swati Balurkar " sakhi "

Romance

3  

swati Balurkar " sakhi "

Romance

केली पण प्रीती -भाग १०

केली पण प्रीती -भाग १०

4 mins
1.8K


शरयुचा पहिला कॉल येवून गेला त्याला ३-४ वर्षे झाली. १- २ महिन्यात कधीतरी बोलणं होतं. मग उगीच इकडचं तिकडंचं कधी जुनं काही !!!

खूप छान वाटायचं तिचं बोलणं! आता तीही कंफर्टेबल झाली होती आणि मी ही.

_________________________________________

कथा पुढे . . . . (भाग १०)

एक दिवस शरयूचा मेसेज आला.

plz call me back sir when free.

ऑफिसातून बाहेर आलो आणि तिला कॉल लावला.

"हाय शरयू ,बोल " मी एकदम बिनधास्त होतो.

"हेलो श्रीधर बोलू शकता ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना ?"

"अगं नाही ना ! काही प्रॉब्लेम नाही !काय म्हणतेस??"

"श्रीधर ,. . . . .एक सांगायचं होतं . . इतक्या वर्षांनंतर तुम्हाला एकदा . . भेटायची ,. .बोलायची. . बघायची इच्छा आहे." ती हळुवारपणे म्हणाली.

"हो का ! भेटुयात ना त्यात काय एवढं?"

मी सहजपणे म्हणालो पण वास्तविक मी उडालोच . म्हणजे मला जे एकदा तिला बघावं 'भेटावं ,वाटत होतं , ते तिला पण वाटतंय . अजुनही तिच्या मनात. . . ?

"श्रीधर आहात ना कॉलवर?"

"हं बोल ना. कधी भेटायचं मग?" मी उसना आव आणला.

"आज आणि आता , जमेल का तुम्हाला?"

"आज आणि आता ?? कसं शक्य आहे ? तू तर इंदोर मधे आहेस ना !"

मी परेशान होऊन विचार करायला लागलो.

"हो ना मग त्याने काय होतं? whats app चा विडिओ कॉल लावा ना आत्ता." ती हसली गोड.

"अगं पण . . ते.. . पुन्हा प्रॉब्लेम होईल"

"इतके कसे भीता हो तुम्ही मालूला. ?good keep it up." ती मिश्किलपणे म्हणाली.

"तसं नाही गं मी कधीच कुणालाच वॉट्स अप कॉल , विडिओ कॉल लावत नाही. म्हणजे डिलीट करायचं

वगैरे सवय नाही. शिवाय मालू स्वतः साठी स्मार्ट फोन घेत नाही आणि मग सगळ्या कामांसाठी माझाच फोन

वापरते. त्या . . मु. . ळे. जरा"

"अहो गंमत केली मी तुमची. इट्स ओके. आपण प्रत्यक्ष च भेटुयात. हे फोनवर नकोच!" शरयु.

"हो ना खरच एकदा भेटुयात, पण कधी???"

मी सहज म्हणालो.

"परवा दिवशी. . ठीक आहे ना" ती.

"काय? कसं काय ते?" मी.

"आमच्या एका नातेवाईकांकडे वास्तुशांति आहे तर या वेळी मी एकटीच येतीय नाशिकला. "

ती सहज म्हणाली पण मी विचारात पडलो.

"हो का परवा. . म्हणजे तुला जमेल मला भेटायला. . . !!?" मी.

"त्यात काय एवढं श्रीधर .!! इतक्या वर्षानंतर नाशिकला येतीय. . . ते पण एकटी. . मग काय! काहीतरी कारण सांगून बाहेर पडेन आणि तासभर वेळ काढेन तुमच्यासाठी. "

" परवा . . २७ तारीख ना . !. अगं नाही जमणार मला . Board meeting आहे त्या दिवशी. ती रात्री कितीवेळ पर्यंत चालेल सांगता येत नाही. . शिट् ट् ट् यार!!" मी खरच अडचणीत आलो.

" त्यात काय एवढं कॅन्सल करा नाहीतर पुढे ढकला. तुमची स्वतःचीच कंपनी ना ?"

तिला वाटलं तितकं सोपं नव्हतं सगळं .

"अगं इंटरनल नाही ना. Annual Board meeting आहे ती. बाहेरचे ७ माणसं येणार आहेत. त्यांचे टिकेट्स आणि हॉटेल बुकींग पण झालय. "

"अरे हो का ! हम्म्म. ठिक आहे , यावेळी योग नाही. पुन्हा कधीतरी. ओ के बाय. " तिने फोन ठेवला.

आई शप्पथ!! मला त्या बोर्ड मिटिंग चा खूप राग आला . पण मी हेल्पलेस होतो. काहिच करू शकलो नाही.. मी मालक होतो ना कंपनीचा . नोकर असतो तर कारण काढुन रजा टाकली असती. . काहितरी नक्की केलं असतं.

२७ तारीख गेली , २८ ला सकाळी ऑफिसला पोहोचलो. आणि फोन वाजला.

सुजय कॉलिंग. . . म्हणजे शरयुचा कॉल ???

"हां शरयु ,बोल. कशी आहेस? सॉरी यार मी काल रात्री १०.३० पर्यंत बिझी होतो. तू गेलीस ना परत? शिट् यार!"

"श्रीधर कदाचित यावेळी आपल्या भेटीचा योग स्ट्राँग आहे. माझं काल रात्रीचं तिकिट कनफर्म झालं नाही. मी आज बसने मुंबईला जातेय काकांकडे . तिथुन परत इंदौरला जाईन ट्रेनने!" ती खूप उत्साहात वाटली.

"अरे व्वा!! आज मी पूर्ण फ्री आहे. बोल कधी भेटुयात?" मी नशीबावर जाम खुश झालो.

"सोबत लंच करुयात?" ती बोलली.

"नको गं . लंच नको. ती वाट बघते घरी. अचानक कळवले तिला तर बरं वाटणार नाही. " मनात मालूचा विचार चमकून गेला.

"किती छान श्रीधर . इतक्या वर्षाँनंतर सुद्धा तिची किती काळजी घेता . सो नाईस ऑफ यू.

मग संध्याकाळी?? कॉफी घेऊयात सोबत. चालेल ना?"

"हो चालेल पण कुठे भेटायचं?" मी चिंतेत पडलो.

" हाँ तो प्रश्न आहे. मला कुठेही चालेल. तुम्हाला कुठे यायला आवडेल? सी सी डी चालेल का ?"

"म्हणजे?"

"अहो कॉफी डे ला भेटायचं का? जवळपास कुठे आहे का सर्च करते ."

ती किती फास्ट झालीय असं वाटलं मला.

"तुला येण्या जाण्याला वेळ लागू नये असं ठिकाण मी बघतो. अगं यादरम्यान जास्त कुठे बाहेर जात नाही ना मी. वेळच नसतो गं "

" ओके .तुमच्या सोयीनुसार ठरवा. तुम्ही मला कळवाल का?"

" हो दुपारपर्यँत तुला मेसेज करतो. !"

"ओके बाय सी यू "

तिने फोन ठेवला

नाशिकमधे माझ्या इतक्या ओळखी झाल्यात ना कि कुठेही गेलं तर कोण भेटेल याचा नेम नाही.

हॉटेलमधे जावं तर एक प्रॉब्लेम , बागेत जावं तर दुसरा प्रॉब्लेम.

मंदिरं खूप आहेत इथे पण तिथे भेटून काय बोलणार. .? कप्पाळ? तिच्या जवळ सुद्धा बसता येणार नाही.

पण तिची फोन करून भेटते म्हणण्याची आणि माझ्यावर टाकलेल्या विश्वासाची मला कमाल वाटली !

मी अशीच माझ्या यंग सहकार्‍यांशी गप्पा गप्पांमधे मी गार्डन रेस्टॉरंट ची माहिती काढली. पत्ता व वेऴ एस एम एस केला आणि मग तो डिलीट केला.

संध्याकाळी पाचलाच ऑफिसमधे फ्रेश झालो. केबिनमधेच मस्त तयार झालो. खुप सारा डिओ मारला . कंपनीचे एक पार्सल घेतलं . कस्टमरकडे डिलिवरीसाठी चाललोय , दोन तासात परत येइन असा निरोप ठेवला . पार्सल गाडीत टाकलं आणि निघालो.

गाडी द्वारका सर्कलवरून नाशिक रोड स्टेशन कडे वळवली.

प्रचंड धडधड!!

धाकधुक होत होती. का कुणास ठावूक?

असं तर तेव्हापण झालं नव्हतं जेव्हा तिला पहिल्यांदा त्या हॉटेलमधे भेटलो होतो.

कशी दिसत असेल ती आता , कशी भेटेल. . मनात विचारंचे काहूर.

काय बोलू मी तिला ? अन कसं सांगु जुनं सगळं?? माझ्या या काही वर्षातल्या " फ़ीलिंग्ज!"

क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance