केली पण प्रीती - भाग ११
केली पण प्रीती - भाग ११




कथा पुढे. . .
ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो.
ती उभी होती तिथे .
मी ओळखले.
ब्लॅक कॉटन जीन्स आणि पांढरा फ्लोरल टॉप घातलेला .
हेअर स्टाईलही वेगळी.
किती वेगळी , जुन्या शरयुपेक्षा!
मी गाडी थांबवली .
ती मागचे दार उघडत होती , मी वाकून पुढचे दार उघडले.
मस्त स्माइल देत बोलली " हाय श्रीधर! वॉव !फोर व्हीलर आणलीत. मला वाटलं. . . ?" ती हसली.
मी बसण्याचा इशारा केला.
"काय हे शरयु, तुला काय वाटलं मी बाईक किंवा बुलेट घेवून येईल??? अाणि आपण दोघं बाईकवर फिरणार?"
"हो त्यात काय? मी तर मजेत बसले असते" ती बेधडक म्हणाली.
" काही सांगू नकोस . तेव्हा तर किती भ्यायचीस गाडी वर बसायला. आणि आता?"
"अहो खूप फरक आहे तेव्हा आणि आतामधे. तुम्हाला कळाला नाही का ? आणि तसंही मला कोण ओळखतय नाशकात?" ती रिलैक्स बसली सीटला टेकून. एक कटाक्ष माझ्याकडे .
" बरोबर आहे शरयु! तू खूप बदललीस , बोल्ड झालीयस आता. पण बाईक कशी शक्य आहे? मला खूप लोकं ओळखतात इथे! "
"एक सांगू श्रीधर तुम्ही जितके डॅशिंग वाटायचात ना तेव्हा , . . .त्याउलट भीगी बिल्ली झालात आता "
ती हसायला लागली अन मला पण हसु अालं .
"काहिही बोलू नकोस गं !"
वेगळीच शरयु पहात होतो मी , अवखळ आणि स्मार्ट.
गाडी तशीच थांबलेली. अन् मी वेगळ्या शरयुकडे पहात होतो , स्टेअरिंगवर हात ठेवून.
"स्टार्ट करा बोला कुठे जाणार आहोत आपण ?"
"कळत नाहिय गं कुठे जावं ? कुणीतरी पाहिल अशी भीती आहे इथे. पुण्यात तसं नव्हतं ना . मला कुणीच ओळखत नव्हतं ."
"ओके मग गाडीतच बसायचं का निवांत. ठीक आहे , पण ए. सी. ?"
"अगं काहीही काय. तो बघ ट्रॅफिक पुलिस मारेल मला. !??"
" चला मग इथली फेमस 'मिसळ पाव" तरी खाउ घाला मला."
"चल , कॉलेज रोडला जाउयात. पण तिखट असते बरं का तिथली मिसळ. खाशिल ना !" मी थ ट्टेने बोल लो.
ती हसली.
"तुम्ही जे खाऊ घालाल ते खाईन. ओ. के. चला "
कार स्टार्ट केली.
उजवा हाताने ड्राईव्ह करताना डावा हात तिच्या खांद्यावर टाकण्याची इच्छा झाली. दोनदा प्रयत्न केला पण तिने हात काढून अॅक्सलरेटरवर ठेवला.
जवळ ओढण्याचा प्रयत्न केला पण तोही फेल गेला.
" काय यार तू तशीच आहेस अजून!!"
"हो मी तशीच आहे,. . तशीच राहणार ! तुम्हीही तसेच आहात अजुनही.!!"
" एक सांगु ?? का कुणास ठाऊक पण फक्त तुझ्यासोबतच असं होतं !
अगं शप्पथ शरयु. !!! मी मालूशिवाय कुणाला बघत नाही, हात लावत नाही. "
ती मोठ्यांदा हसली.
"काहिही हं श्री. मी विश्वास ठेवू म्हणता यावर?"
"हो अर्थात "
एफ एम लावलं
जुनी गाणी लागली होती.
"तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको
मेरी बात ओैर है मैने तो मुहब्बत की है !"
ती हसली. "काय दिवस असतात ना एकेक. "
" काय झालं ?"
"अहो , हे गाणं त्याकाळी मला वाटायचं माझ्यासाठीच लिहिलंय. किती वेडी होते मी तेव्हा.!"
" हम्म्म आय नो. तू आणि रिमा भांडला होतात ना गायिकेच्या नावावरून . ती आशा भोसले म्हणाली आणि तू सुधा मल्होत्रा. तू बरोबर होतीस. ! तुला गाण्यांची खूप आवड होती ना! लक्षात आहे माझ्या !"
"ओहो । हे सगळं लक्षात आहे . . . आय मीन माहित आहे तुम्हाला , कसं?"
"अगं ते नाहिका मी शरद दादाच्या खोलीत जाउन बसायचो , वाचनासाठी ! तुमच्या सगळ्या गप्पा मी ऐकायचो. "
"बाई गं कसले चालू होतात तुम्ही?? वेरी बॅड"
"मग होतो बुआ तेव्हा. तुमची कृपा. "
" बरं !! आता आमची कृपा का?"
"शरयु , रिमा कुठे असते गं ?काही माहित आहे का ? ती शरे म्हणून हाक मारायची ना तुला ? अल्टीमेट. मला फार आवडायची तुमची मैत्री ! तुझ्यावर भारी जीव तिचा."
""हो ना मग . माझी सर्वात क्लोज फ्रेण्ड आहे ती. अजुनही टच मधे आहे. यू एस ला असते. येतीय पुढच्या महिन्यात. लक्षात आहे का ते हॉटेलचं प्रकरण?"
"प्रकरण काय गं ? आपली भेटच ना ?"
मी एकदम ओशाळलो.
ती एकदमच हसायला लागली , " अहो नाही. भेट ठीक होती , भेटीनंतर रीमाचं तुमच्याशी वाद घालणं आठवलं म्हणून प्रकरण म्हणाले " ती हसत हसत बोलत होती.
"खरच गं मी जाम घाबरलो होतो तेव्हां. तुला ती सोडायला आली होती पुन्हा सरळ भांडायलाच आली. माझ्या शरेसोबत तुम्ही असं का वागलात वगैरे. ते मी तुझ्या जवळ येणं बिलकुल आवडलं नाही तिला ." मी ही हसायला लागलो.
"तुमचा नकार पचवणं माझ्यापेक्षाही तिला जास्त जड गेलं . ती माझं सांत्वन करत राहिली. ते जाऊ द्या. तुमचंयाबद्द ल सांगा ना!"
शरयु , मला आठवत होते या दरम्यान जुने दिवस . तुझा पहिला फोन येवून गेला ना त्यानंतर तुझा खूप विचार करायला लागलो मी. म्हणजे तेव्हा इतकं तडका फडकी झालं सगळं कि वीस वर्ष जणु ट्रान्समधे होतो.
तुझा एक कॉल आला आणि सगळ्या आठवणी गर्दी करायला लागल्या.
या दरम्यान मी तुझा आणि माझ्या त्या दिवसांचा जास्त विचार केला."
"हो का . म्हणजे वीस वर्षात तुम्ही माझी आठवण केली नाहित ? बरोबर म्हणा तुम्हाला का आठवेण मी?" ती बाहेर पहात बोलली.
" तसं नाही गं पण . . ते सोड तुझं काय? "
"माझं सांगेन ना श्रीधर , माझं वेगळं होतं थोडं ! घाईत नाही बोलता येणार. " शरयु.
" ओके मॅडम. पण एक मानतो कि तुझ्यामुळे मी खूप बदललो यार. यादरम्यान म्हणजे असं फोनवर कुणाशी बोलणं , बाहेर फिरायला येणं सगळं बंद केलं होतं मी.
या ३-४ वर्षाँमधे किती फ्री झालोय मी. नाहितर अॉफिस आणि कुटुंब एवढच माझं जग होतं . स्वतः ला बंदिस्त करून घेतलं होतं. "
"वाह ! छान कि मग. "
"चला पोचलो आपल्या डेस्टिनशन ला. !"
हॉटेल आलं . उतरून गाडी लॉक केली.
वेटरला बोलावलं . आत हॉटेलमधे न जाता मागच्या गार्डन रेस्टॉरंट मधे टेबल खुर्ची टाकायला सांगितली.
