाही. त्यावेळीही २५ वर्षांपुर्वी तुम्ही तेच केलं आणि आताही करू पाहताय. मला फक्त माझ्या भावनांचा आदर हवा होता तेव्हा. या सगळ्याची गरज नाहिय मला. "

"हो हो . ओके! तुला काहिच नको असतं . कळालं. तू खूप साध्वी आहेस गं शरयु वैरागी !पण. मी . ??"

ती मोठ्यांदा हसली.

"पण काय बोला?"

"मला तुझ्यासारखं सगळं शब्दात नाही बोलता येत. फक्त स्पर्शातून सांगता येतं.

आणि तू. . तेव्हाही तेच आणि आताही तेच. आणि तुला माहित आहे मी टेंशन मधे असलो की. . "

" हा हा हा " ती मोठ्यांदा हसली. " ओह माय गॉड . . तुमचं टेंशन!!"

"एकदा थोडंसं जवळ येण्याने काय होतं गं शरयु?"

" आता हे काय श्रीधर ? आपलं मैत्रीच्या पुढचं आणि प्रेमाच्या अलिकडचं नातं नाही समजणार तुम्हाला !

आता तर तुमची परमिशन घेऊन निघाले ना मी.

मग या वयात पुन्हा नव्या आठवणी नकोत मला तुमच्यासोबत.

आणि माझ्या मनाला कधीच ती अपराधी भावना नको नवर्‍यासोबत असताना.

मी प्रतारणा केली वगैरे! "

" बापरे ! फारच तत्ववादी आहेस तू! चल छोड. अॅज यू विश ! मी बिल देऊन आलोच तू चल बाहेर"

"अहो श्री , बिल तर मी द्यायला पाहिजे ? भेट मी ठरवली होती ना !"

"शरयु आमच्या नाशकाची इज्जत काढू नको यार. नो अर्ग्युमेंटस्.

चल आलोच मी. "

बिल देऊन आलो कारमधे बसलो ती बाहेरच उभी होती.

"अगं शरयु ,बस ना निघूयात."

"कुठे बसू समोर की मागे?" तिने आत वाकून विचारले.

" हा काय प्रश्न झाला का ? बस ना इथे बाजूला . " मी समोरच्या सीट वर बाजूला हात ठेवून इशारा केला.

" मग शांतपणे गाडी चालवायची , गुड बॉय सारखी. माझा स्टॉप येईपर्यंत ." ती मस्करीत म्हणाली.

" ओके मॅडम जशी अाज्ञा."

ती बाजुच्या सीटवर बसली. . दार लावून घेतलं आणि दाराला पाठ लावून माझ्याकडे चेहरा करून मोकळेपणाने बसली.

थोडावेळ मी तिच्याकडे पहात राहिलो. मग तिचे हात हातात घेतले.

"शरयु , प्लीज हात झटकू नकोस. याने काही होत नाही. आणि तुला काही किडनॅप करेन वाटलं का मी?"

"तुम्ही आणि किडनॅप ?? पहिले मालूची परवानगी काढावी लागेल तुम्हाला. इतकी हिम्मत नाही तुमच्यात !"

"तो येह बात? बघ बरं तुझा नवरा नाशिकला येईल तुला शोधायला.?"

"ते बघू पुन्हा !!! आता काय? गाडी स्टार्ट केली नाही, हातात हात घेतलेत, काही बोलायचय का तुम्हाला? बरोबर.

इतका वेळ मी च बोलत होते. तुम्ही ऐकत होतात. बोला श्रीधर!"

" so nice of you. किती स्मार्ट आहेस ग तू. ? आता मी बोलतो अाणि तू फक्त ऐक. माझ्याकडे पण खूप गोष्टी आहेत ज्या सांगायच्या आहेत, पण मी कुठेच बोलू शकत नाही. "

" ओह ! बरोबर आहे . खरंच तुमची सुद्धा एक बाजू आहेच जी तुम्ही मनातच ठेवलीय. बोला ना . मला ऐकायला आवडेल. "

मग मी गाडी चालू न करताच आरामात बसलो.

आणि तिला माझी बाजू सांगत राहिलो.

तिचा पहिला फोन आल्यापासून ह्या ३-४ वर्षातली घालमेल , झालेले प्रसंग, उडालेला गोंधळ , तिला शोधायची धडपड आणि भेटीसाठी केलेला आटा पिटा!

तिच्यामुळे जगायला शिकलेला , बिनधास्त झालेला श्रीधर.

मी थांबलो आणि तिच्या डोळ्यात पाहिलं खोलवर. . . दोन अश्रु. . डोळे पाणावलेले.

हातातले तिचे हात ओंजळीत घेवून मी पण भरून आलेल्या कंठाने म्हणालो-

" Thank you for everything dear , माझ्यासारख्या सामान्य माणसावर इतकं प्रेम केलंस तू , इतक्या उत्कटतेने भावना जपल्यास, मला महत्व दिलंस. "

तिच्या चेहर्‍यावर एक तेज दिसलं , ते अश्रू चमकले.

