ज्ञानखोका
ज्ञानखोका
आज २१ नोव्हेंबर, जागतिक दूरदर्शन दिवस, दूरदर्शन म्हटले की आपल्या घरी पहिला आलेला टिव्ही व त्यावरचे कार्यक्रम बघत कसे मोठे झालो, अभ्यासात त्याचा कसा फायदा झाला, करमणुकी बरोबरच तेही आठवले. अभ्यासाच्या नावाखाली कसे क्रिकेटच्या मॅच बघायला मित्राकडे कसे एकत्र जमायचो, छोट्याशा खोलीत दाटी वाटीने एकत्र बसायचो!
मग काकू कडून सर्वांना अर्धा अधा कप चहा व त्यासोबत चिवडा एका मोठा ताटलीत ठेवलेला!
मज्जा होती.
जाहिरीती बघुन मग ते शेजारच्या दुकानातुन विकत आणायच, ब्रन्डेड वस्तू खरेदी करायच्या
स्वयंपाक घरातच बसून जेवण करायची प्रथा हळुहळू माग पडली माझ्या घरात, मोठ्या ताटापेक्षा छोट्या ताटलीत जेवण घेऊन आम्ही सर्व जण टिव्ही समोर बसून दूरदर्शनवरचे कार्यक्रम पाहायला लागलो...बाबा रागवायचे पण नंतर त्यांनी ही ते स्विकारले!
एकच वाहीनी असल्यामुळे जे दिसेल ते कार्यक्रम सर्वजण हसत खेळत पहायचो...कधी कधी बाबा मधुनच गुगली टाकायचे प्रश्न विचारायचे काय बातम्या पाहिल्या म्हणून, मग निट लक्ष देऊन बातम्या बघायची व लक्ष ठेऊन काय घडतय जगात ते आपल्या रोजच्या जिवनात त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हे शिकत गेलो.. घरातली सगळे जण त्या हवा हवासा वाटणार्या खोक्या समोर म्हणजेच टिव्ही समोर बसत असू.
काही घरात ह्या खोक्याला इडियट बॉक्स म्हणत असे...
पण आमच्या घरात त्याला ज्ञान देणारा बॉक्स होता, आई रोज त्यावरची धूळ पुसून यावर सुबक हाताने नक्षीकाम केलेला टेबल क्लॉथ टाकत असे.. ठरवुन दिलेलेच कार्यक्रम पाहणे, चांगले कार्यक्रम आम्ही पाहतो आहे की नाही ह्या वर तीचे लक्ष असे, परीक्षेच्या काळात टिव्हि ती व बाबापण पाहत नसे, क्रिकेटची मॅच बघायला आमच्याकडे माझे मित्र आले की बाबाही त्यांच्या सोबत मित्रांसोबतच मिसळून जात, एक दोन काकापण कॉलनीतील कार्यक्रम बघायला येत!
हळूहळू सगळ्या कडे टिव्हि आला, आमच्या पेक्षा मोठा पडद्याचा, आमचा हवा हवासा वाटणारा ज्ञान खोका जूना झाला होता काळा पांढरेच चित्र दाखवणारा...
बाजारात आता नव नविन कंपनीचे मोठ मोठ्या साईजचे पडदे असलेले टिव्ही मिळत होते.
पण आम्ही जो पर्यंत आमचा टिव्ही चालु असेल खराब होणार नाही तो पर्यंत हाच टिव्ही वापरायचा व दूरदर्शन ह्याच वाहिनीवरचे कार्यंक्रम पाहायचे असे एकमताने ठरवले.
टिव्हि इल्केट्रॉनीक असल्यामुळे हळूहळू निट दिसत नसे, सारखी खरखरहोत असे बर्याचवेळा मुंग्या चालया असे ठिपके दिसत असे. मग आई, टिव्हि पुसतांना त्याला हलक्या हाताने थपड्या मारत!
तोपण आईचे एकत असे, गपगुमान निट दिसायला लागत असे.. जवळपास आमचा पहिला हवा हवासा वाटणारा ज्ञान खोका एक तप चालला!
त्या नंतर ४-५ टिव्हि घरात आले शंभर शंभर चॅनेल दिसणारे! केबल लावल्यास वेग वेगळ्या भाषेतील विविध कार्यक्रम दिसतात, रंगित पडदे, , पण जुनी सवय मुंबई दूरदर्शन वरचे कार्यक्रम संध्याकाळी सातच्या बातम्या पाहिल्या शिवाय दिवस निट जात नाही, २४ तास याच त्याच बातम्या दाखवणारे वाहिन्या आहेत पण दूरदर्शनसारख्या थोडक्यात महत्वाच्या बातम्या ह्या दूरदर्शन वरच बघायया यावर विश्वास ठेवायचा, ज्ञान खोक्याचा वापर ज्ञान प्राप्तीसाठीच करायचे हे नक्की!