अंधार पडायला लागला होता. शरयु बाजुलाच उभी होती डिसेन्टली , हैण्डबैग पकडून .
तिच्या खांद्याला हाताचा आधार देत टेबलपर्यंत गेलो.
तिला खुर्ची दिली.
अॉर्डर दिली.
तिच्या बाजुला खुर्ची टाकली.
मी हात पुढे केला तिने हात मिळवला.
हातात हात तसाच धरून ठेवला. ती काही बोलली नाही.
"कमाल दिसतेस शरयु तू. . अजुनही. ! काहितरी स्पार्क आहे तुझ्यात जो मला तुझ्याकडे ओढतो. "
"हो का . थँक्यू !! पण एक सांगू तुम्ही मनाने म्हातारे झालात श्रीधर. !"
" हो का ?होणारच ना ! अगं कॉलेजला मुलगी आहे माझी . पन्नाशीच्या जवळ आलोच ना."
" तसं काही नसतं . माझी मुलही मोठी आहेत पण मी मेनटेन करते. आणि स्वतःसाठी पण जगते . "
"मग . . . शेवटी , आपण आज भेटलो २३- २४ वर्षाँनंतर . !"
" हो ना! मी यावेळी ठरवलच होतं कि तुम्हाला भेटल्याशिवाय जायचंच नाही. योग प्रबळ होता. मला तुमच्याशी बोलायचं होतं थोडं"
"बाप रे मला मारण्याचा वगैरे तर विचार नाहिना. जुन्या रागामुळे. .!" मी मिश्किल.
" मारायचं नाही , पण इतकी वर्षांपर्यंत साठवलेलं काही बोलायचं होतं. " ती गंभीर झाली होती.
मला अंदाजच येईना ती काय बोलणार आहे.
वेटरने मिसळ पाव आणून ठेवली.
अंधार गडद होत होता !
एका कोपर्यात लैम्प पोस्ट चा मंद उजेड . शांत वातावरण . आम्ही दोघच.
" हे काय ? घे ना मिसळ !"
" हो , तुम्ही पण घ्या"
"तुम्हाला तिखट लागेल बरं आज भेळ. " ती पुन्हा हसली.
" लागू दे गं . मला सवय आहे तिखटाची. !"
"श्रीधर सिरियसली. मुद्दयाचं बोलते. गेले कित्येक वर्षे मला असं वाटायचं कि तुम्हाला भेटून सांगावं कि जे तुम्ही त्यावेळी माझ्यासोबत वागलात, ते चूक होतं तसं कुणाशीही वागू नका. आज माझी अशी अवस्था तुमच्यामुळे आहे. हे प्रत्यक्ष भेटूनच सांगायचं होतं.!
म्हणजे तेव्हा २४-२५ वर्षाँपूर्वी पुन्हा कुणाच्या भावनांशी खेळू नका हे सांगावं वाटलं. . . पण त्या आधीच तुमचं लग्न ठरलं."
माझ्यासाठी हे सर्व शॉकिंग होतं .
" अरे काय हे शरयु ?? काय बोलतीयस? काय झालंय तुझ्या आयुष्यात ? ३-४ वर्षाँत कितीदा तरी बोललो आपण कधी जुना विषय काढला नाहीस , बोलली नाहिस !"
"देवाची कृपा. काही वाईट झालं नाही , पण होऊ शकलं असतं ! फोनवर कसं बोलणार मनातलं साठवलेलं . ते तर प्रत्यक्ष च बोलायला हवं ना "
मिसळ पाव खाताना तिखट हळू हळू चढत राहिलं.
तिच्या मनातलं त्यावेळचं सगळं ती सांगत राहिली , मी एकत राहिलो.
ही तिची इतकी हळुवार बाजु मला माहित नव्हती.
मला फक्त माझी बाजू आणि काही जाणवलेल्या गोष्टीच माहित होत्या.
मी विचार करत होतो कि तिच्या भावना दुखावल्याची अपराधी भावना खोलवर माझ्या मनातही आहे.
मध्यंतरी बेचैन होऊन मी उठलो. एक चक्कर मारली बागेच्या त्या कोपर्यापर्यंत आणि पुन्हा तिच्या समोर खुर्ची टाकून बसलो.