तिच्या हातांचं चुंबन घेतलं आणि डोळे मिटून म्हणालो-

" Sorry , sharyu, I am extremely sorry!"

तिने हात सोडवले आणि माझ्या दंडाला थोपटत म्हणाली " सॉरी का हो आता?"

"माझ्या फ्लर्ट स्वभावामुळे तुझ्यासारख्या हळव्या मुलीला मी दुखावलं . तुझ्या भावनांशी नकळत का होईना पण खेळलो. मी जेवढा सहज होतो तेवढी तू गंभीर होतीस प्रेमाच्या बाबतीत.

हा गिल्ट घेवून इतकी वर्षे राहिलो .

आता बस्स.

तुला आयुष्यात एकदा भेटून सॉरी म्हणावं अशी मनोमन इच्छा होती. म्हणून सॉरी वन्स अगेन. "

मलाच कळालं नाही कि मी इतका हळवा का झालो आता कि आसवं तिच्या हातावर पडली.

" श्रीधर हे काय? नका इतके भावनिक होऊ. मी तुम्हाला मनातून माफ केलं अन मगच लग्न केलं .

काढून टाका हा गिल्ट मनातून आणि मोकळे जगा आता."

ती कळवळून मला समजावत होती.

तिनेही डोळे पुसले आणि म्हणाली.

" आपली ट्युनिंग छान आहे , अजुन एक शेवटचं . . श्रीधर ! तुम्ही माझा नंबर डिलीट करा , मी तुमचा नंबर डिलीट करते. ही आपली शेवटचीच भेट आहे.यापुढे कसलाच संपर्क नको, कसलेच टेंशन नको. आज सगळं शेअर करून झालं. मन मोकळं झालं . तुमचंही आणि माझंही!"

मी शॉक झालो. पण यंत्रवत मी ते केलं अन तिनेही.

उशीर झाला होता. मी गाडी स्टार्ट केली.

४-५ मिनिटात तिचा स्टॉप आला.

यादरम्यान दोघंही काहिच बोललो नाहित.

कारमधे इंस्ट्रुमेंटल म्युज़िक चालू होतं .

गाडी थांबवली.

तिने हात मिळवला आणि पर्समधुन एक पार्करचं पेन काढुन माझ्या खिशाला लावलं .

मला खूप आवडायचं त्यावेळी. तिने लक्षात ठेवलं होतं.

"अगं हे काय? आणि थांबना तू रिकाम्या हाताने का जातीयस?"

( मी तिच्यासाठी गिफ़्ट आणलं होतं. पण ती घेईल की नाही , आठवणी नको म्हणेल म्हणून मी इतका वेळ काही बोललो नाही.)

मागे वळून मागच्या सीटवरून अॉफिसचं पार्सल घेतलं , त्यातून गिफ़्ट बॉक्स काढला. आणि तिच्या हातात दिला .

" काय हे?"

"आता काही बोलू नकोस.

घे.

मी घेतलं कि नाही तुझं गिफ्ट. वेड्या मित्राची शेवटची आठवण. !"

"ओके ! थँक्यू . पण यात काय आहे , सांगाल का वेड्या मैत्रिणीला?"

" अं. .दाळिंबी रंगाची पैठणी आहे. तुझ्यासाठी येवल्यावरून मागवून ठेवली होती ,ऑफिसमधे. भेटशील तेव्हा देईन म्हणून. "

" वॉव . सो स्वीट ऑफ यू. आवडता रंग माझा . थँक्यू . चला , जाते आता.

बाय!"

ती उतरून चालू लागली .

ती गल्लीत दिसेनाशी होईपर्यंत पहात राहिलो.

जाताना जातो नाही, ' येतो ' म्हणावे हे आईचे संस्कार आठवले.

पण ती मुद्दाम 'जाते ' म्हणाली हे कळाले.

मिश्रित अवस्था होती मनाची.

हलकं वाटत होतं , भार उतरल्या प्रमाणे!

पण ती गेली याची हलकीशी हुरहुर होती.

मी खिशातल्या पेनला हळूच कुरवाळलं .

गाडी स्टार्ट केली अन् FM चालू केलं ,

दैवयोग कि योगायोग माहित नाही कि दैवी योजना माहित नाही. . .

अरूणजींचे रेशमी - मधाळ स्वर कानावर पडले.

इथे सुरु होण्या आधी संपते कहाणी,

साक्षीला केवळ उरते डोळ्यातील पाणी"

जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती.

लाख चुका असतिल केल्या,

- - केली पण प्रीती !

सर्व बंध तोडून जेव्हा नदी धुंद धावे ,

मीलन वा मरण पुढे हे , तिला नसे ठावे,

एकदाच आभाळाला असे भिडे माती,

लाख चुका असतील केल्या,

- - - केली पण प्रीती !

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी,

लाख चुका असतील केल्या ,

- - - केली पण प्रीती !"

मी धुंदीत गाडी चालवत होतो.

गाडी घरा कडे वळवली.

कथा समाप्त.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance