केली पण प्रीती - भाग १२
केली पण प्रीती - भाग १२


पूर्व कथेचा शेवट. . .
मी तिला पहात होतो, तिचं संतत धार बोलणं , ते डोळ्यातले भाव , तो चेहर्याचा ग्लो.अप्रतिम दिसत होती ती.
आज मलाही खूप छान वाटत होतं पण हलकं नाही.
क्रमशः
------------------ - -------- - ------------------
कथा पुढे....
तिचं ऐकून घेतल्यावर मी म्हणालो,
" हे तुझं भेटणं झालं शरयु. ही तुझी बाजू होती . ऐकली आणि छान वाटलं .
मला, माझी पण एक बाजू आहे' जी मी कधीच कुणाजवळ बोललो नाही , बोलू शकलो नाही आणि
आता बोलू शकणार नाही. आणि वास्तविक इतरांना त्याची गरजही नाही.
मी एक्सप्लेनेशन द्यावं असं मालू सोडून कुणीच नव्हतं . आज तू भेटलीस तर तुझा विषय तुझ्याशीच बोलायला आवडेल मला. !""हो श्रीधर , तुम्ही बोला आपली 'एक भेट' व्हायला २५ वर्ष गेली. !"" हो ना , पुन्हा पुढची भेट माहित नाही कधी होईल.!" मी म्हणालो."मालूजवळ बोललात का कधी आपल्या बद्दल ?"
"नाही गं !! काहितरीच काय ? हेच न बोलता ती बरच काही जाणते !
कशी काय कोण जाणे ! तु़झं नाव काढलं तरी चिडते. का राग आहे तुझ्या बद्दल ? माहित नाही .
आणि हो तुला ती टपोरे डोळेवाली म्हणून ओळखते. !" मला हसुच आलं सांगताना.
"अय्या हे काय ? ती माझ्या नावावरून चिडते म्हणजे चूक तुमचीच.
बरोबर ना , तुम्ही तिचा विश्वास नाही कमाऊ शकलात."
"शरयु अस् काय म्हणतेस?"
"तुमच्या सांगण्यावरून मला जे वाटतं ते बोलतेय मी.
अॅक्चुअली खूप गोड आहे ती.
तुमच्यावर खूप प्रेम आहे तिचे.
पण तुमच्या त्या फ्लर्ट स्वभावामुळे तिला सतत अविश्वास असतो.
तिच्या जागी राहून विचार करा एकदा.
ती तुम्हाला सतत बांधून ठेवू इच्छिते . बरोबर ना !"
"अरे व्वा इतकं आकलन . गुड!! "
"अहो हे काहिच नाही . खूप फिलॉसॉफी झाडते मी.
फक्त एकणारे हवेत समोर ! असं माझा मुलगा म्हणतो. "
"ओके बरं मग सांग , मालूला तुझ्यावर राग का अाहे?"
हिच वेळ होती मला जाणून घेण्याची.
" श्रीधर , या प्रश्नाला कुठल्याच फिलॉसॉफीची गरज
नाही. ते सिक्रेट मला माहित आहे !"
आणी ती हसली गूढ. . .
"अगं खरच कि काय ? गेल्या २४- २५ वर्षात जे
मलाही कळालं नाही अन ते तुला माहित आहे. !"
" श्री ,भूतकाळात जा आणि आठवा त्यावेळी तुमचे
माई आणि नाना तुमच्या आत्यांकडे रहायला आले
होते एकदा पुण्यात !"
"हो हो ! आठवतंय ना . तू मस्त जुळवून घेतलं होतं
माईशी. "
" तेच तर श्री !! माई सतत मला पहात असायच्या.
आणि एकदा तर त्या आत्यांना म्हणाल्या-
"किती शांत आणी सोज्वळ आहे हो शरयु. नीटस
आणि टपोर्या डोळयाची. मला तर श्रीधर साठी
अशीच बायको पाहिजे. "
अन आत्या लगेच म्हणाल्या-
"अशीच काय अहो , हिलाच सून करून घेऊ अापण.
माझा फार जीव आहे या पोरीवर.
मी ते ऐकलं आणी लाजून पळाले.
त्यानंतर तुमचं वागणंही माझ्याकडे झुकणारं होतं .
तुमचे नानाही मला जाताना म्हणाले होते - 'तुझ्या
मनातला नवरा मिळू दे तुला. '
या सगळ्या प्रकारामुळे माझ्या मनात तुमच्या घरी सून
म्हणून येण्याचा विचार पक्का झाला. त्यात ती
आडनावाची चिट्ठी आणि तुमची जवळ येण्याची
खटपट ! त्यामुळे मला वाटलं हे सगळं प्रत्यक्षात
घडणारच आहे. आणि मग मी त्या प्रीतीच्या जाळ्यात
जणू अडकत गेले."
" आई शप्पथ !! खरं कि काय? इतक्या वर्षात हा
विषय मला माहित नव्हता. अन् ही चावी तुझ्याकडे
होती. बरोबर माईच मालूला काहितरी म्हणाली असेल.
म्हणूनच ती तुझे नाव काढू देत नाही. ओहो !!! टपोरे
डोळे . ते आहेतच की. !"
"हा हा हा " ती खुलुन हसली.
"पण सिरियसली श्री , तुमच्या आणि मालूबद्दल
कळाल्यावर मावशी आय मीन आत्यांना खूप वाईट
वाटले होते. त्या माझ्याजवळ रडल्या होत्या. त्यांच्या
मनात आपल्या दोघांना सोबत पाहण्याची इच्छा होती. "
मी विचारात पडलो.
"अगं बरोबर ! आत्या नाराजच होती.
मालूचे कळाल्यावर .
उत्साह दिसलाच नाही. आजपर्यंतही तिने कधीच तुझा
विषय काढला नाही. "
" श्रीधर तुम्ही मालूला पहिल्यांदा घरी आणलं तेव्हा
आम्ही दुसर्या दिवशी परत जाणार होतो.
आतेबाईंना रडू अनावर झालं होतं.
त्या मला सॉरी म्हणाल्या त्यादिवशी.
म्हणूनच चहा मी घेवून आले होते तुमच्या खोलीत.
त्याना ते बघवलं नाही.
त्या गळ्यात घालून रडल्या खूप वेळ, स्वतःला
समजावत राहिल्या.
ह्या सगळ्या भावना रेशमी घडीत मनात जतन करून
मी इथून गेले होते.
हे सारं मी आतापर्यंत कुणालाच सांगितलं नाही !"
सगळं ऐकलं आणि मी बेचैन होउन उठलो.
इकडे तिकडे २-३ फेर्या मारल्या.
काही सुचेनासं झालं .
मला शरयु आवडत होती या एका भावनेच्या लपवल्या
मुळे मी किती लोकांना दुखवलं होतं.
मग सहज होउन वेटरला बोलावलं .
दोन कॉफी सांगणार होतो पण शरयु म्हणाली ,
"दुसरं काही मिळत नाही का इथे?"
मग दोन फ्रुट पंचेस अॉर्डर केले.
खुर्ची सरकवून तिच्या बाजूला येवून बसलो. मनात खूप गोंधळ.
" शरयु ssss ग्रेट आहेस यार तू. कधी चिडली
नाहिस , रडली नाहिस . तक्रार केली नाहिस. इतकं
दुःख मनात साठवून नवीन आयुष्य सुरु केलंस.!!!!"
" हो श्रीधर ! आजकालच्या पिढिला हा सगळा
बावळटपण वाटेल. पण मी तशीच होते . मला त्याची
खंतही नाही. आश्चर्य वाटेल तुम्हाला पण " फ्लर्ट " हा
शब्द मला तुमच्यामुळे कळाला. एक मैत्रिण म्हणाली
होती 'अगं मुलं असेच फ्लर्ट करतात' आणि मी त्याचा
अर्थ विचारला तर ती हसली होती.
म्हणजे कुणाचं तरी कुणावर तरी प्रेम असतं किंवा प्रेम
नसतं , एवढच मला तेव्हा कळायचं . तुम्ही केलेली
फ्लर्टिंग होती हे लग्नानंतर कळालं मला. "
" शरयु , Iam shocked. !
किती छान बोलतेस यार तू.
खरं सांगु तर मलाही आतापर्यंत ठरवता आलं नाही कि
माझं तुझ्याशी काय नातं होतं ? फ्लर्टिंग नव्हती एवढं नक्की . !"
"श्री , आजकाल अफेयर , ब्रेक अप , लिव्ह इन ,
डिवोर्स हे खूप कॉमन शब्द झालेत. या पिढिसाठी हे
सहज आहे पण आपल्यासाठी नाही. "
" हो ना गं ! मी पण ऐकतो , वाचतो हे सगळं . काहितरी
विचित्रच चाललंय असं वाटतं ."
" श्रीधर तुम्ही काहीही समजा, पण एक कळकळीची
विनंती आहे कि मालूला तुम्ही हे कनविन्स करा कि
तुमच्या आयुष्यात आता काही घडणार नाही. तिला
म्हणावं मोकळं जग आणि जगू दे.
तिने पहिल्यांदा पाठवलेला मेसेज तसा करेक्ट होता कि
दोघेही आपापल्या आयुष्यात सुखी आहेत ना मग
कशाला पुन्हा कॉनटॅक्ट करायचा. ???!!!!
खरं सांगा श्री तुम्हाला किंवा मालूला काय वाटतं , . . .
आपलं पुन्हा काही अफ़ेयर वगैरे सुरु होईल?
नाही श्रीधर , ती वेळ , ती भावना ,
ती तिव्रता - उत्कट ता एकदाच असते कुणाच्याही जीवनात.
पुन्हापुन्हा ती येत नसते.
तीच तिव्रता तुमची त्यावेळी मालूसाठी होती. . . .
म्हणून तुम्हाला मी आवडूनही तुमचा कल मात्र
तिच्याकडेच राहिला असं मला वाटतं.
आता मात्र तुम्हा दोघांना एकमेकांची सवय पडलीय. "
"असेल कदाचित . मग तुझं?" मला पटत होतं ते.
" तसंच माझंही आहे. ती भावना, तुमच्यासाठी ,फक्त
त्यावेळीच होती.
पुनः मी संसारात पूर्णतः गुरफटले , विरघळले. ती ओढ मला आता वाटत नाही.
तुमच्याशी बोलताना किंवा भेटतानाही मला असं
कहिच वाटत नाही जे तेव्हा वाटायचं.
मला धडधडतही नाही.
आता एक मॅच्युरिटी येवून जाते.
जोडीदाराची सवय लागून जाते आणि आपण त्या
व्यक्तिला गुणादोषांसकट स्वीकारलेलं असतं. नाहिका?
आता या वयात आपल्याला कोणी भरीस पाडू शकत नाही.
२२-२५ वर्षाँचा काळ छोटा नसतो ना श्रीधर !!
हेलो sss काय झालं??"
मी तिला टक लावून पहात होतो.
ती कुठेच पुर्वीची जुनी शरयु नव्हती.
मी भानावर आलो.
" अगं तू किती समजुतदार आहेस. तू समुपदेशक
नाहितर वकिल व्हयला हवी होती यार. किती छान
बोलतेस आणि कनविन्स करतेस. मला फार भारी
वाटतय हे सगळं ऐकुन.
कुठे शिकलीस गं एवढं मुद्देसूद बोलायला.
पण एक सांगतो_ तुझा नवरा फार लकी माणूस आहे गं."
मी तिच्या हातात हात मिळवला आणि तसाच पकडून
थोपटला.
ती मंद हसली.
साडे सात वाजत आले होते.
वेटर फ्रुट पंच घेवून आला.
"घे ना गं तू. "
"हो घेतेच , तुम्ही पण घ्या. श्री - साडे सात होतायत!"
इतक्यात तिचा फोन वाजला.
" तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मैं!" रिंगटोन!!
शरयुचा फोन वाजला .
"तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मै!" तो वाजत होता , ती हैण्डबैग मधे फोन शोधत होती.
(जनरली बायकाना त्यांच्याच पर्समधला फोन लवकर सापडत नाही. तारांबळ उडते. असा माझा अनुभव कारण त्या घाईत प्रत्येकवेळी वेगळ्या कप्प्यात फोन ठेवतात. )
पण शरयु ने आरामात फोन काढला , मी इशारा केला होता म्हणून तिने उशीरा फोन रेसिव केला . मला गाणं ऐकावं वाटलं होतं !
" हेलो , बोलतेय "
-
"हो बोला ना"
-
" हो अहो , मी बाहेर आहे!"
-
"हो ना !एका जुन्या स्नेहितांना भेटायला आले. "
-
"हो ना आता काय डिनरचा प्रश्न नाही , भरपूर मिसळ
पाव खाल्लीय मी"
-
"असं काही नाही , अहो आवडते मला . तिखटही आवडते. कधी कधी तिखटही छान वाटतं अहो. हो. हो ना गाडी रात्री ११. १० ला."
- _
"हो हो ! अगदी अारामात येईन . नो इश्युज़. उद्या निघते ना मुंबईहून , कळवते. "
--
" पोरं मजेत ना हो"
-
"हो हो मी एन्जॉय करतेयना . अरे हो , खूप रिलॅक्स वाटतय, शांत!"
-
"ओके डिअर . बाय ! टेक केअर!!"
---
"कोण गं शरयु ?पतिमहाशय का ? "
"अर्थात.!"
"किती रिलैक्स अन फ्रेण्डली बोलता यार तुम्ही. !"
"हो sss खूप कूल अन शांत अाहेत ते. आमचं
बिनधास्त असतं ! मला पण पुष्कळ फ्रीडम अाहे
घरी. !"
"छान छान . खूप मस्त वाटलं. !" मी खरच आनंदलो.
" रिंग टोन भारी आहे गं तुझी.!"
"मग. असणारच . आम्ही गुलज़ार अन गज़ल ची फॅन
माणसं!" ती टपोरे डोळे फिरवित म्हणाली.
" आम्ही पण काही अरसिक नाही. आम्हाला पण
आवडतात तुमचे गुलज़ार, गज़ल आणि जगजीत
सिंग!"
मी मुद्दाम लाडिकपणे म्हणालो अन् ती खऴखळून
हसली.
क्रमशः