तिला रोखून पहात म्हणालो ,
" तुला सगळं बोलण्याचा अधिकार आहे शरयु . खरंच मी चुकलो त्यावेळी. तुझा संसार तर सुखाचा आहे ना आता? तू खुश आहेस ना.!"
"मी खुश आहे आता! पण त्यावेळी झालेलं तुम्हाला सांगावं एकदा , अशी तीव्र इच्छा होती. "
" ओके , बोलना."
"श्रीधर तुमच्या नकारानंतर मी गावी गेले होते ना त्यावेळी आईने दाखविण्याचा कार्यक्रम ठेवला होता. मी काहीही चौकशी केली नाही. कार्यक्रमात पुतळ्याप्रमाणे बसले. मानही वर न करता लग्नाला संम्मति दिली. तुम्ही नाही तर तिथे कुणीही असला तर काय फरक पडतो असं वाटलं. मी त्यांना पाहिलच नाही. "
" हो का? बापरे. काय डेअरिंग तुझी ?"
मुळात हा बघण्याचा दाखवण्याचा कार्यक्रम म्हणजे तिटकाराच मला. अनोळखी माणसाशी लग्न म्हणजे जुगारच ना ! नशीबच ! कारण दहा मिनिटात काय कळतं , स्वभाव कि चरित्र?
म्हणून मला कुणा ओळखितल्या मुलाशी लग्न करायचं होतं . ते जमलं नाही. "
तिचा शब्द न शब्द खरा होता पण नेमकं काय सांगायचय तिला कळत नव्हतं.
" शरयु बरोबर अहे तुझं पण . . तुझा नवरा भारी आहे गं . मी फेसबुक वर फोटो पाहिला दोघांचा. "
तिच्या चेहर्यावर एक स्माईल आलं.
"हो ना , तुमच्यापेक्षाही हॅण्डसम आहेत ते. समजुतदार निघाले हे माझं नशीब. पण कल्पना करा श्रीधर . तिथे कुणीही असु शकलं असतं राकट , व्यसनी , संशयी , दुष्ट , रंगेल , चरित्र हीन , कुणीही , ज्या मुलाला मी न पाहता होकार दिला होता. ब्लाईंड गेम. आई बाबांनी पुढची तयारी केली इतकच.
तुमचा विरह मला खुप जड गेला. श्रीधर, तुम्हाला विसरायला मला वेळ लागला. पहिलं प्रेम शिवाय खोलवर रुजलेलं . तुमच्या वागण्याने अबोल खतपाणी मिळत राहिलं त्याला. "
"आय नो. मग त्यांना काही कळालं का हे ?"
" म्हणजे त्यांना तुमचं नाव माहित आहे. माझं एकतर्फी होतं हे ही माहित आहे. पण एवढ्या वर्षात त्यांनी मला कधी विचारलं नाही कि टोमणा मारला नाही. तुम्ही न मिळाल्याची खंत मला राहिली नाही.' सच अ लवली परसन ही इज. '
त्यांचा कामाचा व्याप खूप अाहे त्यामुळे मी घर सांभाळून पार्ट टाईम नोकरी करते.
पैशासाठी नाही पण शिक्षणाचा उपयोग व्हावा अन वेळ कारणी लागावा म्हणून. "
"गुड !! मस्तच आहे सगळं !"
" गेल्या काही वर्षात मला हवं तसं छान फ्री आयुष्य जगते , जुन्या मित्र मैत्रिणींना भेटते.
हवं तिथे पैसा खर्च करते. नात्यातले वगैरे कार्यक्रम एकटीने अटेंड करते.
मुलं मोठी झालीत ना आता.
बस्स मनाच्या कुठल्यातरी कोपर्यात तुम्हाला एकदा भेटण्याची इच्छा होती. ती देवाने आज पूर्ण केली. खूप हलकं , खूप छान वाटतय मला. "
मी तिला पहात होतो, तिचं संतत धार बोलणं , ते डोळ्यातले भाव , तो चेहर्याचा ग्लो.
अप्रतिम दिसत होती ती.
आज मलाही खूप छान वाटत होतं पण हलकं नाही.
क्रमशः