"केले कन्यादान"
"केले कन्यादान"


बेळगाव येथे आजीची खूप मोठी शेती, त्यासाठी तेथे रहायची, आजोबांना एकाएकी लकवा मारला आणि तड़काफडकी देवाज्ञापण झाली. मग आजीला प्रश्र्न पड़ले, आपल्या दोन्ही मुलींचे संगोपन ह्या गावात कसे होणार?
पण देवाजवळ सगळ्या प्रश्र्नांचे समाधान असतातच. अश्या वेळी मामा देवरूपात आले, आई आणि मावशीला मुंबईत शिक्षणासाठी घेऊन गेले. त्याचबरोबर मामीने त्यांना मराठी भाषेत तीसर्या वर्गाचे अभ्यास पण करविले, त्याचे चांगले परिणाम हे झाले की लागलीच प्रवेश मिळाले. मामीला इतका आनंद झाला की दोघींचे अगदी मुली सारखेच संगोपन केले आणि त्यांच्या तीनही मुलांना बहिणी भेटल्या.
पुढे जाऊन मामा-मामींनी दोघींचे लग्न लाऊन केले कन्यादान. आजीने देवासमोर-विनंती केली,"जर मला पुनर्जन्म मिळाला तर ह्याच-भावाची बहिण व्हायला आवडेल".