swati Balurkar " sakhi "

Romance

2.5  

swati Balurkar " sakhi "

Romance

केली पण प्रीती - भाग १

केली पण प्रीती - भाग १

4 mins
1.7K


मी ऑफिसातून थकून घरी आलो, सोफ्यावर बसलो .

तोच तेजु म्हणाली," बाबा कुणाचा तरी फोन आला होता

तुमच्यासाठी. . मोबाइल नंबर विचारित होती"

"काय लॅण्ड लाइनवर फोन ?कधी?"

"अं. . दुपारी . . केव्हातरी"

"काय काम होतं ?काही बोलले?"

"बोलले नाही बाबा, बोलली!!"

"हो का ! कोण बरे?? आणि हळू बोल"

"कस्टमर का?"

"नाही. . तुमची मैत्रिण म्हणे. काय नाव सांगितले बरे?"

मी उत्सुकतेने पहात होतो पण मनात प्रचंड धडधड !

मालूने जर हे ऐकले तर संध्याकाळच्या जेवणाचं काही खरं नाही.

तेजु आठवत होती, तशी ती लिहुनही ठेवायची माझे निरोप.

"बाबा. . .आठवलं ,शरयु म्हणे."

"शरयु पोतदार???"

"हो. राइट. हेच नाव!?"

"मग काय म्हणाली?"

"अं. . .तुमचा मोबाइल नंबर मागितला, मी दिला"

"अगं ,पण काहितरी विचारले असेल ना शरयु ने?"

मी मनातल्या मनात खूप सुखावलो होतो.

तिला अाजही माझी आठवण येते तर. . पण माझा फोन नंबर कसा मिळवला असेल ???

"कोण शरयु ग, तेजु?"

मालू ( माझी सौ.) आली . .

अन् माझ्या काळजाचा ठोका चुकला.

"आई ती कुणीतरी बाबांची मैत्रिण म्हणे! दुपारी फोन आलेला. नंबर विचारत होती."

माझ्या चेहर्‍यावरचे भाव तेजुला कळले नाहित पण मालूला बरोबर कळले.

तेजुला गप्प राहण्याचा इशारा करत होतो पण ती अजाण , भोळी ! तिला कळले नाही.

मग मालूने तेजुला आपल्या गटात घेवून पूर्ण माहिती काढुन घेतली.

मी असहाय!!!

कानात जीव आणुन ऐकत होतो।

ऑफिसच्या फाइल्स चाळण्याची अॅक्टिंग करत होतो.

मग मालू येवून माझ्या बाजुला सोफ्यावार बसली.

माझे ह्रदय अधिक गतीने पळायला लागले.

मैत्रिणिचा फोन येणे साधी गोष्ट अाहे , पण आमच्या घरी ते महापातक अाहे.

शरयुचा चेहरा समोर अाला. . जीव कळवळला.

पण बाजुला मालू!!!

"तुझा मोबाइल दे रे एकदा?"मालू एकदमच बोलली

"का गं? काही काम होतं का. . मी ज़रा कामात आहे"

"मोबाइल दे. नक्की तिचा कॉल किंवा मेसेज येइल."

"अगं मालू काहितरिच काय?"

"अरे या पोरी अशाच असतात , मला माहित आहे!"

"अगं पण शरयु तशी नाही गं आणि पोरी काय म्हणतेस? ती पण बाई अाहे ना अाता!"

"हेच! हेच नकोय मला ! किती सहानुभूती ? किती कन्सर्न तिच्यासाठी ?" "आत्ताही?"

तिच्या आत्ताही शब्दाने मी गार झालो.

आता मी शांत झालो आणि आज्ञाधारक नवर्‍याप्रमाणे फोन तिला दिला.

तिच्या मनात शरयुबद्दल नेमका राग का अाहे? आणि शरयुबद्दल तिचं मत काय आहे मला आतापर्यंत कळाले नव्हते.

माझ्या जिवाची घालमेल होत होती.

एकतर २० वर्षाँनंतर तिने संपर्क साधला!

मला खूप छान वाटत होते.

तिला माझा नंबर कुठुन मिळाला ते एक कोडंच होतं माझ्यासाठी !

पण सर्वात वाईट या गोष्टीचं वाटत होतं कि मालूला कळालं होतं.

आणि. . .तेवढ्यात . . फ़ोनमधे रिंगटोन वाजली.

मी पहातच राहिलो . अननोन नंबर होता.

मालू अाणि तेजुच्या नजरानजरेत फोन कट झाला.

मला हायसं वाटलं. ५ मिनिट शांतता.

मग--

मेसेज टोन वाजला.

माझी धडधड वाढली.

"हाय श्रीधर !! कसे आहात? मी शरयु , तुमची जुनी मैत्रिण ! लक्षात आहे का? हा माझा मोबईल नंबर आहे. वेळ असेल तेव्हा कॉल करा."

मालूने मेसेज मोठमोठयाने वाचला,

तेजुचं भानही ठेवलं नाही.

आणि मग तिने जो कटाक्ष माझ्याकडे

टाकला. . . तो वर्णनातीत!!!!

मी तर जणु धरणी माय दे ठाय या अविर्भावात खाली पाहात होतो.

"हा घे , तुझा मोबाइल आणि तिच्या मेसेज ला रिप्लाय कर !"

मालू अगदी आदेश दिल्यागत बोलली.

माझ्या कडे दुसरा पर्याय नव्हता .

ती सांगत गेली आणि मी टाइप करत गेलो.. . माझी इच्छा नसतानाही ,

मी तो मेसेज पाठवला.

मेसेज असा होता " हाय शरयु, आता आपण आपापल्या आयुष्यात सेटल झालोय आणि सुखी आहोत . मग आता उगाचच जुने संपर्क काढून काय फ़ायदा? आपण संपर्क न ठेवणेच योग्य. काळजी घे, शुभेच्छा !!"

गत्यंतर नव्हते.

आज्ञाधारक नवरा होतो.

शिवाय, आमचे लग्ना अगोदरचे बरेचसे प्रताप मालूच्या

कानावर आलेले होते.

त्यामुळे ती रिस्क घेउ शकत नव्हती .

मेसेज चा रिप्लाय लगेच आला.

"इट्स ओके. थँक्यू . टेक केअर !"

मला का कुणास ठाउक पण खूप भरून अाले,

काय वाटलं असेल बिचारीला.?

आताही माझ्या नशीबी दुर्लक्ष !!!!

हो, असेच वाटले असेल तिला !

तेव्हापण मालूमुळेच तिच्यावर अन्याय झाला असे वाटायचे मला कधी कधी.

(तसा अन्याय माझ्यामुळे झाला होता, तो भाग वेगळा!)

तर शेवटी मालूचे मिशन पूर्ण झाले.

मनात मात्र खरच घालमेल होत होती.

भाजी आणि फळे आणण्याच्या बहाण्याने मी बाहेर पडलो.

बाहेर येताच तो नंबर शोधला आणि शरयू ला फोन लावला.

तिने फोन उचलला आणि गोड आवाजात " हॅलो" म्हणाली.

"शरयु कशी अाहेस? किती वर्षाँनंतर बोलतोय तुझ्याशी!"

"मी छान मजेत, तुम्ही कसे अाहात? मेसेज वाचला. मला वाटले नाही तुम्ही पुन्हा फोन कराल!"

"अगं, तेच सांगण्यासाठी फोन केला होता. तो मेसेज मालूने पाठवला होता, मी नाही. तिला आवडत नाही जुने संपर्क ठेवलेले. तू प्लीज गैरसमज नको करून घेवूस."

"हो का? तेच वाटलं मला, तुम्ही असे कसे वागताय?"

"तुझ्याकडे नंबर असुदे माझा , पण मला तुझा सेव्ह करता येणार नाही. थोडं समजून घे."

"ठिक आहे . माझी काही अपेक्षा नाहिय. मीच फोन करेन कधीकधी .वेळ असेल तर बोलत जा नाहितर कट करा.!

मला काही नाही वाटणार"

"शुअर, सो नाइस ऑफ़ यू! घाईगडबडीत आहे , पुन्हा बोलूयात !"

"ओके बाय!!" तोच गोड आवाज़!!

घरी आलो आणि रिलॅक्स पडलो.

डोळा लागला. उठल्यावर फोन शोधला तर चार्जिंगला लावलेला होता.

सहज कॉल लॉग चेक केला तर त्यात तो कॉल ही नव्हता आणि मेसेजही नव्हता .

मला वाटलेच हे मालूचे काम असणार. तिला विचारणे म्हणजे भूकंपाला आमंत्रण !!

शरयु चा चेहरा काही समोरून जाईना. मन भूतकाळात रमू लागलं. . .

--क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance